मराठी बातम्या /बातम्या /explainer /एकेकाळी पृथ्वीसारख्या असणाऱ्या शुक्रावर आज जीवसृष्टी का नाही? शास्त्रज्ञांना मिळालं उत्तर

एकेकाळी पृथ्वीसारख्या असणाऱ्या शुक्रावर आज जीवसृष्टी का नाही? शास्त्रज्ञांना मिळालं उत्तर

शुक्र ग्रह (Venus) आणि पृथ्वीमध्ये (Earth) बरेच साम्य आहे. सुरुवातीच्या काळात दोन्ही ग्रह एकसारखेच होते. पण, मग असं काय झालं की पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली अन् शुक्रावर नाही? नवीन अभ्यासातून याचं उत्तर मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

शुक्र ग्रह (Venus) आणि पृथ्वीमध्ये (Earth) बरेच साम्य आहे. सुरुवातीच्या काळात दोन्ही ग्रह एकसारखेच होते. पण, मग असं काय झालं की पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली अन् शुक्रावर नाही? नवीन अभ्यासातून याचं उत्तर मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

शुक्र ग्रह (Venus) आणि पृथ्वीमध्ये (Earth) बरेच साम्य आहे. सुरुवातीच्या काळात दोन्ही ग्रह एकसारखेच होते. पण, मग असं काय झालं की पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली अन् शुक्रावर नाही? नवीन अभ्यासातून याचं उत्तर मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 31 डिसेंबर : गेल्या अनेक वर्षांपासून मानव पृथ्वीच्या (Earth) बाहेर जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा असा विषय येतो तेव्हा शुक्र ग्रहाचे सर्वात आधी नाव घेतलं जातं. याचे कारण एकेकाळी शुक्र हा पृथ्वीसारखाच ग्रह होता. परंतु, कालांतराने पृथ्वीवर जीवसृष्टीची भरभराट झाली आणि शुक्रावर त्याचा तपासही नाही. आज शुक्राची स्थिती अशी का झाली आहे, हे वैज्ञानिकांसाठी अजूनही मोठे कोडं आहे. याचा अभ्यास शुक्र ग्रहाच्या इतिहासात दडलेला असल्याचे सांगितले जाते. ज्यामध्ये अतिवेगाने उल्कापिंडांची टक्कर होण्याचं कारण आहे.

शुक्र, मंगळ आणि पृथ्वी

जीवसृष्टीचे संकेत आणि अनुकूलतेमध्ये मंगळ आणि शुक्र (Venus) सुरुवातीपासूनच मोठे दावेदार आहेत. सध्या मंगळावर अधिक काम सुरू आहे. मात्र, सध्यातरी मंगळ आणि शुक्र हे दोन्ही ग्रह राहण्यायोग्य नाहीत. एकेकाळी पृथ्वीसारखी स्थिती असल्याने शुक्र अधिक सोयिस्कर असल्याचा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे. वेगाने झालेल्या टक्करीमुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी तर शुक्र ग्रहावर काहीच नसल्याचे नवीन मॉडेलिंगमधून स्पष्ट झालं आहे.

सूर्य आणि पृथ्वी

शुक्राच्या सुरुवातीच्या इतिहासातील मोठ्या, जलद गतीने होणार्‍या टक्करांमुळे शुक्र आणि त्याचा सहकारी ग्रह पृथ्वी यांच्यातील फरक या अभ्यासातून स्पष्ट होऊ शकतो. सूर्यापासून दोन ग्रहांचे आकारमान, वस्तुमान आणि सापेक्ष अंतर मोठ्या प्रमाणात समान आहे. तरीही, दोन्हीमधील राहण्याची क्षमता, वातावरणाची रचना, टेक्टोनिक प्लेट यांसारखे अनेक मोठे फरक स्पष्ट केले जाऊ शकले नाहीत.

टक्करीतून गोष्टी उलगडणार

पृथ्वीवर जीवसृष्टी तर शुक्रावर का नाही? हे वेगवान टक्करीतून स्पष्ट होईल, अशी माहिती 2021 च्या अमेरिकन जिओफिजिकल युनियन फॉल मीटिंगमध्ये सादर करण्यात आलेल्या संशोधनात समोर आली आहे. साउथ वेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमधील ग्रहशास्त्रज्ञ सिमोन मार्के यांनी हा अभ्यास सादर केला.

Year Ender 2021: नासाची यंदाची गाजलेली सुंदर आणि प्रसिद्ध छायाचित्रे पाहिली का?

संपूर्ण ग्रह प्रभावित झाला असणार

मार्के यांनी सांगितले की, सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात उल्कापिंड सारख्या आदळणाऱ्या वस्तूंची संख्या खूप जास्त असायची. जर सुरुवातीची टक्कर काहीशे किलोमीटर व्यासाची असेल तर त्याचा परिणाम ग्रहाच्या पृष्ठभागावर आणि वातावरणासह अंतर्गत संरचनेवरही झाला असेल. या महाकाय टक्करांमुळे ग्रहावरील प्रत्येक गोष्टीवर परिणाम होऊ शकतो.

4 अब्ज वर्षांपूर्वी

वेगवेगळ्या संशोधन गटांनी दाखवून दिले आहे की, शुक्राच्या पुरातन कालखंडात म्हणजे सुमारे 4.5 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी उल्का खूप वेगाने आदळल्या. हा वेग पृथ्वीच्या टक्करांपेक्षा खूप जास्त होता. जवळपास एक चतुर्थांशपेक्षा जास्त टक्कर 30 किलोमीटर प्रति सेकंदाच्या वेगाने झाली असावी.

कवचपासून आवरणही वितळले

शुक्रावर महाकाय, जलद गतीने होणाऱ्या टक्करांमुळे पृथ्वीच्या तुलनेत येथे दुप्पटीने धातू वितळले असतील. संशोधनानुसार, कमी कोनातून तीव्र टक्कर झाल्यामुळे शुक्राचे आवरण पूर्णपणे वितळले असावे. मार्की यांनी निदर्शनास आणून दिले की केवळ एक विशाल वेगवान टक्करीने व्हीनसची अंतर्गत विकास प्रक्रिया थांबवून पुन्हा सुरू झाली असेल.

कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर..

अशा परिस्थितीत शुक्र खडकाळ पिंड ते वितळलेल्या पिंडात बदलला असेल, ज्यामुळे त्याचा पृष्ठभाग आणि अंतर्गत रचनाही बदलली. आधीचं असलेलं वातावरण नष्ट झाल्याचा अंदाज आहे. केवळ एकच खूप मोठ्या आणि वेगवान टक्करीने टक्‍टोनिक प्लेट्स तयार झाली असेल की नाही हे ठरलं असेल. इथूनच दोन्ही ग्रहांच्या निर्मितीची दिशा अशा प्रकारे बदलली असावी. आज या दोघांमध्ये असलेला फरक तेच स्पष्ट करतो.

First published:
top videos

    Tags: Earth, Science