Home /News /goa /

गोव्यात भाजपला आणखी एक धक्का, माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाला ठोकला 'रामराम'

गोव्यात भाजपला आणखी एक धक्का, माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाला ठोकला 'रामराम'

भाजपमध्ये कुणीच आपले विचार मोकळेपणाने ठेवू शकत नाही. काही बाहेरच्या लोकांनी पक्षावर कब्जा केला आहे.

भाजपमध्ये कुणीच आपले विचार मोकळेपणाने ठेवू शकत नाही. काही बाहेरच्या लोकांनी पक्षावर कब्जा केला आहे.

भाजपमध्ये कुणीच आपले विचार मोकळेपणाने ठेवू शकत नाही. काही बाहेरच्या लोकांनी पक्षावर कब्जा केला आहे.

    गोवा, 22 जानेवारी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) भाजपला एकापाठोपाठ एक हादरे बसत आहे. दिवगंत नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर ((Utpal Parriakr) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आता त्यांच्यापाठोपाठ भाजपचे माजी लक्ष्मीकांत पार्सेकर ( Laxmikant Parsekar) यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. गोवा विधानसभा रणधुमाळीत सत्ताधारी असलेल्या भाजपल्या एकापाठोपाठ हादरे बसत आहे. उत्पल पर्रिकर यांनी पणजीमधून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर सुद्धा अपक्ष निवडणूक लढवणार असण्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. गेल्या अनेक वरजवर्षांपासून आपण भाजपचे सदस्य होते. पण मला कधीही सन्मानाचे स्थान दिले नाही. त्यामुळे मी पक्षामध्ये न राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहे, लवकरच याबद्दल घोषणा करणार आहे, असं पार्सेकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, भाजपमध्ये कुणीच आपले विचार मोकळेपणाने ठेवू शकत नाही. काही बाहेरच्या लोकांनी पक्षावर कब्जा केला आहे. मनोहर पर्रिकर असताना कधीच कुणाला दुखावले गेले नाही. लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात होतं आणि विचार केला जात होता पण आता ही परंपरा संपुष्टात आली आहे, अशी टीकाही पार्सेकर यांनी केली, असं वृत्त आजतक वाहिनीने दिले आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षातूनच काही जण विरोध करत होते. त्यांना तिकीट भेटू नये म्हणून काही जण प्रयत्न करत होते. पण पार्सेकर यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नव्हती. उलट काँग्रेसमधून आलेल्या आयात उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. त्याने मतदारसंघात कोणतेही काम केले नाही. पण तरीही मला डावलून तिकीट देण्यात आले, अशी नाराजीच पार्सेकर यांनी बोलून दाखवली. उत्पल पर्रिकर यांना आपची ऑफर दरम्यान, उत्पल पर्रिकर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करावा आणि निवडणूक लढवावी, अशी जाहीर ऑफर आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) यांनी दिली आहे. उत्पल पर्रिकर यांना भाजपने त्यांचा मतदारसंघ असलेल्या पणजीतून तिकीट देण्यास नकार दिला आहे. मनोहर पर्रिकर यांनी भाजपसाठी पूर्ण आयुष्य वेचूनही त्यांचा मुलाला तिकीट मिळवण्यासाठीदेखील इतका संघर्ष करावा लागणं चुकीचं आहे. भाजपने पर्रिकर यांच्याबाबतही 'यूज अँड थ्रो' धोरणच राबवलेलं दिसत आहे. मात्र पर्रिकर हे भाजपचे असले तरी आपल्यासाठी आदर्श नेते होते आणि त्यांच्या कार्याचा आपण नेहमीच गौरव केल्याचं केजरीवाल म्हणाले. त्यामुळे उत्पल यांनी पणजीतून निवडणूक लढवावी आणि त्यांना आम आदमी पक्ष तिकीट देईल, अशी ऑफर त्यांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या