नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : देशात कोरोनानंतर आता डेंग्यू, विषाणूजन्य ताप आदी आजारांनी लोकांना घेरलंय. अशा परिस्थितीत रोगांच्या उपचारांव्यतिरिक्त लोकांना घरी राहण्याचा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा सल्ला दिला जात आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि ते रोगांचे बळी होऊ नयेत यासाठी आता आयुष मंत्रालय (Ayush ministry) पुढाकार घेत आहे. लोकांना आयुष आहार (Ayush Aahar) स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्याची तयारी मंत्रालय करत आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांनी आज मंत्रालयाला देशात आयुष आहाराच्या वापराला प्रोत्साहन देण्यास सांगितलं, जेणेकरून जंक फूडमुळं (Junk Food) आजारांनी ग्रस्त असलेल्या तरुणांना निरोगी ठेवता येईल. यासाठी मंत्रालय आणि दोन्ही राष्ट्रीय आयोगांच्या अंतर्गत पाच संशोधन परिषदांचे शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांना योग्य पावलं उचलण्यास सांगण्यात आलं आहे. यासाठी सुपोषित भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आयुष मंत्रालय केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या (MWCD) पोषण अभियानासह (Poshan Abhiyan) एकत्र काम करतील. तसंच, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या सहकार्यानं, आयुष मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहार योजना वाढवण्याचं आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. हे वाचा - नवरदेव बूट देईना म्हणून सटकली; लग्नमंडपातच मेहुणीने भावोजीसोबत काय केलं पाहा VIDEO केंद्रीय मंत्र्यांनी जनकपुरी येथील आयुर्वेदिक (Ayurvedic), योग (Yoga), निसर्गोपचार (Naturopathy), युनानी (Unani) आणि होमिओपॅथी (Homeopathy) या पाच संशोधन परिषदांच्या शास्त्रज्ञांना आयुषशी संबंधित सर्व बाबी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. यासाठी शास्त्रज्ञ, प्राध्यापक, डॉक्टर, तांत्रिकदृष्ट्या कुशल लोकांची पात्रता देशहितासाठी वापरली पाहिजे, असंही म्हटलं आहे. हे वाचा - कोरोनाऐवजी काढ्यानेचे पाडलं आजारी; व्हायरसचा काटा काढता काढता बळावले इतर आजार देशातील आदिवासींच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी सोनोबल यांनी परिषदेला माहिती दिली. आदिवासींच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या स्थानिक स्वास्थ्य परंपरा समजून घेण्याची गरज आहे. आदिवासी कोणत्याही आरोग्य सेवा सुविधा नसतानाही निरोगी राहतात हे लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून त्यांच्या आरोग्याशी संबंधिक बाबी अधिक खोलवर समजून घ्याव्या लागतील. आदिवासींच्या आणि इतर देशवासियांच्या आरोग्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.