मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

धक्कादायक! एका घोटातच गेला तरुणाचा जीव; कॉकटेल ड्रिंकमुळे भावी डॉक्टरचा मृत्यू

धक्कादायक! एका घोटातच गेला तरुणाचा जीव; कॉकटेल ड्रिंकमुळे भावी डॉक्टरचा मृत्यू

कॉकटेल ड्रिंक ठरलं जीवघेणं.
(प्रतीकात्मक फोटो सौजन्य Shutterstock)

कॉकटेल ड्रिंक ठरलं जीवघेणं. (प्रतीकात्मक फोटो सौजन्य Shutterstock)

कॉकटेल ड्रिंक प्यायल्यानंतर त्याला घाम आला, त्याचा श्वास फुलू लागला, त्याला उलट्याही झाल्या. त्यानंतर त्याची अवस्था गंभीर झाली.

  • Published by:  Priya Lad
माद्रिद, 09 सप्टेंबर : त्याला डॉक्टर व्हायचं होतं. प्रसिद्ध कॉलेजमध्ये त्याचं अॅडमिशनही झालं होतं. त्याआधी मित्रांसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी म्हणून तो गेला. त्यांच्यासोबत कॉकटेल ड्रिंकचा एक घोटच त्याच्यासाठी जीवघेणा ठरला. कॉकटेलचा एक घोट पिताच तरुणाचा मृत्यू झाला. स्पेनमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. ब्रिटनमध्ये राहणारा 18 वर्षांचा शिव मिस्त्री स्पेनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत तो पबमध्ये गेला. तिथं तो कॉकटेल प्यायला. त्यानंतर त्याला घाम आला, त्याचा श्वास फुलू लागला, त्याला उलट्याही झाल्या. त्याने आपल्या मित्रांना इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल करायला सांगितलं. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी शक्य ती सर्व धडपड केली. त्यांनी त्याला 20 मिनिट सीपीआर दिला. त्याच्या मित्रांनी त्याच्या आईवडिलांना फोन केला. त्यांनी त्याला EpiPen नावाचं इंजेक्शन द्यायला सांगितलं. हे वाचा - 'माझ्या शरीरातील तुकडा काढून देतो पण...'; बाबांचा जीव वाचवण्यासाठी 17 वर्षीय लेकाची सुप्रीम कोर्टात धाव त्याची प्रकृती अधिक बिघडू लागल्याने मारबेलातील कोस्टा डेल सोल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथं पोहोचताच डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं. शिव Piña colada हे कॉकटेल प्यायला होता. शिवचे काका कल्पेश मिस्त्री यांनी सांगितलं की, शिवला लहानपणासूनच डेअरी प्रोडक्ट्सची अॅलजी होती. तो जे कॉकटेल प्यायला त्यात नारळाच्या क्रिमऐवजी गायीचं दूध होतं. कॉकटेल पिताच त्याला Anaphylactic Shock हे एलर्जिक रिअॅक्शन झालं. पण त्याचे मित्र, पोलीस, डॉक्टर कुणालाच हे समजलं नाही. हे वाचा - 15 वर्षांच्या मुलाने प्रायव्हेट पार्टसोबत केला नको तो खेळ; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक शिवचं कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या क्लेअर कॉलेजमध्ये त्याचं अॅडमिशन झालं होतं. तिथून तो मेडिसीनचं शिक्षण घेणार होता. पण डॉक्टर होण्याचं स्वप्नं पूर्ण होण्याआधी कॉकटेलच्या एका घोटाने त्याच्या आयुष्याचा शेवट केला. आज तकच्या वृत्तानुसार जुलैमध्ये घडलेली ही घटना, जी आता समोर आली आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle, World news

पुढील बातम्या