मराठी बातम्या /बातम्या /heatlh /किडनी ट्रान्सप्लांटसाठी चक्क बदलला ब्लड ग्रुप, संशोधकांचा मोठा शोध; गरजूंसाठी ठरणार वरदान

किडनी ट्रान्सप्लांटसाठी चक्क बदलला ब्लड ग्रुप, संशोधकांचा मोठा शोध; गरजूंसाठी ठरणार वरदान

किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी हा क्रांतिकारी शोध मोठा दिलासा देणारा आहे.

किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी हा क्रांतिकारी शोध मोठा दिलासा देणारा आहे.

किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी हा क्रांतिकारी शोध मोठा दिलासा देणारा आहे.

  मुंबई, 17 ऑगस्ट-  केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी एका महत्त्वपूर्ण रिसर्चमध्ये तीन मृत किडनी  डोनरच्या रक्ताचे गट यशस्वीरित्या बदलले आहेत. किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी हा क्रांतिकारी शोध मोठा दिलासा देणारा आहे. हे संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ सर्जरीमध्ये  प्रकाशित होणार आहे.या नवीन शोधामुळे ट्रान्सप्लांटसाठी किडनीचा पुरवठा लवकर होऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. विशेषत: विशिष्ट वांशिक गटाशी संबंधित लोक ज्यांची किडनी मॅच होण्याची शक्यता खूपच कमी आहे, अशा लोकांसाठी ही खूपच चांगली बाब आहे. किडनी ट्रान्सप्लांट करताना दोन व्यक्तींची किडनी मॅच होणे खूप महत्वाचं असतं. उदाहरणार्थ, A रक्तगट असलेल्या व्यक्तीची किडनी B रक्तगट असलेल्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट करता येत नाही. परंतु, रुग्णाचा रक्तगट युनिव्हर्सल O मध्ये बदलल्यास ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं. कारण त्याचा वापर कोणत्याही रक्तगटाच्या लोकांसाठी केला जाऊ शकतो.

  प्रोफेसर माईक निकोलसन आणि पीएचडी विद्यार्थी सेरेना मॅकमिलन यांनी नॉर्मोथर्मिक परफ्युजन मशीन वापरलं. हे मशीन माणसाच्या किडनीशी जोडलं जातं. ज्यामुळे भविष्यात त्याचा उपयोग करण्यासाठी, त्याचं चांगल्या पद्धतीने जतन करण्यासाठी शरीराच्या माध्यमातून ऑक्सिजनयुक्त रक्त पास करता येऊ शकेल. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजच्या रिपोर्टनुसार, एन्झाइमने ब्लड टाइपचे मार्कर हटवण्यासाठी कात्रीप्रमाणे काम केलं, जे किडनीची ब्लड व्हेसल्स दर्शवतात. परिणामी शरीरात रक्तगटाचे सर्वांत सामान्य प्रकार O रक्तगटात रूपांतरित होतात.

  सेरेना मॅकमिलन या विद्यार्थिनीने सांगितलं की, “जेव्हा आम्ही मानवी किडनीच्या टिश्युच्या एका तुकड्यावर एन्झाइम लावलं तेव्हा अँटिजेन निघून गेल्याचं आम्ही पाहिलं. त्यावेळी आमचा आत्मविश्वास खरोखरच वाढला होता. त्यानंतर आम्हाला समजलं की ही प्रक्रिया शक्य आहे. आता आमची पुढची पायरी संपूर्ण मानवी किडनीवर एन्झाइम लावण्याची होती. B-टाइप मानवी किडनी आणि आमच्या नॉर्मोथर्मिक परफ्युजन मशीनचा वापर करून अवयवातून एन्झाइम पंप करून, आम्ही काही तासांतच बी-टाइप किडनीचं O प्रकारात रूपांतर केलं. हा शोध किती जीव वाचवू शकेल याचा विचार करणं खूप रोमांचक आहे."

  हा शोध वांशिक अल्पसंख्याक गटातील लोकांसाठी विशेष प्रभावी असू शकतो. कारण याच रुग्णांना व्हाईट पेशंटच्या तुलनेत 1 वर्ष जास्त वाट पहावी लागते. अल्पसंख्याक गटातील लोकांचा रक्तगट B असण्याची अधिक शक्यता असते आणि या लोकसंख्येतील सध्याच्या कमी डोनर संख्येमुळे पुरेशा प्रमाणात किडनी उपलब्ध होत नाहीत.

  First published:

  Tags: Health, Health Tips, Lifestyle, Research