वॉशिंग्टन, 22 ऑगस्ट : सध्या कोरोनाव्हायरस, मंकीपॉक्स या व्हायरसनी जगभरात दहशत निर्माण केलेली आहे. याच वेळी एका लहान मुलाचा एका कीड्याने जीव घेतल्याचं प्रकरण समोर आलं आहे. नदीत अंघोळ करायला गेलेल्या या मुलाच्या मेंदूत असा खतरनाक कीडा घुसला की त्याने या मुलाचा मेंदूच खाल्ला आहे. मेंदू कुरतडून कुरतडून 10 दिवसांतच या कीड्याने मुलाचा जीव घेतला आहे. अमेरिकेच्या नेब्रास्कातील ही धक्कादायक घटना. 8 ऑगस्टआधी नेब्रास्कातील एल्खोर्न नदीत हा मुलगा अंघोळ करायला गेला. त्यानंतर पाच दिवसांनी त्याची प्रकृती गंभीर होऊ लागली.त्याच्या कुटुंबाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा त्याच्या मेंदूत ब्रेन इटिंग अमिबा घुसल्याचं निदान झालं. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनीही याची पुष्टी केली आहे. डलगस काऊंटी आरोग्य विभागानुसार या मुलाला अमिबीक मेनिंगोएन्सेफलाइटिसचा (Amebic Meningoencephalitis) संसर्ग झाला होता. नेगलेरिया फाउलेरी या अमिबामुळे होणारं हे इन्फेक्शन. या अमिबाला ब्रेन इटिंग म्हणून ओळखलं जातं. पाण्यातून नाकाच्या माध्यमातून तो शरीरात प्रवेश करतो आणि नाकातून मेंदूत जातो. हे वाचा - ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन करणं होणार सोपं; दिल्लीतील IBS हॉस्पिटलनं शोधली ब्रेन मॅपिंग टेक्नॉलॉजी सीडीसीच्या माहितीनुसार या मुलाच्या मस्तिष्कमेरू द्रव म्हणजे मेंदूतील एक द्रव जो मेंदू आणि मणक्याच्या हाड आणि त्याच्या आसपास वाहतं, त्यात हा अमिबा सापडला. लक्षणं दिसताच 48 तासांच्या आतत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण 10 दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. मिररच्या रिपोर्टनुसार अमिबामुळे झालेला राज्यातील पहिला आणि मध्य पश्चिममधील दुसरा मृत्यू आहे. गेल्या महिन्यात मिसौरीतील आयोवामध्ये लेक ऑफ थ्री फायर्स स्टे पार्कमधील समुद्रात पोहोयला गेलेल्या एका व्यक्तीचा या अमिबामुळे मृत्यू झाला होता. तर आणखी एक13 वर्षांचा मुलगा याच संक्रमणाशी झुंज देत आहे. कालेब जिगेलबाऊ असं या मुलांच नाव. जून-जुलैच्या दरम्यान तो या अमिबाच्या संपर्कात आला. लक्षण दिसल्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. काही दिवसांपूर्वी त्याला वेंटिलेटरवरून हटवण्यात आला. तो तो जीवनमृत्यूशी झुंज देत आहे. हे वाचा - दारू पार्टीच्या दुसऱ्या दिवशीच तरुणाच्या ‘त्या’ भागात तीव्र वेदना; एक्स-रे रिपोर्टमधून समोर आला मित्रांचा विचित्र ‘कांड’ इज्राइलमध्ये या अमिबामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर त्या रुग्णाचे सॅम्पल यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन ला पाठवण्यात आले होते. तीव्र डोकेदुखी, ताप, उलटी, शरीरात वेदना, मानेत तीव्र वेदना, झटके येणं किंवा मतिभ्रम होणं अशी लक्षणं दिसून येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







