कृपया किंवा प्लीज म्हणायला शिकवा - लहानपणापासून मुलांना कृपया किंवा प्लीज म्हणायला शिकवा. त्यांना कोणत्या परिस्थितीत कुणाला कृपया किंवा प्लीज म्हणून बोलावं याची सवय लावा. यामुळं त्यांची आणि तुमचीही प्रतिमाचांगली होईल.
धन्यवाद (Thank You) म्हणायला शिकवा - कोणी काही दिलं किंवा मदत केली तर धन्यवाद किंवा थँक यू म्हणायला मुलांना शिकवा. समोरची व्यक्ती वय आणि स्टेटसमध्ये तुमच्यापेक्षा कमी-जास्त असली तरीही आभार मानणं आवश्यक असल्याचं त्यांना सांगा.
सॉरी म्हणण्याची सवय लावा - अनेकदा कितीही मोठी चूक झाली तरी मुलं सॉरी म्हणायला किंवा माफी मागायला किंवा चूक मान्य करायला तयार नसतात. त्यांना सॉरी म्हणायला कमीपणा वाटतो. त्यांना समजावून सांगा की, त्यांच्या छोट्याशा चुकीबद्दलही सॉरी म्हणायला हवं. यामुळं त्यांची प्रतिमा खराब होणार नाही तर ती सुधारेल.
Excuse-Me वापरायला शिकवा मुलांना एक्सक्यूज-मी म्हणण्याची सवय लावा. जेव्हा त्यांना कुणाला काही सांगायचं असेल किंवा कोणाचे लक्ष स्वतःकडे वेधायचे असेल तेव्हा त्यांना Excuse-Me म्हणायला शिकवा. यामुळे समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडते.
परवानगी घेण्यास शिकवा - लहानपणापासून मुलांना परवानगी घेण्याची सवय लावा. त्यांना सांगा की कुठल्याही ठिकाणी जाऊन कोणतेही काम करण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे. तशाच प्रकारे, एखाद्याच्या वस्तूंना स्पर्श करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी, त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा चांगल्या सवयींमुळे केवळ मुलाचेच नाही तर पालकांचे देखील कौतुक होते.
मोठ्या लोकांमध्ये बोलू नका - तुम्ही लहानपणी तुमच्या मुलाला समजावून सांगावे की जेव्हा दोन मोठी माणसे बोलत असतात तेव्हा मुलांनी त्यांच्यात बोलू नये. त्यांना सांगा की पालकांचे बोलणे संपल्यावर तुम्ही त्यांना विचारू शकता.