कोलकाता, 24 ऑक्टोबर : बिर्याणी म्हटलं की कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण आता अशाच बिर्याणी लव्हर्ससाठी ही बातमी. बिर्याणी मसाल्यांमुळे लैंगिक जीवनावर परिणाम होतो, असा दावा केला जातो आहे. एका नेत्याने असा दावा करत बिर्याणी दुकानं बंद करण्याची मागणी केली आहे. काही दुकानं बंदही करण्यात आली आहेत.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री रवींद्र नाथ घोष यांनी आरोप केला आहे की, बिर्याणीत वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे लैंगिक इच्छा प्रभावित होते आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत तक्रारी येत आहेत. बिर्याणी कोणते मसाले वापरले जात आहेत, ज्यामुळे सेक्शुअल ड्राइव्हवर परिणाम होतो आहे, ते या लोकांना माहिती नाही.
हे वाचा - प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा ज्यूस चढवल्याने Dengue रुग्णाचा मृत्यू; आता रुग्णालयावर मोठी कारवाई
बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील लोक बिर्याणी विकत आहेत आणि लायसेन्सशिवायच दुकानं चालवत आहेत. तक्रारीनंतर आम्ही या दुकानात आलो तर त्यांच्याकडे ट्रेड लायसेन्स नव्हतं त्यामुळे दुकानं बंद केली.
बिर्याणीत कोणते मसाले वापरले जातात?
बिर्याणी प्रामुख्याने व्हेज आणि नॉनव्हेज मिळते. यात तांदूळ, भाज्या, मांस, अंडी असे वेगवेगळे प्रमुख पदार्थ वापरले जाता. यात खास भारतीय मसाले वापरले जातात. ज्यात बडीशेप, काळी मिरी, हिरवी वेलची, काळी वेलची, बडीशेप,, जायफळ, धणे, तमालपत्र, दालचिनी, मोठी वेलची, हळद, लवंग आणि सर्व-मसाले टाकले जातात.
हे वाचा - धक्कादायक! डोक्यावर केस आले नाहीतच पण असा परिणाम झाला की...; त्याने स्वतःलाच संपवलं
हे मसाले वेगवेगळे बिर्याणी बनवणारे आपापल्या पद्धतीने वापरतात. सर्व मसाल्यांच्या ऐवजी, काही लोक कमी मसाले घालतात आणि काहीजण त्यात जास्त मसाले घालतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual health, Viral, West bengal