जाहिरात
मराठी बातम्या / गोवा / Goa Election: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात आढळला गांजा, छापेमारीत एकाला अटक

Goa Election: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात आढळला गांजा, छापेमारीत एकाला अटक

Goa Election: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात आढळला गांजा, छापेमारीत एकाला अटक

Goa Assembly Election: ऐन निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असताना, गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर (Raid at Prashant kishor’s Office) यांच्या काही कार्यलयांवर छापेमारी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पणजी, 12 फेब्रुवारी: सध्या गोव्यात निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले असून विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोव्यात तृणमूल काँग्रेसला निवडून आणण्यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची I-PAC ही संस्था ग्राउंडला काम करत आहे. ऐन निवडणुकीची धाकधूक शिगेला पोहोचली असताना, गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या काही कार्यलयांवर छापेमारी (Raid at Prashant kishor’s Office) केली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी पोरवोरिम शहरातून प्रशांत किशोर यांच्या एका कर्मचाऱ्याला अटक (Accused Employee Arrest) केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीकडून काही अमली पदार्थ देखील जप्त (cannabis seized) केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांनी शुक्रवारी पोरवोरिम शहरातील अनेक बंगल्यांवर छापे टाकले आहेत. येथील 8 बंगले I-PAC या संस्थेनं भाड्यानं घेतले आहे. येथूनच गोव्यातील निवडणुकीच कामकाज पाहिलं जात आहे. या छापेमारीत गोवा पोलिसांनी I-PAC च्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. हेही वाचा- अरे बाप रे! आठवलेंचा शशी थरूरना इंग्रजीबद्दल सल्ला; स्पेलिंगच्या चुकाही काढल्या अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं वय 28 आहे. पोलिसांनी त्याच्यावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.खरंतर, गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर गोव्यात टीएमसी पक्षासाठी रणनीती तयार करण्याचं काम करत आहेत. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोवा पोलिसांकडून त्यांच्या बंगल्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. हेही वाचा- ‘‘हिजाबवर हात टाकणाऱ्यांचे हात कापून टाकू’’, महिला नेत्याचं वादग्रस्त विधान असं असलं तरी काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेसमधील संबंध बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्रशांत किशोर यांचं एखाद्या राजकीय पक्षाशी संबंध बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक राजकीय पक्षांसोबतचा त्यांचा वाद चव्हाट्यावर आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात