मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोनातून सुटका नाहीच? महाराष्ट्रात आढळलेल्या Omicron BA.5 Variant बाबत सर्वात धक्कादायक माहिती समोर

कोरोनातून सुटका नाहीच? महाराष्ट्रात आढळलेल्या Omicron BA.5 Variant बाबत सर्वात धक्कादायक माहिती समोर

कोरोनाच्या ओमिक्रॉन सब-व्हेरिएंटबाबत नवी माहिती.

कोरोनाच्या ओमिक्रॉन सब-व्हेरिएंटबाबत नवी माहिती.

कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटच्या BA.5 या सब-व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांना मोठी माहिती मिळाली आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 06 सप्टेंबर : 2019 सालापासून संपूर्ण जगात कोरोना थैमान घालतो आहे. कित्येकांनी आपला जीव गमावला, कित्येक जण याच्याशी अजूनही लढा देत आहेत. सर्वांनीच लॉकडाऊनमधील अडचणींचा सामना केला. आता कोरोना निर्बंध शिथील झाल्याने कोरोना गेलाच असंच अनेकांना वाटत आहे. त्यामुळे ना तोंडावर मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग. सर्वजण बिनधास्त झाले आहेत. अशात आता महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंटबाबत अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक दावा केला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे काही नवे व्हेरिएंट आले आहेत. त्यापैकी एक व्हेरिएंट म्हणजे ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.5. रिपोर्टनुसार 20 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर राज्यात BA.5 चे 21 रुग्ण आहेत.  याबाबत अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. त्यानंतर त्यांना याबाबत मोठी माहिती मिळाली आहे. अभ्यासानुसार कोरोनाचा हा व्हेरिएंट दर महिन्याला आपल्या विळख्यात घेतो. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा, महिन्यातून एकदा तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार.  शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील नागरिकांसह संपूर्ण जगाला याबाबत अलर्ट देण्यात केलं आहे. स्टडीनुसार आधी एकदा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर लोकांना या व्हायरसची लढण्यासाठी इम्युनिटी मिळायची पण आता तसं होत नाही आहे. हा व्हायरस काही आठवड्यात पुन्हा हल्ला करतो. म्हणजे जसा तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यानंतर काही आठवड्यातच तुम्हाला पुन्हा याची लागण होऊ शकते. Omicron BA.5 मध्ये आतापर्यंत म्युटेंटमुळे खूप लवकर जास्त प्रमाणात पसरण्याची लक्षणं सापडली आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा लवकर हल्ला करतो. हे वाचा - 'ब्रेनडेड' रुग्णाचे अवयव काढायला जाताच अचानक 'मृतदेह'...; डॉक्टरांनाही फुटला घाम तज्ज्ञांच्या मते, जेव्हापासून हा व्हेरिएंट समोर आला आहे, तेव्हापासून कोरोनाची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. कारण हा चार आठवड्यात तो पुन्हा संक्रमित करू शकतो. म्हणजे एका महिन्यानंतर ती व्यक्ती पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाचे मुख्य आरोग्य अधिकारी अँड रॉबर्ट्सन म्हणाले, ज्या लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे, त्यांच्यावर कोरोनाचा परिणाम होणार नाही, असं सांगितलं जात होतं. पण तसं नाही. तो रुग्णसुद्धा पुन्हा व्हायरसच्या विळख्यात येत आहेत. फक्त दिलासा इतकाच की ज्यांचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत, तो जीवघेणा नाही. फ्लूसारखी लक्षणं दिसल्यानंतर तुम्हाला त्यातून आरामही मिळतो. हे वाचा - या रक्तगटाच्या लोकांना तरुण वयात पक्षाघाताचा धोका जास्त; अभ्यासातून समोर आली बाब एखाद्याला कोरोना झाला की त्याला पुन्हा पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याची किंवा लाँग कोव्हिड झाल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. त्यात आता दर महिन्याला कोरोना होणार या दाव्याने नागरिक दहशतीत आहेत. कोरोनातून सुटका होणार नाहीच का? असाच प्रश्न उपस्थित होतो आहे.
First published:

Tags: Coronavirus, Health, Lifestyle

पुढील बातम्या