कीव, 28 फेब्रुवारी : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील युद्ध (Ukraine Russia Conflict) सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देश एकमेकांचे सैनिक आणि शस्त्रे मारल्याचा दावा करत आहेत. यादरम्यान एक ‘भूत’ खूप चर्चेत आलं आहे. लोक त्याला ‘घोस्ट ऑफ कीव’ (Ghost of Kyiv) म्हणत आहेत. वास्तविक हे भूत दुसरे तिसरे कोणी नसून युक्रेनचा मिग-29 फुलक्रम (MiG-29 Fulcrum) फायटर पायलट आहे. ज्यांना लोक देशाचा नायक म्हणत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून हा पायलट रशियन सैनिकांचा काळ राहिला आहे आणि आतापर्यंत त्याने सहा लढाऊ विमाने पाडली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनचा एकटा पायलट कीवच्या आकाशात उड्डाण करत आहे. रशियाच्या लढाऊ विमानांना टक्कर देत आहे. या युद्धाच्या वातावरणात अशा अनेक गोष्टी घडत आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अशा स्थितीत या ‘घोस्ट ऑफ कीव’ दाव्याला पुष्टी देणेही अवघड आहे. पण सोशल मीडियावर लोक पायलटचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्याचे खूप कौतुक करत आहेत. यामध्ये सर्वसामान्यांव्यतिरिक्त पत्रकारांचाही सहभाग आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल युक्रेनियन पत्रकार क्रिस्टोफर मिलरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी युक्रेनची दोन विमाने कीवच्या दिशेने जाताना आणि परत येताना पाहिली. त्यापैकी हा एक आहे. ते भूत असू शकते का? भुते आहेत का? सर्वांना जाणून घ्यायचे आहे.’ युक्रेन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘लोक त्याला कीवचे भूत म्हणत आहेत. हे बरोबर आहे, UAF एकटा आपल्या राजधानीच्या आणि देशाच्या आकाशावर वर्चस्व गाजवत आहे. रशियन विमानांवर हल्ला करून त्यांच्यासाठी एक भयानक स्वप्न बनला आहे.
न्यूक्लियर हाय अलर्टवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन अण्वस्त्र दलांना “हाय अलर्ट” राहण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. देशात रशियन सैन्य आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात संघर्ष सुरू असताना, युक्रेनच्या नेत्यांनी रशियाशी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. रशियन सैन्य आणि रणगाडे युक्रेनमध्ये आतपर्यंत घुसले आहेत. तर काही राजधानीच्या आसपास पोहोचले आहेत.