मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer: मान्सूनची थांबलेली वाटचाल पुन्हा कधी सुरू होणार?

Explainer: मान्सूनची थांबलेली वाटचाल पुन्हा कधी सुरू होणार?

प्रतिकात्मक फोटो.

प्रतिकात्मक फोटो.

जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात काही ठिकाणी तर वेळेच्या आधीच दाखल झालेल्या मान्सूनने कुठे दडी मारली आहे? कधी परतणार पाऊस?

    नवी दिल्ली, 7 जुलै : देश व्यापण्यापूर्वीच मान्सूनची (Monsoon) वाटचाल थांबली आहे. कुठे जोरदार पाऊस तर कुठे पावसाची (Rain) ओढ असे चित्र असताना मान्सूनने ब्रेक घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे काही भागात उष्णता वाढली आहे. राजधानी दिल्ली तर 1 जुलैला पारा 43.5 अंश सेल्सिअस होता. दिल्लीत जुलैमध्ये एवढ्या कमाल तापमानाची नोंद गेल्या 9 वर्षांत हे पहिल्यांदाच झाली आहे.

    उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 7 अंशापेक्षा अधिक आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmers) चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाशी लढा देत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही ही बाब गंभीर आहे.

    याबाबत भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक के. जे. रमेश यांच्याकडून जाणून घेऊया की मान्सूनची वाटचाल का थांबली आहे. उन्हाचा चटका अजून किती दिवस सहन करावा लागेल आणि मान्सूनच्या ब्रेकचा (Monsoon Break) एकूण पाऊसमानावर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया...

    मान्सूनचा ब्रेक म्हणजे काय?

    भारतात जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी मान्सूनचा असतो. या काळात मान्सूनच्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो. परंतु, या 4 महिन्यांच्या काळात अनेकदा एक किंवा दोन आठवडे पाऊस होत नाही. याला मान्सून ब्रेक म्हणतात. मान्सूनच्या या ब्रेकला अनेक कारणं असतात.

    राज्यात मान्सून वापसीचे संकेत, 3 दिवस पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची शक्यता

    मान्सून ब्रेकची कारणं काय?

    दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मागील सुमारे 2 आठवड्यांपासून मान्सूनची वाटचाल थांबली आहे. याला पश्चिम भागातील काही घडामोडी कारणीभूत आहेत. यामुळे पश्चिम भागाकडून जोरदार आणि गरम वारे वाहू लागले आहेत. हे वारे पूर्वेकडून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना रोखून पुढे जात आहेत. त्यामुळे मान्सूनचे वारे (Monsoon Winds) पुढे सरकत नाहीत.

    यावेळचा मान्सून ब्रेक काही वेगळा आहे का?

    देशात 4 महिन्यांच्या पावसाळ्यात मान्सून ब्रेक घेतो म्हणजेच पावसात खंड पडतो. यंदा मात्र हा ब्रेक थोडासा वेगळा आहे, कारण देश व्यापण्यापूर्वीच मान्सूनने ब्रेक घेतला आहे. अनेकदा जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनने पूर्ण देश व्यापल्यानंतर अशी स्थिती दिसून येते. परंतु, यंदा देश व्यापण्यापूर्वीच मान्सूनने ब्रेक घेतला आहे.

    आतापर्यंत मान्सून कुठपर्यंत पोहोचला आहे?

    30 जून पर्यंत पूर्व राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि चंदीगडचा काही भाग वगळता मान्सूनने उर्वरित देश व्यापला आहे. मान्सूनची रेषा गेल्या 2 आठवड्यापासून बाडमेर, भिलवाडा, धौलपुर, अलिगड, मेरठ, अंबाला आणि अमृतसर येथेच अडकली आहे. सर्वसामान्यपणे 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो. परंतु यंदा संपूर्ण देश व्यापण्यासाठी मान्सूनला 1 आठवडा जास्त लागेल.

    मान्सून पुन्हा वाटचाल कधी सुरु करु शकेल?

    7 जुलैपर्यंत देशात उष्म्याची (Heat Wave) स्थिती कायम राहिल. 7 जुलै नंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यानंतर मान्सूनच्या वाटचालीस वेग येण्याची शक्यता आहे.

    आता पर्यंत किती पाऊस पडलाय?

    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून काळात देशात जून महिन्यात 167 मिलीमीटर पावसाची नोंद होते. मात्र यावेळी 183 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

    कोणती Corona Vaccine सर्वात प्रभावी? पाहा प्रत्येक कोरोना लशीचा Efficacy Rate

    याचाच अर्थ पहिल्या महिन्यातच सरासरीच्या तुलनेत 10 टक्के पाऊस अधिक झाला आहे. देशातील अन्य भागांच्या तुलनेत मध्य भारतात 17 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

    विविध एजन्सींचे मान्सून विषयी अनुमान काय आहे?

    वेदर एजन्सी स्कायमेटने (Skymet) यंदा देशात 907 मिलीमीटर पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. याचाच अर्थ देशात यंदा सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होईल. संपूर्ण देशात मान्सूनच्या 4 महिन्यात सरासरी 880.6 मिलीमीटर पाऊस होतो. यालाच लॉन्ग पिरीयड अॅव्हरेज (LPA) किंवा दिर्घकालीन सरासरी म्हणतात. म्हणजेच 880.6 मिलीमीटर पाऊस म्हणजेच 100 टक्के पाऊस होय. यंदा 907 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच देशात मान्सून सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक होईल.

    मान्सून सामान्य असेल किंवा चांगला हे कसं मोजलं जातं?

    देशातील सरासरी पावसाची आकडेवारी लॉन्ग पिरीयड अॅव्हरेजच्या आधारे विविध स्तरांमध्ये विभागली जाते.

    - लॉन्ग पिरीयड अॅव्हरेजनुसार 90 टक्के ते 110 टक्के झालेला पाऊस हा सामान्य मानला जातो.

    - लॉन्ग पिरीयड अॅव्हरेजनुसार 90 टक्के किंवा त्यापेक्षा कमी झालेला पाऊस हा सामान्यपेक्षा कमी मानला जातो

    - लॉन्ग पिरीयड अॅव्हरेजनुसार 110 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झालेला पाऊस सामान्यपेक्षा अधिक मानला जातो.

    यंदाच्या मान्सून ब्रेकमुळे संपूर्ण पावसावर काही परिणाम होईल का?

    नाही. संपूर्ण देशात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत 10 टक्के अधिक पाऊस झाला आहे. हवामान विभागाने जुलैत 277 मिलीमीटर पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. जर जुलैच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत कमी पाऊस झाला तर, पुढील 20 दिवसांत तो दमदार बरसेल. मात्र पुढील 10 दिवसांत मान्सून सक्रिय झाला नाही तर त्याचा प्रतिकूल परिणाम खरीप हंगामातील (Kharip Season) पिकांवर होईल.

    First published:
    top videos

      Tags: Monsoon, Weather update