मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Health Tips : चहाबरोबर नमकीन खाणं आरोग्यासाठी किती चांगलं?, घ्या जाणून

Health Tips : चहाबरोबर नमकीन खाणं आरोग्यासाठी किती चांगलं?, घ्या जाणून

चहाशिवाय ज्यांचं पानच हलत नाही असेही अनेक जण आहेत त्याचबरोबर चहासोबत नमकीन म्हणजे खारे पदार्थ नसतील तर ज्यांना आवडत नाहीत असेही अनेक जण आहेत. पण चहाबरोबर नमकीन खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट हे जाणून घेऊया.

चहाशिवाय ज्यांचं पानच हलत नाही असेही अनेक जण आहेत त्याचबरोबर चहासोबत नमकीन म्हणजे खारे पदार्थ नसतील तर ज्यांना आवडत नाहीत असेही अनेक जण आहेत. पण चहाबरोबर नमकीन खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट हे जाणून घेऊया.

चहाशिवाय ज्यांचं पानच हलत नाही असेही अनेक जण आहेत त्याचबरोबर चहासोबत नमकीन म्हणजे खारे पदार्थ नसतील तर ज्यांना आवडत नाहीत असेही अनेक जण आहेत. पण चहाबरोबर नमकीन खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट हे जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी पिऊन करणारे अनेक भारतीय आहेत. चहाशिवाय ज्यांचं पानच हलत नाही असेही अनेक जण आहेत त्याचबरोबर चहासोबत नमकीन म्हणजे खारे पदार्थ नसतील तर ज्यांना आवडत नाहीत असेही अनेक जण आहेत. पण चहाबरोबर नमकीन खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट याचा विचार फारसा होताना दिसत नाही. चहाबरोबर नमकीन खाल्लाने हे ही मंडळी नकळत स्वत: च्याच आरोग्याची शत्रू होत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. ग्रेटर नोएडामधील GIMS हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डाएटिशियन डॉ. आयुषी यादव (Dr. Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, चहाबरोबर नमकीन खाणं चांगलं नाही. (Don't Consume Tea With Namkeen) तसं केल्याने आरोग्याला काय अपाय होतो हे त्यांनी सविस्तर सांगितलं. याबाबतची माहिती झी न्यूज वेबसाईटने दिली आहे.

    चहाबरोबर आणि नमकीन खाण्याने होणारे तोटे

    नमकीन म्हणजे खारे पदार्थ मुख्य म्हणजे बेसनापासून तयार केलेले असतात तसंच ते टिकावेत म्हणून त्यामध्ये भरपूर मीठ घातलेलं असतं. त्याहून अधिक म्हणजे त्यासाठी कुठलं तेल वापरलंय याचीही माहिती आपल्याला नसते याचा विपरित परिणाम पोटावर होतो. नमकीन चहाबरोबर खाल्लं तर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. नमकीनमध्ये हळद असेल तर पचनक्रियाच बिघडू शकते.

    हेही वाचा -  Foods to avoid for diabetes : फक्त गोड खाणं सोडून फायदा नाही; डायबेटिज रुग्णांनी 'हे' पदार्थही खाऊ नयेत

    चहात साखर असते आणि नमकीनमध्ये मीठ वापरतात. त्यामुळे डॉक्टर सांगतात गोड आणि आंबट पदार्थ एकावेळी खाऊ नका. तसं खाल्ल्यास पोटात गॅस तयार होतो आणि त्यामुळे अपचनाचा (Indigestion) त्रास होतो. नमकीन पदार्थांमध्ये काजू, बेदाणे यासारखा सुका मेवा (Dry Fruits) टाकलेला असतो. चहाबरोबर सुका मेवा कधीच खाऊ नये. सुका मेवा आणि चहा एकत्र पोटात गेला तर पोटात गॅस (Acidity) तयार होतो आणि त्याचा त्रास होतो.

    चहामध्ये दूध असतं आणि दुधाबरोबर नमकीन कधीच खाऊ नये. नमकीन पदार्थांत मीठ भरपूर असतं त्यामुळे हे टाळावं. नमकीनमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असतात जे पचवणं खूपच कठीण होतं. चहाबरोबर नमकीन खाल्लंत तर पोटात मुरडा (Abdominal Cramps) येण्याचा त्रासही होऊ शकतो. चहाबरोबर बिस्किटं खाणं ही एक पद्धत सगळीकडे रूढ आहे त्यामुळे चहाबरोबर बिस्किटं खाल्ल्याने आरोग्याला फार हानी होत नसावी. चहातलं दूध, साखर आणि नमकीनमधलं बेसन, मीठ, तेल यासगळ्यांच्या मिश्रणाचा पोटावर विपरित परिणाम होतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते चहाबरोबर नमकीन म्हणजे खारे पदार्थ खाणं हे खूप त्रासदायक आहे त्यामुळे तुम्हीही पुढच्यावेळी तसं करताना परत एकदा विचार करा.

    First published:
    top videos

      Tags: Health Tips, Lifestyle, Tea, Tea drinker