Home /News /goa /

goa exit poll : गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, सेनेला भोपळा?

goa exit poll : गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, सेनेला भोपळा?

भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे.

    गोवा, 07 मार्च : पाच राज्यांच्या निवडणुकीची (Assembly Election Result 2022 ) प्रचाराची रणधुमाळी आता थांबली आहे. त्यामुळे सर्वांची प्रतिक्षा मतमोजणीकडे लागली आहे. गोवा विधानसभा (goa vidhan sabha election 2022) निवडणुकीत यावेळी अभुतपूर्व अशी परिस्थितीत पाहण्यास मिळाली होती. त्यामुळे गोव्यात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशातच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. यामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. झी न्यूज हिंदीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे.  तर आम आदमी पक्षाला 1 ते 3 जागांवर समाधान मानावे लागेल. गोव्याची मगोवा पार्टीला 2 ते 5 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेनेनं सुद्धा नशिब आजमावले आहे. पण सेनेला कोणतीही जागा मिळणार नाही, अशी चिन्ह आहे. झी न्यूज वृत्तवाहिनीचा एक्झिट पोल अंदाज भाजप- 13-18  जागा काँग्रेस+ 14-19 जागगा महाराष्ट्र गोमांतक पार्टी - 2-5 जागा आम आदमी पार्टी - 1-3  जागा इतर 1-3  जागा उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत दरम्यान, पहिल्या EXIT POLL चा निकाल बाहेर येत आहे. रिपब्लिक टीव्हीने दाखवलेल्या मतदानोत्तर चाचणीत - UP Exit Polls 2022 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीसारखं निर्विवाद घवघवीत यश मात्र योगी सरकार टिकवू शकणार नाही असं चित्र आहे. (एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंकवर क्लिक करून मिळेल) रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 262 ते 272 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समजावादी पक्षाला 119 ते 134 जागा मिळतील. समाजवादीच्या जागा वाढलेल्या असल्या तरी काँग्रेस आणि बसपाचा सपशेल पराभव होण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातलं मतदान (UP Assembly election 2022)सोमवारी पार पडलं. मतदानोत्तर कल चाचणीत (Exit Polls 2022)कुठल्या पक्षाचं पारडं जड असेल आणि कोण कुणाला धूर चारेल याचा अंदाज येऊ शकतो. उत्तर प्रदेशात 403 जागांच्या विधानसभेसाठी मतदारांनी कौल दिला आहे. याचा निकाल गुरुवारी 10 मार्चला लागेल. एकूण 7 टप्प्यात मतदान झालं. त्यापैकी अखेरच्या टप्प्यातलं मतदान 7 मार्चला मतदान यंत्रात बंदिस्त झालं आणि Exit Polls चा कल यायला सुरुवात झाली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या