मराठी बातम्या /बातम्या /goa /

Goa Elections: AAP च्या तिकीटावर लढा, भाजपने डावलल्यावर केजरीवालांची उत्पल पर्रिकरांना जाहीर ऑफर

Goa Elections: AAP च्या तिकीटावर लढा, भाजपने डावलल्यावर केजरीवालांची उत्पल पर्रिकरांना जाहीर ऑफर

उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून तिकीट मिळत नसल्याने त्यांनी आपल्या पक्षाच्या तिकीटावर पणजीतून निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

  • Published by:  desk news

पणजी, 20 जानेवारी: गोव्याचे (Goa) दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर (Utpal Parriakr) यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करावा आणि निवडणूक लढवावी, अशी जाहीर ऑफर (Open Offer) आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) यांनी दिली आहे. सध्या गोव्यात विधानसभा निवडणुकांचा माहौल गरम झाला असून उत्पल पर्रिकरांना आपल्याकडे  खेचण्यासाठी विविध पक्ष प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. या ऑफरनंतर उत्पल काय करणार आणि याला काय प्रतिसाद देणार, याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

आम्ही देऊ तिकीट

उत्पल पर्रिकर यांना भाजपने त्यांचा मतदारसंघ असलेल्या पणजीतून तिकीट देण्यास नकार दिला आहे. मनोहर पर्रिकर यांनी भाजपसाठी पूर्ण आयुष्य वेचूनही त्यांचा मुलाला तिकीट मिळवण्यासाठीदेखील इतका संघर्ष करावा लागणं चुकीचं आहे. भाजपने पर्रिकर यांच्याबाबतही 'यूज अँड थ्रो' धोरणच राबवलेलं दिसत आहे. मात्र पर्रिकर हे भाजपचे असले तरी आपल्यासाठी आदर्श नेते होते आणि त्यांच्या कार्याचा आपण नेहमीच गौरव केल्याचं केजरीवाल म्हणाले. त्यामुळे उत्पल यांनी पणजीतून निवडणूक लढवावी आणि त्यांना आम आदमी पक्ष तिकीट देईल, अशी ऑफर त्यांनी दिली आहे.

शिवसेनेनंही दिली होती ऑफर

उत्पल पर्रिकर जर पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले, तर शिवसेना आणि मित्रपक्ष त्यांना पाठिंबा देत आपले उमेदवार मागे घेतील, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील काही दिवसांपूर्वीच केली होती. आम आदमी पार्टी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस  आणि गोवा फॉरवर्ड पक्षासह शिवसेनादेखील या मतदारसंघात एकही उमेदवार उभा करणार नाही, असा प्रस्ताव शिवसेनेनंही ठेवला होता. भाजपने तिकीट दिले नाही, तर उत्पल पर्रिकर काय निर्णय घेतात, याची उत्कंठा त्यामुळे ताणली गेली आहे.

भाजपकडून 34 उमेदवारांची यादी

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सँकलिममधून तिकीट देण्यात आलं आहे. मात्र यंदा सहा विद्यमान आमदारांना पक्षानं तिकीटं दिलेली नाहीत. गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत आणि 14 फेब्रुवारी दिवशी मतदान होणार आहे.

First published:

Tags: Arvind kejriwal, Goa, Goa Election 2021