Home /News /heatlh /

डिलिव्हरीनंतरही पोटात वेदना; 3 महिने उपचार, 5 महिन्यांनी ऑपरेशन करताच डॉक्टरही झाले शॉक

डिलिव्हरीनंतरही पोटात वेदना; 3 महिने उपचार, 5 महिन्यांनी ऑपरेशन करताच डॉक्टरही झाले शॉक

पुरुषांच्या तुलनेत महिलांना मायग्रेनचा त्रास जास्त होतो. तज्ज्ञांच्या मते महिलांच्या मायग्रेनमध्ये मेन्स्टुअल सायकलची महत्त्वाची भूमिका असते. काही महिलांना पिरेडच्या काळात मायग्रेनचा त्रास होतो. पाळीच्या काळात प्रोजेस्टेरॉन आणि एस्टेरॉन हार्मोन्समधील चढउतार मायग्रेनला ट्रिगर करतात.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना मायग्रेनचा त्रास जास्त होतो. तज्ज्ञांच्या मते महिलांच्या मायग्रेनमध्ये मेन्स्टुअल सायकलची महत्त्वाची भूमिका असते. काही महिलांना पिरेडच्या काळात मायग्रेनचा त्रास होतो. पाळीच्या काळात प्रोजेस्टेरॉन आणि एस्टेरॉन हार्मोन्समधील चढउतार मायग्रेनला ट्रिगर करतात.

कित्येक रुग्णालयं फिरून, कित्येक उपचार घेऊनही महिलेला काही बरं वाटलं नाही. शेवटी डॉक्टरांनी तिच्या पोटाची शस्त्रक्रिया केली.

    लखनऊ, 04 मार्च : प्रसूती झाली, एका मुलाला जन्म दिला. पण तरी तिच्या पोटातील वेदना (stomach pain after delivery) काही थांबेनात. डिलिव्हरीनंतरही तिला उलट्या होत होत्या. या त्रासावर तिनं एक-दोन नाही तर तब्बल तीन महिने उपचार घेतले. अखेर डॉक्टरांनी तिच्या पोटाचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि ऑपरेशनमध्ये तिच्या पोटात जे काही सापडलं ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. कारण त्या महिलेच्या पोटाच चक्क टॉवेल (towel in woman stomach) होता. उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) देवरियाच्या खासगी रुग्णालयातील ही धक्कादायक घटना. एका प्रेग्नंट महिलेची डिलिव्हरी झाली. पण त्यानंतर तिला खूप त्रास झाला. ऑगस्ट महिन्यात डिलिव्हरीसाठी ही महिला आपल्या माहेरी गौरीबाजारला आली. तिथं 12 ऑगस्टला एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. तिचं सिझेरियन करण्यात आलं. एका मुलाला तिनं जन्म दिला. पण ऑपरेशननंतर आपल्या पोटात वेदना होत होत्या, उलटीसुद्धा सतत होत होती, असं या महिलेनं सांगितलं. हे वाचा - चेहऱ्याची अशी अवस्था नको असेल तर Beauty Treatment पूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला होत असलेला त्रास तिनं डॉक्टरांना सांगितला. सुरुवातीला तिला अॅनिमिया असल्याचं सांगून नोव्हेंबरपर्यंत तिच्यावर उपचार करण्यात आले. पण या उपचाराचाही काहीच परिणाम दिसून आला नाही. मग तिला हर्निया असल्याचं सांगून गोरखपूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं. गोरखपूरमध्येदेखील तिच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. मग तिला लखनऊला पाठवण्यात आलं. इतकी रुग्णालयं फिरून इतके उपचार घेऊनही महिलेला काही बरं वाटलं नाही. ती पुन्हा आपल्या गावी परतली. तिथं तिला कुणीतरी गोरखपूरला खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. 29 जानेवारीला एका खासगी रुग्णालयात दाखल झाली. 2 फेब्रुवारीला तिचं ऑपरेशन झालं. तेव्हा तिच्या पोटात जे काही दिसलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. हे वाचा - 'टॉयलेट पिक'वाल्या गीता यथार्थ कोण आहेत आणि काय आहे bathroompic कॉन्ट्रव्हर्सी? तिच्या पोटात चक्क टॉवेल होतं. यामुळे तिच्या पोटात इन्फेक्शन पसरलं होतं. गर्भाशयसुद्धा सडलं होतं जे काढून टाकावं लागलं. महिलेची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं सांगितलं जातं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Pregnancy, Stomach pain, Uttar pradesh

    पुढील बातम्या