मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Breast Cancer: ब्रा वापरल्याने होतो ब्रेस्ट कॅन्सर? वाचा काय सांगतात तज्ञ

Breast Cancer: ब्रा वापरल्याने होतो ब्रेस्ट कॅन्सर? वाचा काय सांगतात तज्ञ

आरोग्य आणि खाण्यापिण्याबाबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा या गोष्टींचा प्रत्यक्षात काही संबंध नसतो.

आरोग्य आणि खाण्यापिण्याबाबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा या गोष्टींचा प्रत्यक्षात काही संबंध नसतो.

आरोग्य आणि खाण्यापिण्याबाबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा या गोष्टींचा प्रत्यक्षात काही संबंध नसतो.

मुंबई, 9 ऑगस्ट-   आरोग्य आणि खाण्यापिण्याबाबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा या गोष्टींचा प्रत्यक्षात काही संबंध नसतो. उलट त्यामुळे गैरसमजच पसरतात. अशा काही गोष्टींवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात आणि काहीही विचार न करता अशा गोष्टी केल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणामही होऊ शकतो. महिलांच्या आरोग्याबाबत तर अशा अनेक गोष्टी विचार न करता व्हायरल केल्या जातात. ब्रेस्ट कॅन्सरबाबतही अशीच अनेक मिथ्यं सोशल मीडियावर प्रचलित आहेत. ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सर  होऊ शकतो हा असाच एक समज. तसंच काळ्या रंगाची ब्रा किंवा अंडरवायर घट्ट बसणारी ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो असंही सर्रास पसरवलं जातं. Onlymyhealth या वेबसाईटवर याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो का? ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सर  होतो हा ब्रेस्ट कॅन्सरबाबत सर्वांत मोठा गैरसमज आहे. पण ब्रा आणि ब्रेस्ट कॅन्सर यांचा काहीही थेट संबंध नाही असं स्टार मॅटर्निटी हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विजयलक्ष्मी यांनी Onlymyhealth ला सांगितलं. ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो हा निव्वळ एक चुकीचा समज आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे असं विजयलक्ष्मी यांनी सांगितलं. अंडरवायर ब्रा  किंवा खूप जास्त घट्ट बसणारी ब्रा वापरल्याने ब्रेस्टच्या लिंफमध्ये सर्क्युलेशनवर परिणाम होतो. ‘ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रा वापर यांच्यात काहीही संबंध नाही. हा केवळ एक गैरसमज आहे.’ असं अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका अभ्यासात म्हटलं आहे. लठ्ठपणा आणि शरीराचं आरोग्य, आरोग्याचे अन्य घटक ब्रेस्ट कॅन्सर होण्यास कारणीभूत असतात; पण ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो असं म्हणणं चुकीचं आहे. रात्री ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो का? रात्री ब्रा घालून झोपल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो हाही अगदी सहजपणे पसरलेला गैरसमज आहे. याबद्दल विविध प्रकारचे सल्ले सोशल मीडियावर दिले जातात. ‘रात्री ब्रा घालून झोपणं, अंडरवायर ब्रा घालून झोपणं याच्याशी ब्रेस्ट कॅन्सरचा काहीही संबंध नाही,’ असं इन्स्टाग्रामवर आरोग्यविषयक माहिती शेअर करणाऱ्या मिलेनियल डॉक्टर तनाया यांनी स्पष्ट केलं आहे. काळ्या रंगाची ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो हाही एक असाच गैरसमज आहे. त्यामुळे अनेक महिला काळ्या रंगाची वापरणं टाळतात; पण काळ्या रंगाची ब्रा वापरणं आणि ब्रेस्ट कॅन्सर यांचा काहीही संबंध नाही. या सगळ्या अफवा आहेत, असं ब्रेस्ट हेल्थ एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या  एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ब्रा घालणं आणि ब्रेस्ट कॅन्सर यांचा काहीही संबंध नाही, असं अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या एका रिपोर्टमध्येही स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो असं नसून या दोन्ही गोष्टींमध्ये काहीही संबंध आढळलेला नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे वाचा:Running Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज इतके किलोमीटर धावा; अनेक आजारांपासूनही राहाल दूर कॅन्सर होण्यामागे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा आणि वाईट जीवनशैलीशिवाय काही अनुवंशिक कारणंही असू शकतात. रेडिएशन, दारु पिणं, धूम्रपान या सवयींमुळेही कॅन्सर होऊ शकतो; पण ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो याबद्दलचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. मात्र ब्रेस्ट कॅन्सरची शंका आली किंवा लक्षणं जाणवू लागली की, लगेचच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी आणि योग्य ते उपचार सुरू करावेत. आरोग्य आणि खाण्यापिण्याशी संबधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून मगच त्यावर विश्वास ठेवावा.
First published:

Tags: Breast cancer, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या