जाहिरात
मराठी बातम्या / गोवा / goa election 2022 : गोव्याचा निकाल यंदा बदलणार चेहरा, मतदानांची टक्केवारी ठरवणार भवितव्य?

goa election 2022 : गोव्याचा निकाल यंदा बदलणार चेहरा, मतदानांची टक्केवारी ठरवणार भवितव्य?

  गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात मात्र यंदा विक्रमी मतदान झालंय.

गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात मात्र यंदा विक्रमी मतदान झालंय.

गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात मात्र यंदा विक्रमी मतदान झालंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

पणजी, 14 फेब्रुवारी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (goa assembly election 2022) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आरामदायक आणि शांतता प्रिय जीवन जगण्याऱ्या गोवेकरांनी यंदा घरातून बाहेर पडत विक्रमी मतदानांची (goa voting) नोंद केली आहे. गोव्यात 78.94 टक्के मतदानांची नोंद झाली आहे.  त्यामुळे प्रस्तापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र राज्यात निवडणूका असल्या की दिवशा प्रत्यक्ष आणि रात्री अप्रत्यक्ष निवडणूक प्रचार करायचा हे महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना चांगलेच माहिती आहे. तीच पद्धत गोव्यात वापरुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला खरा पण काही ठिकाणी गोयेंकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले तर काही मतदारांनी तर थेट कार्यकर्त्यांच्या तोंडावरच सांगुन टाकले आम्ही तुम्हाला अजिबात मतदान करणार नाही. आज १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे असतानाही गोयेंकरांनी मोठ्या संख्येने घरा बाहेर पडून मतदान केलं. पहाटे ६ वाजेपासूनच गोयेंकरांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गर्दी केली होती. आश्चर्य म्हणजे दुपारी १२ वाजताच ५५ टक्के गोवेकरांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि ऐरवी दुपारी सुशेगात असणारे गोयेंकरांनी दुपारच्या वेळी ही मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. तर दिवसाच्या शेवटी जवळपास ७८.९४ टक्के गोयेंकरांनी मतदाने केलं. दिवसभरात मतदारांनी दाखवलेला उत्साह पाहता यंदा गोवा राज्यात ८५ ते ९० टक्क्यांच्या पुढे मतदान होईल असं बोललं जात होतं पण २०१७ विधानसभा निवडणूकीची मतदान टक्केवारी ८१.२१ आहे याची तुलना केली तर जवळपास ३ टक्के मतदारांनी यावेळेस मतदानच केले नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तसं पहायला गेलं तर ४ ते ७ टक्के नवीन तरुण मतदार यांनी केलेले मतदान यामुळे यंदा आकडेवारी वाढेल असं बोललं जात होतं पण तसं मात्र होताना दिसले नाही. गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात मात्र यंदा विक्रमी मतदान झालंय. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ८९.६४ टक्के मतदान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साकलेम या मतदार संघात झाले आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत हे मतदान फारच जास्त आहे. हे वाढीव मतदान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना नुकसानदायक ठरते की फायदेशीर हे लवकरच स्पष्ट होईल. गोवा राज्यात  बेनालिअम या मतदार संघात सर्वात कमी ७०.०२ टक्के मतदान या मतदार संघात झाले आहे. तसंच उत्तर गोव्यात ७९.५६ टक्के मतदान झाले असून दक्षिण गोव्यात ७८.२२ टक्के मतदान झालंय. निवडणुकीदरम्यान मतदारांना आकर्षित करण्याकरता अनेक राजकीय पक्षांनी वाटण्याकरता आणलेले तब्बल ६ कोटी ६० हजार ५८ हजार रोख रक्कम निवडणूक आयोगाने जप्त केली. शिवाय ४ कोटी रुपयांचे मद्य, सव्वा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ असा एकूण १२ कोटी ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल निवडणूक आयोगाने जप्त केला आहे. याचा फायदा भाजपाला होतो की विरोधी पक्षांना ते १० मार्च याच दिवशी स्पष्ट होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात