मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Cheese प्रेमींचा 'किंग' : आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज

Cheese प्रेमींचा 'किंग' : आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज

मार्क किंग हा एवढा मोठा चीज प्रेमी आहे, की तो आठवड्याला सुमारे सहा किलो चीज (Cheese) फस्त करतो. विशेष म्हणजे, एवढे चीज खाऊनही 52 वर्षांचा मार्क अगदी ठणठणीत आहे.

मार्क किंग हा एवढा मोठा चीज प्रेमी आहे, की तो आठवड्याला सुमारे सहा किलो चीज (Cheese) फस्त करतो. विशेष म्हणजे, एवढे चीज खाऊनही 52 वर्षांचा मार्क अगदी ठणठणीत आहे.

मार्क किंग हा एवढा मोठा चीज प्रेमी आहे, की तो आठवड्याला सुमारे सहा किलो चीज (Cheese) फस्त करतो. विशेष म्हणजे, एवढे चीज खाऊनही 52 वर्षांचा मार्क अगदी ठणठणीत आहे.

नवी दिल्ली 19 एप्रिल : 'चीज' म्हटलं, की जवळपास सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. सँडविच (Sandwich), बर्गर, पिझ्झा (Pizza) अशा पदार्थांमध्ये तर आपण 'एक्स्ट्रा चीज' मागून घेतो. शिवाय कित्येकांना चीज स्लाइसेस नुसत्याही दिल्या तरी ते आवडीने खातात. अगदी साधं चीज (Cheese ) असो, मोझरेल्ला, पर्मसन किंवा चॅडर चीज प्रेमींना ते कोणत्याही रुपात आवडतंच!

चीजप्रेमी आणि चीज यांच्या प्रेमातील एकमेव अडथळा म्हणजे कॅलरीज. चीजमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल आणि चीज याचा छत्तीसचा आकडा आहे. चीजमधील याच वाईट गोष्टीमुळे कित्येक लोक चीज खाऊ वाटत असूनही आपला हात आखडता घेतात. मात्र, इंग्लंडच्या केंट शहरातील मार्क नावाची व्यक्ती याला अपवाद आहे. मार्क किंग हा एवढा मोठा चीज प्रेमी आहे, की तो आठवड्याला सुमारे सहा किलो चीज फस्त करतो. विशेष म्हणजे, एवढे चीज खाऊनही 52 वर्षांचा मार्क अगदी ठणठणीत आहे. आपली पत्नी ट्रेसीने बनवलेल्या सँडविचेस सोबत मार्क दररोज चीजचे दोन अख्खे ब्लॉक संपवतो आणि तरीही त्याचे 8-पॅक अ‌ॅब्स (Eight-pack Abs) आहेत

मार्क दुपारच्या जेवणात 400ग्रॅम आणि रात्रीच्या जेवणात 400 ग्रॅम चीजपासून बनविलेले सँडविच खातो. गेल्या 25 वर्षात मार्कने जेवणात तब्बल 7,280 किलोग्राम चीज खाल्ल्याची माहिती त्यांने लॅड बायबलला दिली.

मार्क सांगतो की, "मी सँडविचमध्ये बोव्हरील, मार्माइट (Marmite),काळी मिरी, मेयो, पाटे, सीफूड स्प्रेड (seafood spread), सॉसेज यापैकी काहीही खातो. मात्र, त्याच्यासोबत चीज असतेच. हे खाऊन मला कधी छातीत जळजळ (heartburn), अपचन यापैकी काहीच झालं नाही. चीज जितके स्ट्राँग तितकेच चांगले, असेही मार्क म्हणतो.”

मार्कने सांगितले, की त्याच्याकडे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी सँडविचमध्ये 400 ग्रॅम चीज असते. तेवढे चीज दर आठवड्यात 22,513 कॅलरीज वाढवते. एवढे चीज खाऊनही मार्क एकदम निरोगी असून त्याचे वजन केवळ 92 किलो आहे आणि त्याचे 8 पॅक अॅब्स आहे, असे त्याच्या पत्नीने सांगितले. तर, “मार्क अजूनही उत्तम शेपमध्ये आहे. तो दररोज दिवसभर लाकडी खोडं उचलतो, त्यामुळे त्याच्या कॅलरीज बर्न व्हायला मदत होते." असे त्याची पत्नी म्हणाली.

"आम्ही घरात सध्याकाळी 6 च्या सुमारास रात्रीचे जेवण करतो. त्यानंतर रात्री10.30 ते11.15 वाजताच्या दरम्यान मार्क सँडविच खातो. मार्क नेहमीच इतके चीज खातो. मात्र, त्याचा त्याला कधीही त्रास झाला नाही," असे मार्कच्या पत्नीने सांगितले.

First published:
top videos

    Tags: Cheese, Cottage cheese, Food, Health Tips, Kg