Home /News /explainer /

Work From Home | वर्क फ्रॉम ऑफिस की वर्क फ्रॉम होम? भारतीयांची पहिली पसंती कशाला?

Work From Home | वर्क फ्रॉम ऑफिस की वर्क फ्रॉम होम? भारतीयांची पहिली पसंती कशाला?

कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम (Work From Home) करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण करण्यात आलं असून यात वर्क फ्रॉम होम बद्दल भारतीयांची मते जाणून घेतली आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 3 डिसेंबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे एक नवीन वर्किंग कल्चर रुळण्यास मदत झाली ते म्हणजे वर्क फ्रॉम होम. कम्प्युटरच्या युगात आपली बहुतांश कामं ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे घरी बसून लॅपटॉपवर होणाऱ्या कामासाठी ऑफिसला जाण्याची गरज नाही हे या महामारीच्या काळामध्ये सर्वांच्या अधिक स्पष्टपणे लक्षात आलं. एवढंच नाही, तर कित्येक भारतीयांनी आपण ऑफिसपेक्षाही घरून काम करताना (Work From Home) अधिक प्रॉडक्टिव्ह असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दी इकॉनॉमिक टाइम्सने गार्टनर (Gartner) या संशोधन संस्थेच्या एका सर्वेक्षणाचा दाखला देऊन भारतीयांचं 'वर्क फ्रॉम होम' बद्दलचं मत याबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणानुसार, आपण घरून काम करताना अधिक प्रॉडक्टिव्ह असल्याचं कित्येक भारतीयांचं म्हणणं आहे. याला कारण म्हणजे, घर ते ऑफिस आणि परत घर असा दररोजचा तीन ते चार तासांचा प्रवास कमी होणं. अर्थात, प्रवास कमी करावा लागणं हे काही यामागचं एकमेव कारण नाही. भारतीयांना वर्क फ्रॉम होम आवडत असण्याचं (Indians prefer WFH) दुसरं कारण म्हणजे, व्हर्च्युअल मीटिंग्ज. या सर्वेक्षणातल्या सुमारे 83 टक्के भारतीयांनी आपण ऑफिससंबंधी कामांसाठी मेसेंजिंग अॅप्स (Messenging apps) आणि टूल्सचा वापर केल्याचं सांगितलं. समोरासमोरचा संवाद किंवा फोन कॉल्सपेक्षाही या साधनांचा वापर करणं अधिक सोईचं असल्याचं (Indians prefer Messaging tools) या सर्वांनी सांगितलं. तसंच, कित्येक भारतीयांनी तर आपल्याला आधीपासूनच ऑफिसमधल्या मीटिंग्जपेक्षा व्हर्च्युअल मीटिंग्ज (Indians prefer virtual meetings) आवडत होत्या असंही म्हटलं आहे. TCS Work from Home: काही कर्मचाऱ्यांना भविष्यात कधीच ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही; असं का? वाचा “आपल्या वेळेनुसार काम (Schedule flexibility) करण्याची संधी, मोबाइल मेसेजिंग अॅप्सचा वापर (Mobile messeging tools) आणि डिजीटल निपुणता (Digital dexterity) अशा विविध गोष्टींमुळे ऑफिसपेक्षाही घरून काम करताना कर्मचाऱ्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढली आहे,” असं मत गार्टनरमधल्या प्रिन्सिपल रिसर्च अॅनालिस्ट रश्मी कूटीपल्ली यांनी व्यक्त केलं. “डिजीटल टेक्नॉलॉजीने समोरासमोरचा संवाद आणि ऑफलाइन फाइल ट्रान्स्फर या दोन्हींची जागा (Technology replaced face to face communication) घेतली आहे. यातून आता एक क्लाउड बेस्ड ‘न्यू वर्क हब’ तयार होतं आहे,” असंही त्या म्हणाल्या. इतर देशांमध्ये काय परिस्थिती? ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीमधल्या सुमारे 40 टक्के कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होममध्येही आपली प्रॉडक्टिव्हिटी (Productivity in WFH) सारखीच असल्याचं म्हटलं. चीन आणि जपानमधल्या कित्येक कर्मचाऱ्यांनी ऑफलाइन मीटिंग्जना प्राधान्य दिलं. ऑस्ट्रेलियामधल्या 30 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी घरून काम करताना आपली प्रॉडक्टिव्हिटी किती तरी पटींनी वाढल्याचं म्हटलं आहे. Work From Home करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 25% पर्यंत होणार पगारकपात, वाचा काय आहे कारण? जगभरातल्या सुमारे 60 टक्के नागरिकांनी ऑफिसच्या कामासाठी दररोज मेसेजिंग टूल्सचा वापर केल्याचं म्हटलं आहे. सुमारे 50 टक्के नागरिकांनी कोलॅबोरेशन आणि स्टोरेज किंवा फाइल शेअरिंग टूल्सचा वापर केल्याचं सांगितलं. 2019 मध्ये घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची टक्केवारी एकूण कर्मचाऱ्यांच्या 27 टक्के होती. 2022 पर्यंत हे प्रमाण 47 टक्क्यांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
    First published:

    Tags: Work from home, Worker, Workload

    पुढील बातम्या