मराठी बातम्या /बातम्या /explainer /भविष्यात पेट्रोल-डिझेल ऐवजी वापरलं जाणारं ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? स्वस्त आहे की महाग?

भविष्यात पेट्रोल-डिझेल ऐवजी वापरलं जाणारं ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? स्वस्त आहे की महाग?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी त्यांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जर्मनीत होते. त्यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. यामध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जेबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी त्यांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जर्मनीत होते. त्यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. यामध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जेबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी त्यांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जर्मनीत होते. त्यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. यामध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जेबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी त्यांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जर्मनीत होते. त्यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. यामध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जेबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच देशाला हायड्रोजन पॉवर बनवण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत सरकारने नवीन ग्रीन हायड्रोजन धोरण (Green Hydrogen Policy) तयार केले आहे. याच संदर्भात जर्मनीसोबत करार करण्यात आला आहे. जेव्हापासून ग्रीन हायड्रोजनची चर्चा सुरू झाली आहे, तेव्हापासून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. चला आज ग्रीन हायड्रोजनबद्दल (What is Green Hydrogen) सर्व काही जाणून घेऊया.

ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय आणि ते कसे तयार होते?

जेव्हा वीज पाण्यामधून जाते तेव्हा हायड्रोजन तयार होतो. या हायड्रोजनचा उपयोग अनेक गोष्टींना शक्ती देण्यासाठी होतो. जर हायड्रोजन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी वीज अक्षय स्त्रोताकडून आली असेल, म्हणजेच विजेच्या उत्पादनात प्रदूषण होत नाही अशा स्त्रोताकडून येत असेल, तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या हायड्रोजनला ग्रीन हायड्रोजन म्हणतात. आता एक मोठा प्रश्न आहे की ग्रीन हायड्रोजनची गरज का आहे?

ग्रीन हायड्रोजनचे फायदे काय आहेत?

सध्या पवनचक्क्या आणि सौरऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण केली जात आहे, त्यामुळे प्रदूषण होत नाही, पण प्रत्येक उद्योगात त्याचा उपयोग होत नाही. बहुसंख्य वाहने, ट्रेन आणि अनेक कारखान्यांमध्येही याचा वापर सोपा आहे. पण आजही पोलाद, सिमेंटसारख्या उद्योगांमध्ये कोळशाची गरज आहे. त्याच वेळी, एअरलाइन्स आणि जलवाहू जहाजांसाठी द्रव इंधन आवश्यक आहे. वास्तविक, हे सर्व केवळ सौरऊर्जेने किंवा त्यातून मिळणार्‍या विजेवर चालवता येणार नाही. अक्षय ऊर्जेवर विसंबून राहून लांबचा प्रवास करता येत नाही, हेही अशा प्रकारे समजू शकते. अशा स्थितीत हायड्रोजनची गरज आहे, ज्याचा वापर स्टील-सिमेंट उद्योगासह विमान कंपन्या आणि जहाजांमध्ये लांब पल्ल्यासाठी करता येईल. ते साठवून मग गरजेनुसार वापरता येते. म्हणजेच ग्रीन हायड्रोजनचे अनेक फायदे आहेत, पण इथे प्रश्न पडतो की त्याचेही काही धोके आहेत की नाही?

ग्रीन हायड्रोजनचे तोटे समजून घेणे महत्त्वाचे

ग्रीन हायड्रोजनचे जरी अनेक फायदे असले तरी त्याचे तोटेही कमी नाहीत. यासोबतच सुरक्षेचाही धोका आहे आणि अर्थव्यवस्थेलाही. सुरक्षिततेचा विचार केल्यास, हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील आहे. म्हणजेच डिझेल-पेट्रोलच्या टाकीत गळती झाली तर ती जमिनीवर पसरते, पण हायड्रोजन टाकीमध्ये छोटीशी ठिणगी किंवा गळती झाल्यास त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात.

सेमीकंडक्टर अशी काय जादू आहे? ज्याच्या तुटवड्याने जगभरात वाहन उद्योगाला बसलीय खिळ?

जुन्या आपत्तीतून धडा घेतला पाहिजे

1937 मध्ये, हिंडेनबर्ग या मोठ्या हवाई जहाजाला आग लागली आणि त्यात 97 पैकी 36 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर एअरशिपला असुरक्षित म्हटले गेले आणि त्यामुळे एअरशिप उद्योग बुडाला.

2011 मध्ये जपानला भूकंप आणि त्सुनामीचा तडाखा बसला होता. यामुळे फिफुशिमा न्यूक्लियर पॉवर स्टेशनमध्ये हायड्रोजनचा मोठा स्फोट झाला, ज्यामुळे किरणोत्सर्गी गळती झाली. लाखो लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत.

ग्रीन हायड्रोजनचा अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो

सरकार ज्या पातळीवर ग्रीन हायड्रोजनची तयारी करत आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सरकारला सर्व मोठ्या कंपन्यांना भरघोस सबसिडी द्यावी लागणार आहे. अशा स्थितीत सरकारवर मोठा भार पडणार आहे, जो प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेवर बोजा आहे. ग्रीन हायड्रोजनवरचा प्रकल्प योग्य प्रकारे टार्गेट केला गेला तर अर्थव्यवस्थेत मोठी भरभराट होईल. पण, त्यात अपयश आल्यास अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार हेही निश्चित. ग्रीन हायड्रोजनवर मोठी गुंतवणूक करूनही काम झाले नाही, तर व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारला पैसे द्यावे लागतील.

First published:
top videos

    Tags: Petrol and diesel, Vehicles