मराठी बातम्या /बातम्या /explainer /

कोरोनाच नाही तर 'या' कारणासाठी देशात लसीकरण महत्वाचं! तज्ज्ञ म्हणतात..

कोरोनाच नाही तर 'या' कारणासाठी देशात लसीकरण महत्वाचं! तज्ज्ञ म्हणतात..

भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारतातील मुलांमध्ये जीवनरक्षक लसीकरण वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी कार्यक्रमांना प्रोत्साहन देत आहे.

भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारतातील मुलांमध्ये जीवनरक्षक लसीकरण वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी कार्यक्रमांना प्रोत्साहन देत आहे.

भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारतातील मुलांमध्ये जीवनरक्षक लसीकरण वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी कार्यक्रमांना प्रोत्साहन देत आहे.

  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 27 एप्रिल : युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (UNICEF) मुलांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या विकासाच्या संधींचा विस्तार करण्यासाठी कार्य करते. यासाठी ते दरवर्षी 24 ते 30 एप्रिल या कालावधीत जागतिक लसीकरण सप्ताह 2022 साजरा(World Immunization Week 2022) करतात. भारतात, हा सप्ताह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने साजरा केला जातो. देशभरातील मुलांमध्ये जीवनरक्षक लसी लागू करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याचे उद्दिष्ट आहे. या निमित्ताने भारत सरकार जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करते.

थीम काय आहे?

यावेळी, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मुलांमध्ये लसीकरण कार्यक्रमांना गती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर भर देण्याबद्दल सांगितले आहे. 'सर्वांसाठी दीर्घायुष्य' ही यावर्षीची प्रतिकारशक्तीची थीम आहे. लाँग लाईफ फॉर ऑल या थीमचा मुख्य उद्देश लोकांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी लसीकरणाचे महत्त्व आणि लसीकरणाच्या समानतेची जाणीव करून देणे हा आहे.

या थीमचा उद्देश काय आहे?

गेल्या दोन वर्षांत भारतासह संपूर्ण जगाने कोविड-19 साथीच्या आजाराचा सामना करताना लसींचे महत्त्व ओळखले आहे. लसीकरणाचा स्वतःचा मोठा आणि महत्त्वाचा इतिहास आहे ज्यामध्ये अनेक धोकादायक आजार जगातून समूळ नष्ट करण्यात यश मिळाले आहे. लसीकरण आणि लसीकरणाचे महत्त्व लोकांना कळावे, अशा पद्धतीने हा सप्ताह साजरा केला जात आहे. भारतात दरवर्षी सुमारे 2.9 कोटी गर्भवती महिला आणि 27 कोटी मुलांना लसीकरण केले जाते.

मुलांमध्ये सुधारणा

या उद्देशासाठी, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा (Universal Immunization Programme)वापर प्रत्येकाला लसीकरण करण्यासाठी केला जातो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (NFHS-5) डेटानुसार, 12 ते 23 महिने वयोगटातील मुलांमधील एकूण लसीकरण कव्हरेजमध्ये अखिल भारतीय स्तरावर 62 ते 76 टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली आहे.

सर्व मुलांचे लसीकरण लक्ष्य

भारतात या वर्षाच्या सुरुवातीला सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम इंद्रधनुष्यच्या 4.0 आवृत्तीची सुरुवात झाली आहे. यात सुरुवातीला विविध जिल्हे आणि ब्लॉकमधील लहान मुले आणि गरोदर महिलांच्या लसीकरण कव्हरेजला गती देण्यासाठी लॉन्च करण्यात आलं. मागील वेळी लसीकरण न झालेल्या किंवा इतर काही कारणांमुळे चुकलेल्या असुरक्षित बालकांची ओळख पटवणे आणि लसीकरण करणे हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे.

90 टक्के किडनी खराब झाल्यावर लोक डॉक्टरांकडे जातात; अगोदरच ही टेस्ट केलेली शहाणपणाचं!

अनेकांचे योगदान

या आठवड्यादरम्यान अनेक लोकांच्या कार्याचा गौवर करण्यात आला, ज्यांनी गेल्या 300 वर्षांमध्ये लसींचे उत्पादन, विकास, अनुप्रयोग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिलं आहे. या कामासाठी रोगाचे क्षेत्र आणि बाधित लोकांवर सतत लक्ष ठेवण्याचे काम देखील करावे लागते. हे सामान्य आरोग्य आणि औषधांपेक्षा थोडे वेगळे काम आहे.

भारतात लसीकरणाची चांगली नोंद

अत्यावश्यक लसींचे कार्यक्रम भारतात यशस्वी झाले नाहीत असे म्हणणे योग्य ठरणार नाही. भारतामध्ये लसीकरणाचा मोठा विक्रम आहे, पण तरीही खूप खोलवर आणि व्यापकपणे काम करण्याची गरज आहे. कोविड लसीच्या कार्यक्रमांमुळे लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटले आहे. त्याचा फायदा आवश्यक लसींच्या कार्यक्रमात नक्कीच होईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

जगातील अनेक देशांमध्ये कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाला विरोधही दिसून आला आहे. यावरून लसीकरण कार्यक्रमांमधील जनजागृतीचे महत्त्व आणि जनजागृती मोहिमांचे महत्त्व स्पष्टपणे दिसून येते. यासारख्या घटना केवळ जागतिक लसीकरण सप्ताहासारख्या कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करतात. भारतासारख्या देशात, लसीकरण कार्यक्रम प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणे सोपे काम नाही. पण कोविड 19 लसीकरणाचे उल्लेखनीय प्रयत्न आणि पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाला मिळालेले यश पाहता ते अशक्य वाटत नाही.

First published:

Tags: Corona vaccine, Vaccination