Skipping : हिवाळ्यात Skipping ची कसरत घरी सहजपणे करता येते. एका दिवसात 150 ते 200 वेळा दोरीने उडी मारणं पुरेसं आहे. जेवण झाल्यावर लगेचच Skipping करू नये.
Mountain Climber : हिवाळ्यात अनेकजण हे आपल्या खाण्यापिण्याबाबत बेफिकीर असतात. त्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. अशा परिस्थितीत गिर्यारोहण करणे हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे.
Push Ups : शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच स्नायूंना बळकट करण्यासाठी पुश अप्स ही एक उत्तम कसरत ठरू शकते. Push Ups हे आपल्या पोटाला सडपातळ ठेवण्यासाठी आणि खांदे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.
Crunches : हा व्यायाम केल्याचा शरीराला खूप फायदा असतो. असं केल्यामुळं पोटाचे स्नायू मजबूत होतात. त्याचबरोबर यामुळे कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होते.
Running : दररोज नियमित धावण्याने आपलं शरीर तंदुरुस्त होते. शरीराच्या स्नायूंना तसेच हृदय, पोटासह इतर अवयवांना या व्यायामाचा फायदा होतो.
Swimming : पाण्यात पोहण्यामुळे आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. नियमित पोहण्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहु शकते.