मराठी बातम्या /बातम्या /heatlh /वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 'हा' रस; काही दिवसांतच फरक दिसून येईल

वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 'हा' रस; काही दिवसांतच फरक दिसून येईल

वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचा आहे हा ज्युस.

वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचा आहे हा ज्युस.

वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचा आहे हा ज्युस.

नवी दिल्ली, 24 जून : आजकाल लोकांना आपल्या (Health Tips) फिगरविषयी खूप चिंता असते. आपण कसे दिसतोय?, जास्त लठ्ठ तर वाटत नाही ना? याविषयीचे अनेक प्रश्न त्रास देत असतात. त्यामुळे खास करुन महिला तर आपल्या वाढत्या वजनाविषयी खूप काळजी घेताना दिसतात. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अनेक नवनवीन गोष्टी करुन बघतात. अशातच तुम्ही वजन कमी करण्यासाठी टोमॅटोचा रसचा (Tomato Juice) उपयोग केला तर तुमच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. घरगुती गोष्टींच्या वापरानं तुमच्या आरोग्याला काही धोका देखील निर्माण होणार नाही.

टोमॅटोमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस आढळतात, याशिवाय, ते एक औषध म्हणून देखील काम करते. त्यामुळे टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. टोमॅटोचा रस पिल्यानं खालीलप्रमाणे फायदे होतात.

हे ही वाचा - चेहऱ्यावरच्या केसांमुळे वैतागला आहात? 'हे' घरगुती उपायही ठरू शकतात प्रभावी

वजन कमी करण्यास मदत -

टोमॅटोचा रस प्यायल्याने तुम्ही तुमचे वजन कमी करण्यासोबतच नियंत्रणात राहू शकता. टोमॅटोच्या रसामध्ये फायबर असते, जे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे, तसेच टोमॅटोचा रस आपल्या आतड्यांसाठी देखील फायदेशीर आहे. पचण्यासाठी जास्त कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे आपले वजन कमी होते.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी  -

टोमॅटोच्या रसाचं नियमित सेवन केल्यानं त्वचा निरोगी होण्यास मदत होते. जर तुम्हाला चांगली आणि निरोगी त्वचा मिळवायची असेल तर टोमॅटोचा रस दररोज सेवन करा. मुरुम, कोरडी त्वचा यांसारख्या समस्येवरही टोमॅटोच्या रसाचा फायदा होतो.

हे ही वाचा - Ginger Benefits: कॅन्सरसह अनेक घातक आजारांवर 'आलं' फायदेशीर; असं करा सेवन

रोगप्रतिकारशक्ती -

व्हिटॅमिन-सी, जी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करते, त्यासोबतच बीटा-कॅरोटीन, लायकोपीन, व्हिटॅमिन-ई इत्यादी देखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. टोमॅटोमध्ये ही जीवनसत्त्वे असल्यानं टोमॅटोचा रस तुमच्या शरिरासाठी खूप उपयोगी आहे.

हृदयासाठी फायदेशीर -

उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, चरबी यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी टोमॅटो रस फायदेशीर ठरतो. हृदयाशी संबंधीत अनेक अजारांना कमी करण्यास सहाय्य करतो. त्यामुळे लवकरात लवकर टोमटोचं तुमच्या आहारात समावेश करा.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Weight loss