तिळामध्ये मोनो सॅचुरेटेड फॅटी Asid असतं ज्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रोलला कमी करता येतं. सातत्याने आपल्या आहारात तिळाचा समावेश केल्यास त्यामुळे ह्रदयविकाराला आळा घालता येऊ शकतो. तिळात सेसमीन Antioxidant असतं ज्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोकाही कमी करता येतो. आपल्याला येणारा ताण आणि डिप्रेशनही तिळाच्या नियमित सेवनामुळे कमी करता येऊ शकतं. तिळात असलेल्या कॅल्शियम, आयर्न मॅग्नेशियम आणि सेलेनियममुळे आपल्या मांसपेशी मजबूत होतात. त्याचबरोबर त्यात असलेल्या हायट्री प्रोटीन आणि Amino Acid मुळे हाडांचे विकार कमी होण्यास मदत होते. तिळाचं तेल हे आपल्या त्वचेसाठीही फार उपयुक्त असतं. त्यामुळे त्वचाही मुलायम होते.