Home /News /explainer /

Death Anniversary of Lal Bahadur Shastri : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपूर्वीच्या 'त्या' 4 तासांत काय घडलं?

Death Anniversary of Lal Bahadur Shastri : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपूर्वीच्या 'त्या' 4 तासांत काय घडलं?

Death Anniversary of Lal Bahadur Shastri : 11 जानेवारी 1966 रोजी रात्री 1.32 वाजता तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचे ताश्कंद (Tashkent) येथे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. भारत-पाकिस्तान युद्धानंतर (India-pakistan war) करारावर स्वाक्षरी करण्यासाठी ते तिथे गेले होते. या मृत्यूबाबत अजूनही प्रश्न विचारले जातात. मृत्यूपूर्वी शेवटच्या 3-4 तासात त्यांच्यासोबत काय घडले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 जानेवारी : 11 जानेवारी 1966 च्या रात्री ताश्कंदमध्ये (Tashkent) तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचा आकस्मिक मृत्यू आजही रहस्याच्या छायेत आहे. आजही त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला यावर आजही बहुतेक लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांच्या मृत्यूपूर्वी शेवटच्या तीनचार तासांता नेमकं काय झालं? त्या काळात घडलेल्या घटनांबद्दल त्यांच्यासोबतचे लोक काय सांगतात? खरंतर ताश्कंद करारासाठी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री सोव्हिएत युनियनमधील ताश्कंद या शहरात गेले होते. तेथे त्यांनी 10 जानेवारी 1966 रोजी पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्याशी ऐतिहासिक करार केला. या कराराबाबतही त्यांच्यावर मोठा दबाव होता. करारानंतर रात्री 1.32 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. देशातील अनेक वृत्तपत्रांना ही घटना छापता आली नाही. पण, टाइम्स ऑफ इंडियाने रात्रीची सिटी एडिशन थांबवून ही बातमी प्रसिद्ध केली. “शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले” अशा मथळ्यासह आठ स्तंभांमध्ये बातमी छापण्यात आली होती. काय होतं त्या बातमीत? ताश्कंद, 11 जानेवारी. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आज रात्री 1.32 वाजता ताश्कंद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पीटीआयच्या या वृत्तानुसार, आज सकाळी विमानाने त्यांचे पार्थिव दिल्लीत आणले जात आहे. श्री शास्त्री यांनी रात्री 1.25 वाजता छातीत दुखत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यानंतर सात मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. ताश्कंद करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर रात्री, सोव्हिएत पंतप्रधान अॅलेक्सी कोसिगिन यांनी एका मेजवानीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शास्त्री निरोगी आणि चांगले दिसत होते. या दौऱ्यावर त्यांच्यासोबत आलेले मंत्री सरदार स्वरण सिंग यांनी सांगितले की, शास्त्री यांनी जेव्हा हृदयविकाराचा झटका आल्याची तक्रार केली तेव्हा काही मिनिटांतच भारतीय डॉक्टर तेथे पोहोचले होते. यानंतर एक रशियन डॉक्टरही तेथे आले. त्यानंतर दोघांनी मिळून बराच वेळ त्यांच्यावर उपचार केले. पण, हृदयाने प्रतिसाद देणे बंद केले होते. त्यावेळी सोव्हिएत युनियनचे प्रमुख कोसिगिन हे तिथेच होते. शास्त्री यांच्या जाण्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 145 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं 45 पानांचं पुस्तक आजही बेस्ट सेलर! बातमीने खाली एएफपीचा हवाला देत म्हटले आहे की, मृत्यूची अधिकृत पुष्टी स्थानिक वेळेनुसार रात्री 3.00 वाजता करण्यात आली, तर IST नुसार रात्री 02.00 वाजता. शास्त्री यांचे पार्थिव सकाळी 9.00 वाजता विमानाने दिल्लीला पोहोचेल. रात्रीच्या जेवणानंतर त्यांनी शेवटच्या वेळी जाहीरपणे या करारावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्याशी त्यांचा हा चांगला करार होता. यावर पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब म्हणाले, अल्लाह सर्व काही ठीक करेल. या बातमीत, नवी दिल्लीतून पीटीआयच्या हवाल्याने एक बातमी जोडली गेली, राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्री गुलझारी लाल नंदा यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून शपथ दिली. कुलदीप नायरने त्या रात्रीबद्दल काय लिहिले त्या प्रवासात सुप्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर हेही शास्त्री यांच्यासोबत होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्र "बियॉन्ड द लाइन्स - अॅन ऑटोबायोग्राफी" मध्ये लिहिले आहे, त्या रात्री मला शास्त्रींच्या मृत्यूची पूर्वकल्पना का आली होती ते मला कळले नाही. जेव्हा कोणीतरी माझे दार ठोठावले तेव्हा मला शास्त्रींच्या मृत्यूचं स्वप्न पाहत होतो. मी घाबरून उठलो आणि दरवाजाकडे पळत सुटलो. कॉरिडॉरच्या बाहेर उभी असलेली एक महिला मला म्हणाली, तुमचे पंतप्रधान मृत्यूशय्येवर आहेत. मी घाईघाईने माझे कपडे घातले आणि थोड्याच अंतरावर असलेल्या भारतीय अधिकाऱ्यासोबत शास्त्री जिथे थांबले होते त्या ठिकाणी गेलो. शास्त्री पलंगावर निर्जीव पडले होते पुस्तकात पुढे लिहिले आहे की, “मी कोशागिन व्हरांड्यात उभे असलेले पाहिले. त्यांनी हात वर करून शास्त्री सोडून गेल्याचे संकेत दिले. मोठ्या पलंगावर शास्त्री निर्जीव होते. त्यांची स्लीपर जवळच कार्पेटवर पडलेली होती. खोलीच्या एका कोपऱ्यात पडलेल्या ड्रेसिंग टेबलवर थर्मॉस पडलेला होता. शास्त्रींनी तो उघडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत होते. खोलीत बेल नव्हती. या हलगर्जीपणाबद्दल संसदेत सरकारवर हल्लाबोल झाला, तेव्हा सरकार साफ खोटे बोलले होते. लिंगबदल केलेल्या अशा नेत्या ज्यांचा दक्षिण भारतातील राजकारणात आहे दबदबा रात्री त्यांच्या घरून काय फोन आला होता? “रात्री मला दिल्लीहून त्यांचे दुसरे खाजगी सचिव वेंकटरामन यांचा फोन आला. ज्यामध्ये त्यांनी शास्त्रींच्या घरातील लोक खूश नसल्याचे सांगितले होते. प्रजा सोशालिस्ट पार्टीचे सुरेंद्र नाथ द्विवेदी आणि जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी यांनी हाजी पीर आणि तिथवाल येथून भारतीय सैन्याने माघार घेतल्यावर टीका केली होती, असेही त्यांनी सांगितले. रात्री जेवण आटोपल्यानंतर शास्त्रींना याबाबत सांगण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, विरोधक या करारावर टीका करतील. तरीही या प्रतिक्रियांबद्दल शास्त्री खरोखरच चिंतेत होते." मुलगी फोनवर काय बोलली? नय्यर यांच्या पुस्तकानुसार, "रात्री 11 च्या सुमारास त्यांचे सचिव जगन्नाथ सहाय यांनी शास्त्री यांना त्यांच्या घरी बोलायचे आहे का, असे विचारले. कारण गेल्या दोन दिवसांपासून ते त्यांच्या कुटुंबाशी बोलू शकले नाहीत. शास्त्रींनी आधी नाही म्हटलं, नंतर इरादा बदलला आणि फोन करायला सांगितलं. ही सुद्धा हॉटलाईन होती, त्यामुळे लगेच फोन लागला." “सर्वप्रथम शास्त्री जावई व्हीएन सिंग यांच्याशी बोलले. त्यांच्यात विशेष काही बोलणं झालं नाही. यानंतर शास्त्रींची मोठी आणि आवडती मुलगी कुसुम फोनवर आली. शास्त्रींनी त्यांना विचारले, तुला कसे वाटले? कुसुमने उत्तर दिले, बाबूजी, आम्हाला ते आवडले नाही. शास्त्रींनी अम्मांबद्दल विचारलं. म्हणजे शास्त्रीजींच्या पत्नी ललिताजींबद्दल. तेव्हा कुसुम म्हणाली, तिलाही ते आवडले नाही. यावर शास्त्रीजी आपल्या सहकाऱ्यांना उदासपणे म्हणाले, जर घरातील लोकांना ते आवडत नसेल तर बाहेरचे लोक काय म्हणतील." शास्त्रीजी नाराज का झाले? जेव्हा शास्त्रींनी कुसुमला फोन अम्माला देण्यास सांगितले तेव्हा त्या म्हणाले, की अम्मा बोलू इच्छित नाहीत. शास्त्रीजींना वारंवार सांगूनही ललिताजी फोनवर आल्या नाहीत. यानंतर शास्त्रीजी खूप नाराज झाले. झोपण्यापूर्वी दूध कोणी दिलं? यानंतर, रात्री झोपण्यापूर्वी त्याचा सहाय्यक रामनाथने त्यांना दूध दिले, जे ते नेहमी झोपण्यापूर्वी घेत असे. यानंतर शास्त्रीजी चालू लागले. त्यानंतर त्यांनी पाणी मागितले. मध्यरात्रीच्या काही वेळापूर्वी, त्यांनी रामनाथला त्यांच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितले, कारण काबूलला जाणारे विमान पकडण्यासाठी त्यांना पहाटे उठायचे होते. रामनाथ यांनी त्यांच्याच खोलीत जमिनीवर झोपण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, शास्त्रींनी त्यांना वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत जाण्यास सांगितले. निवडणूक आचारसंहिता लागल्यावर काय होतं? सामान्य लोकांसाठी 'हे' नियम असतात का? रात्री 1.20 वाजता डॉक्टरांना बोलावणं रात्री 1.20 वाजता, जेव्हा भारतीय पंतप्रधानांची टीम सकाळच्या प्रस्थानासाठी त्यांचे सामान बांधत होती, तेव्हा शास्त्रीजी सचिव जगन्नाथ यांच्या दारात हजर झाले. ते मोठ्या कष्टाने म्हणाले, डॉक्टर साहेब कुठे आहेत. त्यानंतर खोलीत परतताच त्यांना खोकला येऊ लागला. त्यांना सहकाऱ्यांना बेडवर नेले. जगन्नाथाने त्यांना पाणी दिलं. शास्त्रींनी त्यांच्या छातीला स्पर्श केला आणि बेशुद्ध झाले. तोपर्यंत सर्व काही संपले होतं तोपर्यंत डॉक्टर चुग आले होते. शास्त्रींचे मनगट हातात घेतल्यानंतर त्यांना रडू आवरलं नाही, त्यांनी तात्काळ इंजेक्शन दिलं. कोणताच प्रतिसाद न आल्याने तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एक महिला रशियन डॉक्टरही आली. मग इतर काही डॉक्टर. पण शास्त्री यांचे निधन झाले होते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Delhi, PM

    पुढील बातम्या