मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Male Infertility: फक्त लाइफस्टाइलच नव्हे; या कारणांनीही पुरुषांमध्ये वांझपणा वाढतोय

Male Infertility: फक्त लाइफस्टाइलच नव्हे; या कारणांनीही पुरुषांमध्ये वांझपणा वाढतोय

बहुतेक पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कारण शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची गुणवत्ता खराब असते. शुक्राणूंच्या खराब गुणवत्तेचे मुख्य कारण आधुनिक जीवनशैली आहे, ज्यामध्ये प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी सर्वात जबाबदार आहेत.

बहुतेक पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कारण शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची गुणवत्ता खराब असते. शुक्राणूंच्या खराब गुणवत्तेचे मुख्य कारण आधुनिक जीवनशैली आहे, ज्यामध्ये प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी सर्वात जबाबदार आहेत.

बहुतेक पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कारण शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची गुणवत्ता खराब असते. शुक्राणूंच्या खराब गुणवत्तेचे मुख्य कारण आधुनिक जीवनशैली आहे, ज्यामध्ये प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी सर्वात जबाबदार आहेत.

नवी दिल्ली, 28 मार्च : वैद्यकीयदृष्ट्या जेव्हा एखादा माणूस सतत वर्षभर महिलेशी संबंध ठेवूनही मूल जन्माला घालू शकत नाही, तेव्हा त्याला वंध्यत्व किंवा वांझपणा म्हणतात. मात्र, यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघांची चाचणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून वंध्यत्व पुरुषात आहे की स्त्रीमध्ये, हे निश्चित केले जाऊ (Male Infertility problem) शकते.

साधारणपणे, टेस्ट करण्यापूर्वी बहुतेक प्रकरणांमध्ये स्त्रियांना वंध्यत्वासाठी जबाबदार मानलं जातं. परंतु, अनेक प्रकरणांमध्ये पुरुषही याला जबाबदार असतात. बहुतेक पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कारण शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची गुणवत्ता खराब असते. शुक्राणूंच्या खराब गुणवत्तेचे मुख्य कारण आधुनिक जीवनशैली आहे, ज्यामध्ये प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी सर्वात जबाबदार आहेत. पाश्चात्य देशांमध्ये, दर 8 पुरुषांपैकी एक पुरुष वंध्यत्वाचा बळी ठरला आहे. तसेच सेलफोन, लॅपटॉप, प्लास्टिक इत्यादी शुक्राणूंचे शत्रू आहेत. याशिवाय हवेत जितके विषारी घटक वाढत जातात तितकेच पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होतो.

पुरुषांमध्ये वंध्यत्वाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत -

एका अभ्यासात म्हटले आहे की, वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी होऊ लागली आहे. याबाबत संशोधकांनी चिंता व्यक्त केली असून वातावरणात रासायनिक किंवा विषारी घटकांचे प्रमाण जितके जास्त असेल तितके पुरुषांमध्ये वंध्यत्व वाढेल. 1990 च्या दशकापासून संशोधक याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.

1992 च्या एका अभ्यासात असे समोर आले की, गेल्या 60 वर्षांमध्ये पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. 2017 मध्ये एक अहवाल देखील आला होता ज्यात असे म्हटले होते की, 1973 ते 2011 दरम्यान पुरुषांच्या शुक्राणूंचे घनत्व (sperm concentration) देखील 50 ते 60 टक्के कमी झाले आहे. सामान्य माणसामध्ये शुक्राणूंची संख्या प्रति मिलीलीटर 1.5 मिली ते 200 कोटी असते.

हे वाचा - साधा चहा नकोच, Diabetes कंट्रोलसाठी हे स्पेशल चहा घ्यायला सुरुवात करा

अनेक संशोधनात असे म्हटले गेले आहे की पुरुषांमधील अंतःस्रावी ग्रंथी इंडोक्राइन (endocrine) प्रभावित होत आहे, ज्यामुळे प्रजनन क्षमता संतुलित करणारे संप्रेरक बिघडत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्लास्टिकमधून सोडलेले हानिकारक रासायनिक प्लास्टिसायझर. म्हणजेच प्लास्टिकमुळे प्रजननक्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. प्लास्टिकमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक रसायनांना प्लास्टिसायझर्स म्हणतात.

हे वाचा - Hair Care Tips: अनेक उपाय करूनही केसांची वाढ होत नाही, ही कारणं एकदा तपासा

वायू प्रदूषणामुळे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर हानिकारक विषाणू शुक्राणूंची गुणवत्ता खराब करण्यासाठी जबाबदार आहेत. या व्यतिरिक्त, लॅपटॉप, सेल फोन, मोडेम देखील शुक्राणूंची गुणवत्ता खराब करण्यासाठी जबाबदार आहेत. शुक्राणूंची गती आणि आकार त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळे खराब होतात. हेवी मेटल कॅल्शियम, शिसे, आर्सेनिक, कॉस्मेटिक इत्यादी घटकांचा पदार्थांमध्ये समावेश असल्यानं शुक्राणूंच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात.

First published:

Tags: Sexual health, Sexual wellness