मराठी बातम्या /बातम्या /explainer /Padma Awards: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांच्यात काय फरक आहे? या पुरस्काराबद्दल ही तथ्य माहितीय का?

Padma Awards: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांच्यात काय फरक आहे? या पुरस्काराबद्दल ही तथ्य माहितीय का?

केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील तीन मोठे नागरी पुरस्कार असून या तिन्हींमध्ये फरक आहे. चला जाणून घेऊया.

केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील तीन मोठे नागरी पुरस्कार असून या तिन्हींमध्ये फरक आहे. चला जाणून घेऊया.

केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील तीन मोठे नागरी पुरस्कार असून या तिन्हींमध्ये फरक आहे. चला जाणून घेऊया.

मुंबई, 25 जानेवारी : केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या हेलिकॉप्टर विमान अपघातात शहीद झालेले CDS जनरल बिपिन रावत आणि दिवंगत भाजप नेते कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रभा अत्रे यांना कलेसाठी, राधेश्याम खेमका यांना साहित्य आणि शिक्षणासाठी, जनरल बिपीन रावत यांना नागरी सेवेसाठी आणि कल्याण सिंह यांना लोककल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना देखील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या निमित्ताने आपण या पुरस्कारांविषयी जाणून घेऊया.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 128 जणांना सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 4 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 128 जणांना सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 4 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. हे पुरस्कार भारत सरकारकडून दरवर्षी भारतीय नागरिकांना त्यांच्या असामान्य कार्यासाठी दिले जातात. 1954 साली पद्म पुरस्कारांची सुरुवात झाली. त्यानंतर 1978 ते 1979 आणि 1993 ते 1997 या कालावधीतील अल्प व्यत्यय वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याची घोषणा केली जाते. आज आम्ही तुम्हाला तीन पुरस्कारांमध्ये काय फरक आहे हे सांगणार आहोत आणि कोण हा पुरस्कार मिळवण्यास पात्र आहे.

कोण करतात शिफारस?

पद्म पुरस्कारांची शिफारस राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन, केंद्रीय मंत्रालये किंवा विभाग तसेच उत्कृष्ट संस्थांद्वारे केली जाते. तुम्ही स्वतःही या पुरस्कारासाठी अर्ज करू शकता. यानंतर एक समिती या नावांवर विचार करते. पुरस्कार समितीने शिफारस केल्यानंतर, पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपती त्यांची मान्यता देतात आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

Padma Awards 2022 : बिपीन रावत, यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना पद्मविभूषण, पुनवालांना पद्मभूषण जाहीर

जाणून घ्या तीन पद्म पुरस्कार एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत

पद्म विभूषण

पद्म पुरस्कारांमध्ये हा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न नंतर हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील असाधारण आणि उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. पुरस्कारामध्ये 1-3/16 इंच आकारमानाचा कांस्य बॅज आहे. ज्याच्या मध्यभागी कमळाचे फूल आहे. या फुलाच्या वरती खाली देवनागरी लिपीत पद्मविभूषण लिहिलेले आहे. त्याच वेळी, या बिल्लाच्या मागे अशोक चिन्ह बनवले आहे. हा सन्मान कोणत्याही क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय सेवेसाठी दिला जातो. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवांचाही समावेश होतो.

पद्मभूषण

पद्म पुरस्कारांमध्ये पद्मभूषण हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. तसेच हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या सन्मानामध्ये 1-3/16 इंच आकाराचा कांस्य बिल्ला दिला जातो. यात डिझाईन एकच असते फक्त कमळाच्या फुलाच्या खाली पद्मभूषण लिहिले आहे. हा सन्मान प्रतिष्ठित आणि उल्लेखनीय आणि कोणत्याही क्षेत्रातील उच्च श्रेणीतील प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो.

पद्मश्री

पद्मश्री पुरस्कार हा पद्म पुरस्कारांपैकी तिसरा आणि भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्याची रचनाही तशीच आहे. यामध्ये फुलाच्या वर खाली पद्मश्री लिहिलेले आहे. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवन इत्यादी जीवनातील विविध क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

पद्म पुरस्काराबद्दल तथ्य

एका वर्षात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची एकूण संख्या (मरणोत्तर आणि परदेशी पुरस्कार वगळता) 120 पेक्षा जास्त नसावी.

या सजावटीमध्ये राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने आणि शिक्का असलेले सनद (प्रमाणपत्र) आणि पदक (मेडल) असते. समारंभाच्या दिवशी प्रत्येक पुरस्कार विजेत्याचा संक्षिप्त परिचय असलेली स्मरणिकाही जारी केली जाते.

पुरस्कार विजेत्यांना एक मेडलसोबत प्रितिकृती देखील प्रदान केली जाते, जे ते त्यांच्या आवडीच्या कोणत्याही कार्यक्रमात/राज्य समारंभात घालू शकतात.

हा पुरस्कार पदवी नाही आणि लेटरहेड, निमंत्रण पत्रिका, पोस्टर्स, पुस्तके इत्यादींवर पुरस्कार विजेत्याच्या नावाच्या पुढे किंवा मागे उल्लेख केला जाऊ शकत नाही. त्याचा गैरवापर झाल्यास ती व्यक्ती या पुरस्कारापासून वंचित राहील.

या पुरस्कारांसोबत रेल्वे/विमान प्रवास इत्यादी स्वरूपात कोणताही रोख भत्ता किंवा सवलत दिली जात नाही.

First published:
top videos

    Tags: Padma award, Padma purskar