जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / एक तीळ ठरला जीवघेणा, 20 वर्षांच्या तरुणाचा करुण अंत

एक तीळ ठरला जीवघेणा, 20 वर्षांच्या तरुणाचा करुण अंत

एक तीळ ठरला जीवघेणा, 20 वर्षांच्या तरुणाचा करुण अंत

हातावरचा एक तीळ जीवघेणा ठरेल, अशी कल्पना टॉमने कधीही केली नसेल. मात्र त्या तिळापासूनच त्याच्या मृत्यूची सुरूवात झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 30 जानेवारी: हातावरचा तीळ (Mole) हा कॅन्सर (Cancer) असेल, असं लंडनमध्ये (London) राहणाऱ्या त्या 20 वर्षांच्या तरुणाला (20 year old) स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र हळूहळू त्याची तब्येत खालावत गेली आणि हातावरचा तीळ हा प्रत्यक्षात एक जीवघेणा आजार (Deadly disease) असल्याचं सिद्ध झालं. 2020 वर्षांपूर्वी पहिल्यांदा हा तीळ तरुणाला दिसला, मात्र त्याकडे त्यानं दुर्लक्ष केलं. आपल्या शरीरावर असे अनेक तीळ उठत असतात, मात्र त्याकडे गांभिर्यानं पाहिलं जात नाही. या तरुणाच्या बाबतीत मात्र ही चूक जीवघेणी ठरली आणि हळूहळू त्याची तब्येत बिघडत गेली. स्किन कॅन्सरचा त्रास लंडनमध्ये राहणाऱ्या टॉम लिंटनच्या अंगावर 2020 साली एक तीळ उठल्याचं दिसून आलं. त्यानंतर हळूहळू त्याची तब्येत बिघडू लागली आणि वजनही कमी होऊ लागलं. त्यानंतर त्याच्या छातीत दुखायला सुुरुवात झाली. त्यानंतर त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी डाग उठायला सुुरुवात झाली. डॉक्टरांनाही नेमकं काय झालं असावं, याचा बिलकूल अंदाज येत नव्हता. त्यांनी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. कॅन्सरचे निदान हा melanoma नावाचा गंभीर स्किन कॅन्सरचा प्रकार असल्याचं लक्षात आल्यावर टॉमसह त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनही सरकली. अखेरचा काळ त्याने आपल्या आईवडिलांसोबत घालवला. आपल्या गर्लफ्रेंडला आणि इतर मित्रांना भेटण्याची त्याची प्रचंड इच्छा होती. मात्र कोरोना काळातच त्याचं आजारपण आल्यामुळे त्याला कुणीही भेटू शकलं नाही. आपल्या आईवडिलांसोबत गप्पागोष्टी करत करतच त्याने आपल्या आयुष्याचा निरोप घेतला. अवघ्या 20 वर्षांच्या आयुष्याचा एका गंभीर आजारमुळे अंत झाला. हे वाचा- किम जोंगने केला कहर, 2017 नंतरचं सर्वात मोठं ‘डेअरिंग’ व्यक्त केली अखेरची इच्छा मरण्यापूर्वी टॉमने आपल्या आईवडिलांकडून एक वचन घेतलं. या आजाराविषयी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं आणि जनजागृती करण्याचं ते वचन होतं. आता टॉमचे आईवडिलच नव्हे, तर त्याचे मित्रही शक्य त्या प्रकारे सर्वांपर्यंत या गंभीर आजाराविषयी जनजागृती करण्याचं काम करत आहेत. कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cancer , health , skin , uk
  • First Published :
जाहिरात
जाहिरात