जाहिरात
मराठी बातम्या / गोवा / goa exit poll : गोव्यात पुन्हा फोडाफोडीचे 'सरकार', काँग्रेस ठरू शकतो मोठा पक्ष, पण...?

goa exit poll : गोव्यात पुन्हा फोडाफोडीचे 'सरकार', काँग्रेस ठरू शकतो मोठा पक्ष, पण...?

 महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे.

महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे.

मागील निवडणुकीतही काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला होता. पण, भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन केले होते

  • -MIN READ
  • Last Updated :

गोवा, 07 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (goa vidhan sabha election 2022)  मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता दोन दिवसांत विधानसभेची मतमोजणी होणार आहे. पण, आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये (exit poll) कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दाखवले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी मागील निवडणुकीप्रमाणाने फोडाफोडी करून सरकार स्थापन करण्याची चिन्ह आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. झी न्यूज हिंदीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे.  तर आम आदमी पक्षाला 1 ते 3 जागांवर समाधान मानावे लागेल. गोव्याची मगोवा पार्टीला 2 ते 5 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेनेनं सुद्धा नशिब आजमावले आहे. पण सेनेला कोणतीही जागा मिळणार नाही, अशी चिन्ह आहे. झी न्यूज वृत्तवाहिनीचा एक्झिट पोल अंदाज भाजप- 13-18  जागा काँग्रेस+ 14-19 जागगा महाराष्ट्र गोमांतक पार्टी - 2-5 जागा आम आदमी पार्टी - 1-3  जागा इतर 1-3  जागा तर veto च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 14 जागा मिळतील असता अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला सर्वाधिक 16 जागा मिळतील. तर आपला 4 आणि इतर पक्षाला 6 जागा मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. (एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंक वर क्लिक करून मिळेल) त्यामुळे याही वेळी काँग्रेस हा मोठा पक्ष ठरण्याची चिन्ह आहे. पण, मागील निवडणुकीतही काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला होता. पण, भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन केले होते. याही वेळी गोवेकरांनी कोणत्याही पक्षाच्या पारड्यात स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे यंदाही फोडाफोडीचे सरकार गोव्यात येण्याची चिन्ह आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात