नवी दिल्ली, 22 जानेवारी - Ayurvedic Immunity Booster For Omicron : कोरोना (Corona)च्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट खूपच वेगाने फैलावत आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटप्रमाणे ओमायक्रॉन (Omicron) पासून संरक्षण मिळण्यासाठीसुद्धा इम्युनिटी (Immunity) बूस्ट करणे आवश्यक मानलं जात आहे. शरीरातली इम्युनिटी स्ट्राँग झाली, की कोणत्याही प्रकारच्या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी ती मोठं हत्यार सिद्ध होऊ शकते. व्हायरस वेगानं वाढत असताना स्वतःची इम्युनिटी स्ट्राँग ठेवून आपण यापासून वाचू शकतो. त्यासाठी काही घरगुती आणि आयुर्वेदिक (Ayurvedic Immunity Booster) पदार्थ इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. यामध्ये तुळशीची पानं (Basil leaves), हळद (Turmeric), आणि काळे मिरे (Black pepper) महत्त्वाचे आहेत.
या पदार्थांचे सेवन का करावे
तुळस, हळद आणि काळ्या मिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीव्हायरल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुण असतात. हे आयुर्वेदिक पदार्थ सर्दी, ताप, खोकला यापासून दूर ठेवतातच, शिवाय कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्याचं काम करतात.
हे पदार्थ अंगदुखी, पचनाच्या समस्या, थकवा या तक्रारी कमी करण्यास मदत करतात. यामध्ये अँटीऑक्सिशडंट्स गुणही असतात. तसेच भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात. या सगळ्या गोष्टी कोरोनाचे प्रत्येक व्हेरिएंटपासून ते सिजनल आजारांना दूर ठेवण्याचं काम करतात.
तुळशीच्या पानांचे गुण
तुळशीच्या पानांमध्ये कॅम्फिन, सिनेऑल आणि युजेनॉल असतात. हे गुण बॅक्टेरिया आणि व्हायरस संसर्गापासून इम्युन सिस्टिमला बळकट ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे तुम्ही काढा, चहा किंवा घरगुती उपचारात तुळशीचा समावेश केला तर ती विविध आजारांपासून वाचवण्यास मदत करते.
काळे मिऱ्यांचे गुण
काळे मिऱ्यांचे सेवन केल्यानं ताप, सर्दी-खोकला आणि संसर्गापासून वाचता येऊ शकतं. काळ्या मिऱ्यांमध्ये असे काही गुण असतात, ज्यानं चयापचन, आतड्यांचे आरोग्य आणि मेंदूची काम करण्याची क्षमता सुधारण्याचं काम करतात.
हळदीचे गुण
हळदीमध्ये करक्युमिन नावाचं एक एक्टिव्ह कंपोनंट असतं. जे वेदना आणि जखम भरून काढण्याचं काम करतं. चयापचन आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठीसुद्धा करक्युमिन महत्त्वाची भूमिका निभावू शकतं. जर तुम्ही दुधात हळद टाकून ते सेवन केलं, तर त्यानं इतर फायदेही मिळतात. म्हणजेच स्लीप डिसऑर्डर, फ्लू यापासून दिलासा मिळतो.
इम्युनिटी वाढवण्यासाठी असं करा सेवन
तुम्ही एका ग्लास पाणी उकळून घ्या. त्यामध्ये 5 ते 6 तुळशीची पानं, 2 चिमूट काळे मिरे, एक तुकडा बारीक केलेली हळद घाला आणि उकळून घ्या. पाणी निम्मे झाल्यानंतर त्यामध्ये मध घालून चहा पितो तसं प्या. जर गोड आवडत नसेल, तर तुम्ही चवीनुसार काळे मीठ आणि लिंबू टाकून पिऊ शकता.
(Disclaimer – या लेखामध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. यावर अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Health, Health Tips, Omicron