Home /News /goa /

goa exit poll : गोव्यात ममतादीदींची जादू चालणार, शिवसेनेचं काय होणार?

goa exit poll : गोव्यात ममतादीदींची जादू चालणार, शिवसेनेचं काय होणार?

गोव्यात हिंदू मतांवर डोळा ठेवून ममतदीदींच्या पक्षाने जोरदार प्रचार केला

    गोवा, 07 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला धुळ चारल्यानंतर ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत (goa vidhan sabha election 2022) उडी घेतली. गोव्यात हिंदू मतांवर डोळा ठेवून ममतदीदींच्या पक्षाने जोरदार प्रचार केला. पण, आज हाती आलेल्या एक्झिट पोलमध्ये तृणमृल काँग्रेसला (trunmul congress) फारसे चांगले चित्र नसल्याचे सांगितले आहे. तर शिवसेनेला सुद्धा भोपळा फोडता येईल का हे पाहण्याचे ठरणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (goa vidhan sabha election 2022)  मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता दोन दिवसांत विधानसभेची मतमोजणी होणार आहे. पण, आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये (exit poll) भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. या दोन्ही पक्षातच ही लढत पाहण्यास मिळत आहे. पण, ममता बॅनर्जी यांनी हिंदू मतांवर डोळा ठेवून भाजपला शह देण्याची खेळी केली होती. त्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून अशाच उमेदवारांवर भर दिला होता. एवढंच नाहीतर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी गोव्यात निवडणूक लढली पाहिजे असा सल्ला दिला होता. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने जोरदार प्रचार केला. पण, एक्झिट पोलमध्ये एकही जागा तृणमूलला दाखवली नाही. तर दुसरीकडे, शिवसेनेनं काँग्रेससोबत हातमिळवणी करून निवडणुकीचा प्लॅन रचला होता. पण, काँग्रेसने स्वबळावर नारा देत निवडणूक लढवली. मागील निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे याही वेळी काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा अंदाज काँग्रेसला आहे. त्यामुळे शिवसेनेनं काही ठिकाणी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहे.  पण, एक्झिट पोलमध्ये सेनेला एकही जागा दाखवण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचे चिन्ह आहे. (एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंकवर क्लिक करून मिळेल) गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. झी न्यूज हिंदीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे.  तर आम आदमी पक्षाला 1 ते 3 जागांवर समाधान मानावे लागेल. गोव्याची मगोवा पार्टीला 2 ते 5 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेनेनं सुद्धा नशिब आजमावले आहे. पण सेनेला कोणतीही जागा मिळणार नाही, अशी चिन्ह आहे. झी न्यूज वृत्तवाहिनीचा एक्झिट पोल अंदाज भाजप- 13-18  जागा काँग्रेस+ 14-19 जागगा महाराष्ट्र गोमांतक पार्टी - 2-5 जागा आम आदमी पार्टी - 1-3  जागा इतर 1-3  जागा तर veto च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 14 जागा मिळतील असता अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला सर्वाधिक 16 जागा मिळतील. तर आपला 4 आणि इतर पक्षाला 6 जागा मिळणार असा अंदाज वर्तवला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या