जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन करणं होणार सोपं; दिल्लीतील IBS हॉस्पिटलनं शोधली ब्रेन मॅपिंग टेक्नॉलॉजी

ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन करणं होणार सोपं; दिल्लीतील IBS हॉस्पिटलनं शोधली ब्रेन मॅपिंग टेक्नॉलॉजी

ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन करणं होणार सोपं; दिल्लीतील IBS हॉस्पिटलनं शोधली ब्रेन मॅपिंग टेक्नॉलॉजी

ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन करणं होणार सोपं; दिल्लीतील IBS हॉस्पिटलनं शोधली ब्रेन मॅपिंग टेक्नॉलॉजी

Brain Mapping Device: देशातलं पहिलं ब्रेन मॅपिंग उपकरण कनेक्टोमिक्स (Connectomics) /क्विकटोम (Quicktome) आज IBS हॉस्पिटलने लाँच केलं आहे. अशा पर्सनलाइज्ड ब्रेन मॅपिंग मशीनमुळे ब्रेन ट्यूमर आणि मेंदूच्या इतर शस्त्रक्रियांच्या माध्यमातून उपचार करणं अधिक सुरक्षित झालं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 22 ऑगस्ट: अनेक दशकांच्या संशोधनानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तयार केलेलं देशातलं पहिलं ब्रेन मॅपिंग उपकरण कनेक्टोमिक्स (Connectomics) /क्विकटोम (Quicktome) आज IBS हॉस्पिटलने लाँच केलं आहे. अशा पर्सनलाइज्ड ब्रेन मॅपिंग मशीनमुळे (Brain mapping Technology) ब्रेन ट्यूमर आणि मेंदूच्या इतर शस्त्रक्रियांच्या माध्यमातून उपचार करणं अधिक सुरक्षित झालं आहे. मशीनच्या अचूकतेमुळे मेंदूच्या महत्त्वाच्या भागांना होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात प्रीऑपरेटिव्ह इमेजिंगमधील ही अशीच एक प्रगती आहे, जी अत्याधुनिक अल्गोरिदम आणि क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सहाय्यानं उपचार करणं खूप सोपं करू शकते. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे प्रत्यक्षात अचूक न्युरोसर्जरी (neurosurgery ) करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. या संदर्भात इंडिया टुडेनं वृत्त दिलंय. “मेंदूमधील काही नेटवर्कच्या नावांनुसार त्यांची फंक्शन्स स्पष्ट असतात. तर सर्वांत कॉम्प्लेक्स फंक्शन्स ही इंटर नेटवर्क इंटरॅक्शन्समुळे पार पडतात. विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार असलेल्या मेंदुतील विशिष्ट सब-नेटवर्कचं वर्णन सखोल विश्लेषणाच्या माध्यमातून करता येतं. ही विशिष्ट फंक्शन्स किंवा कार्य पार पाडण्यासाठी अनेक लहान घटक काम करत असतात. यांवर लक्ष ठेवणं नव्या तंत्रज्ञानामुळे शक्य होईल,” असं IBS हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि न्यूरोसर्जन आणि आयबीएस हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन कंधारी यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, “मेंदूतली नेटवर्क भाषेपासून (language) ते विचारापर्यंतच्या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असतात. नव्या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणारे मेंदुतील नकाशे सर्जरी करताना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात जेणेकरून मेंदुतील दुसऱ्या भागाला इजा पोहोचू नये. हे अद्ययावत तंत्रज्ञान मेंदूशीसंबंधित आजारांमध्ये पेशंट्सना शस्रक्रियेपूर्वी आणि नंतरही अनेक पद्धतीने सहाय्यभूत ठरत आहे. तसंच मेंदुच्या सामान्य कार्यशैलीबद्दल जाणून घेण्यातही या तंत्रज्ञानाचा प्रचंड उपयोग होत आहे. " हेही वाचा-  Best Parenting Apps: मुलांच्या संगोपनाची चिंता सतावतीये? ही 5 पॅरेंटिंग अ‍ॅप ठरतील उपयुक्त Quicktome लाखो डेटा पॉइंट्सचं विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक अल्गोरिदम वापरतं आणि प्रत्येक रुग्णासाठी एका स्टँडर्ड आणि नॉन-इनव्हेजिव्ह MRI स्कॅनमधून पर्सनलाइज्ड मेंदूचा नकाशा तयार करतं. तो नकाशा डॉक्टर त्यांच्या कॉम्प्युटरवर पाहू शकतात. तसंच ते सामान्यत: क्लिनिकल सेटिंगमध्ये उपलब्ध नसलेल्या शरीरातील अॅनाटॉमिकल डिटेलच्या पातळीची तपशीलवार माहिती देतात, ज्यामुळे सर्जन न्यूरोसर्जिकल प्लॅनिंगमध्ये अॅडव्हान्स ब्रेन नेटवर्क डेटा (brain network data) समाविष्ट करू शकतात. “रुग्णाच्या मेंदुमध्ये असलेल्या नेटवर्कचा डिजिटली तपास करण्यासाठी विकसित झालेलं हे नवं तंत्रज्ञान सध्या न्युरोलॉजिकल आणि न्युरोसायकियाट्रिक उपचारांमध्ये खूप मोठी मदत करत आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मेंदूवर उपचार करणं खूपच सोईचं होत आहे. याशिवाय, मेंदूचे नेटवर्कचे नकाशे न्युरोसर्जरीमध्ये प्रगतीसाठी मोठी संधी उपलब्ध करून देत आहेत. मेंदुतील नेटवर्कवर वर्चस्व गाजवणाऱ्या मेंदुतील भागांबाबत आता या तंत्रज्ञानामुळे अधिक माहिती उपलब्ध होणार असल्याने न्युरोसर्जन अधिक आत्मविश्वासाने उपचार करू शकतील. मेंदुतील नेटवर्क आणि विविध फंक्शन्सशी जोडलेले भाग अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिने आता पावलं टाकली जातील,” असंही ते म्हणाले. उदाहरणार्थ, मानसिक आजार हा कायम नेब्युलसशी संबंधित असावा, असं नाही. कारण असा आजार रुग्णाशी बोलून, त्याची हिस्ट्री जाणून घेतल्यावर डॉक्टरांच्या लक्षात येतो; पण या नवीन तंत्रज्ञानामुळे मेंदुतल्या नेटवर्कमधील बायोमार्कर पटकन कुठल्या भागात त्रास होतोय, ते दाखवतात आणि डेटा उपलब्ध करून देतात. त्यामुळे उपचार कसे करायचे, याबद्दल डॉक्टरांना पटकन निर्णय घेता येतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: brain , medical
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात