Home /News /explainer /

Nuclear Bombs Risks | एकाच वेळी सगळे अणुबॉम्ब फुटले तर पृथ्वीची अवस्था काय होईल?

Nuclear Bombs Risks | एकाच वेळी सगळे अणुबॉम्ब फुटले तर पृथ्वीची अवस्था काय होईल?

What would happen if all nuclear bombs detonated : रशिया-युक्रेन युद्धात आता व्लादिमीर पुतिन अण्वस्त्रांबाबत बोलले आहे. कल्पना करा, जगातील सर्व अणुबॉम्ब एकाच वेळी फुटले तर काय होईल?

    मुंबई, 28 फेब्रुवारी : अण्वस्त्रे आणि त्यांचे धोके (Nuclear Bombs Risks) याबाबत जगात नेहमीच चर्चा होत असते. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही यावेळी युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करण्याचे संकेत दिले आहेत. आता त्यांचा धोका कितपत गंभीर आहे किंवा किती पोकळ आहे, हा वेगळा मुद्दा आहे. पण, जर जगातील सर्व अणुबॉम्बचा (What would happen if all nuclear bombs detonated) एकाच वेळी स्फोट झाला तर पृथ्वीची अवस्था काय होईल? चला जाणून घेऊया. यूट्यूब चॅनेल Kurzgesagt – In a Nutshell वर अणुशक्तीचा गैरवापर झाल्यास पृथ्वीला त्याचे परिणाम कसे भोगावे लागतील हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा व्हिडीओ 2019 मध्ये बनवण्यात आला होता. हे निष्कर्ष त्यावेळी उपस्थित असलेल्या अणुबॉम्बच्या संख्येबाबत काढण्यात आले होते. 15000 बॉम्ब फुटल्यानंतर काय होईल? YouTube चॅनलद्वारे तयार केलेला अॅनिमेटेड व्हिडिओ मार्च 2019 मध्ये पोस्ट करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण जगात एकूण 15,000 अणुबॉम्ब होते. या अभ्यासानुसार, जर 15,000 पैकी 3 बॉम्बचा स्फोट झाला, तर ते शहर नष्ट करण्यासाठी पुरेसे आहे, म्हणजेच 13,500 अण्वस्त्रे पृथ्वीवरील 4500 शहरे नष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. 15,000 अणुबॉम्बचा प्रभाव जगातील सर्वात शक्तिशाली ज्वालामुखी क्रकाटोआपेक्षा 15 पट अधिक विनाशकारी असल्याचे सिद्ध होईल. Kurzgesagt च्या मते, त्याच्या प्रभावामुळे मानवी प्रजाती संपुष्टात येतील. युक्रेनच्या आकाशात उडतंय 'भूत'! 6 रशियन लढाऊ विमाने पाडली, पाहा व्हिडिओ सगळे बॉम्ब एकाच जागी फुटले तर? सर्व 15,000 बॉम्बचा एकाच ठिकाणी स्फोट झाला तर 31 मैल रुंद आगीचा गोला तयार होईल आणि इतका मोठा स्फोट होईल की 1865 मैलांपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त होईल. या स्फोटाचा आवाज जगभर ऐकू येईल आणि त्याचा दाब अनेक आठवडे जाणवेल. यातून निर्माण होणारा मशरूमसारखा ढग इतका उंच आणि मोठा असेल की तो पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्व बाजूंना व्यापून अवकाशात पोहोचेल. हा स्फोट अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये झाला तर संपूर्ण दक्षिण अमेरिका आगीच्या गोळ्यात बदलेल. किरणोत्सर्गामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा नाश होईल आणि त्याचा वाईट परिणाम शेकडो मैलांपर्यंत दिसून येईल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Nuclear weapons, Russia Ukraine

    पुढील बातम्या