जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / फक्त पाळी चुकणेच नव्हे तर हीसुद्धा आहेत प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणं

फक्त पाळी चुकणेच नव्हे तर हीसुद्धा आहेत प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणं

फक्त पाळी चुकणेच नव्हे तर हीसुद्धा आहेत प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणं

गरोदर असण्याचं सुरुवातीचं लक्षण म्हणजे Periods miss होणं. पण फक्त पाळी चुकणं हेच प्रेग्नन्सीचं लक्षण नाही. अन्य लक्षणांकडेही लक्ष द्या.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    दिल्ली, 17 एप्रिल: आपण आई होणार आहोत हे जेव्हा एखाद्या महिलेला समजतं, तो क्षण तिच्या आयुष्यातला सगळ्यांत आनंदाचा क्षण असतो असं म्हटलं जातं. काही महत्त्वाच्या गोष्टींमुळे स्त्री गर्भवती आहे की नाही हे समजतं. मासिक पाळी म्हणजेच पीरियड्स चुकणं (Periods Missed) हे त्यातील सगळ्यांत महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. वेळेवर दर महिन्याला जशी पाळी येते तशी आली नाही तर ती महिला गर्भवती असू शकते. याबाबतच ‘आज तक’ वर अधिक माहिती देण्यात आली आहे. इतर कोणत्या लक्षणांमुळे स्री गरोदर असल्याचं लक्षात येऊ शकतं ते पाहूया. थकवा (Fatigue)- प्रेग्नन्सीच्या म्हणजेच गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना प्रचंड थकवा जाणवतो. यादरम्यान शरीरात अनेक शारीरिक, मानसिक, हार्मोन्समध्ये बदल (Physical, Mental, Harmonal Changes) होत असतात. त्यामुळेच असा थकवा येतो. हे वाचा -  वारंवार पाणी पिऊनही भागत नाहीये तहान; ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं हे लक्षण मॉर्निंग सिकनेस (Morning Sickness) - प्रेग्नसीच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना सकाळी उठल्यावर उलट्या होऊ शकतात. पीरीयड्स चुकले की अनेक स्त्रियांना हा उलटीचा त्रास होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त सकाळीसकाळीच हा उलट्यांचा त्रास होतो असं नाही तर अनेकदा दिवसभरही काही उलट्या होऊ शकतात. गर्भवती राहिल्यानंतर काही आठवड्यांतच हे लक्षण दिसू लागतं. शरीरात ॲस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची लेव्हल वाढल्यानं आणि ब्लड शुगरची म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानं हा त्रास होतो. काही महिलांना तर अन्नाचा वास आल्यावरही मळमळ किंवा उलट्या होतात. ताणामुळेही हा त्रास होतो.  हे वाचा -  वजन कमी होतंय, पण पोटावरील चरबीचं काय? हे सोपे व्यायाम प्रकार ट्राय करा! वासामुळे त्रास होणं - गरोदरपणात महिलांना कोणत्याही प्रकारचा सुगंध किंवा दुर्गंध (Good Or Bad Smell) अधिक तीव्रतेनं जाणवतो. त्याचा काही महिलांना त्रासही होतो. असा वास आल्यावर त्यांना मळमळ किंवा कोरड्या उलट्या होऊ शकतात. गर्भवती असताना स्त्रियांच्या शरीरात ॲस्ट्रोजेनची पातळी वाढते. यामुळे महिलांची वास घेण्याची क्षमता एरवीपेक्षा भरपूर वाढते. त्यामुळे हा त्रास जाणवतो. स्पॉटिंग आणि क्रँप्स (Spotting And Cramps) - प्रेग्नसीच्या सुरुवातीच्या काळात काही महिलांना स्पॉटिंगही (Spotting) होतं. यालाच इम्प्लांटेशन ब्लीडिंग (Implantation Bleeding) असं म्हटलं जातं. हा रक्तस्त्राव हलक्या गुलाबी रंगाचा किंवा ब्राऊन रंगाचा असतो. पीरीयड्स सुरु होण्याच्या एक किंवा दोन आठवडे आधी हे लक्षण दिसायला लागतं. मात्र यामुळे घाबरुन जायची गरज नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. फर्टिलाइज्ड झालेलं एग (Fertilised Egg) स्वत:ला गर्भाशयाच्या लायनिंगशी जोडून घेतं, त्यामुळेच जळजळ किंवा अगदी थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो. स्तनांच्या आकारात बदल (Changes In Breast Size)- गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांच्या स्तनांच्या (Breast) आकारात, आकारामानात बदल होतो. यादरम्यान स्त्रियांना स्तन जड, मऊ झालेले जाणवतात, त्यांच्यावर सूजही येते. प्रिमेनस्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएम) म्हणजेच पाळी येण्याआधी जी लक्षणं असतात तशीच ही लक्षणं जाणवतात. नेहमीच्या पाळीच्या दरम्यान स्त्रियांच्या स्तनांच्या निप्पलचा रंग गडद होत नाही किंवा स्तनांच्या आकारातही बदल होत नाही. पण प्रेग्नन्सीदरम्यान मात्र हे होतं हा मुख्य फरक आहे. तेव्हा फक्त पाळी चुकणं हेच प्रेग्नन्सीचं लक्षण नाही. अन्य लक्षणांकडेही लक्ष द्या आणि जास्त त्रास वाटला तर वैद्यकीय सल्ला घ्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात