नवी दिल्ली, 17 मार्च : आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण लहान वयातच म्हातारे (Old age) दिसू लागतात. चुकीची जीवनशैली, ताण-तणाव यासारखी अनेक कारणं त्यामागं असू शकतात. सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात, परंतु अनेक वेळा योग्य परिणाम मिळत नाहीत. 'झी न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार आज आपण आवळ्यापासून (Amla health benefit) तयार केलेल्या काही घरगुती उपायांची माहिती पाहुयात. ज्याचा वापर करून तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी तरुण, तजेलदार त्वचा मिळवू शकता.
आवळा त्वचेसाठी फायदेशीर
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय आवळा हा अँटिऑक्सिडेंट घटकांचा मुख्य स्रोत देखील (Amla face pack) आहे. ज्यामुळे आपली त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या कमी होतात. त्वचेसाठी आवळ्याचा वापर कसा करायचा याची माहिती घेऊया.
आवळा अशा प्रकारे चेहऱ्यावर लावा
मुलतानी माती-आवळा
सर्वप्रथम मुलतानी माती, आवळा पावडर एकत्र घ्या
पपईचा लगदा आणि गुलाबजलही घ्या .
आता एका भांड्यात गुलाबपाणी, मुलतानी माती आणि आवळा पावडर पपईच्या लगद्यामध्ये मिसळा.
तयार मिश्रण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा.
हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
असे केल्याने त्वचा चमकदार दिसेल आणि त्वचेवरी डागही कमी होतील.
लाल मसूर डाळ-आवळा
आवळा पावडर, दूध आणि लाल मसूर याचा चांगला फायदा होतो.
सुरुवातीला लाल मसूर रात्री दुधात भिजवा.
दुसऱ्या दिवशी मसूर फुगल्यावर त्यात आवळा पावडर टाका.
हे दोन्ही नीट मिसळून तयार करा.
याची पेस्ट करून चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा.
15 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्यानं धुवा.
असं केल्यानं त्वचा नैसर्गिकरीत्या चमकदार दिसेल.
हे वाचा - Weight Loss Drinks: बेली फॅटला फास्ट कमी करतात ही ड्रिंक्स; तुम्हीही वापरून पाहा
हळद-आवळा
ही पेस्ट बनवण्यासाठी आवळा पावडर आणि हळद असणे आवश्यक आहे.
एक चमचा आवळा पावडरमध्ये चिमूटभर हळद मिसळा.
पाणी घालून चांगली पेस्ट तयार करा.
आता ही पेस्ट थोडा वेळ तशीच झाकून ठेवा.
तयार मिश्रण 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा.
15 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्यानं धुवा.
यामुळं आपली त्वचा अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते.
हे वाचा - लहानपणीच तुमच्या मुलांना शिकवा या 6 गोष्टी; लाइफटाइम त्यांना होईल फायदा
रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं
वरील घरगुती उपायांव्यतिरिक्त सकाळी कोमट पाणी पिणंही त्वचेसाठी गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चेहऱ्यावर म्हातारपणाची लक्षणं दिसत असतील तर याचा अर्थ पोटातही काही तरी बिघाड आहे. कारण तुम्ही जे खातात तेच तुम्ही दिसता. म्हणूनच जेव्हा तुम्ही वाईट गोष्टींचे सेवन करता तेव्हा तुमचे पोट खराब राहते. पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठून कोमट पाणी प्यावे, कारण गरम पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर असते आणि ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. हा निरोगी राहण्यासाठी खूप सोपा उपाय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Face Mask, Health Tips