उमरकोट, 3 जानेवारी : पाकिस्तान (Pakistan) हा एक मुस्लिम देश असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. जसे भारतात (India) मुस्लिम संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तशीच पाकिस्तानातही हिंदू धर्मियांची मोठी संख्या पाहायला मिळते. पाकिस्तानातील उमरकोट (Umerkot) हा जिल्हा असा आहे, जिथे हिंदू लोकसंख्या बहुसंख्य आहे. व्यापारावर नियंत्रणाच्या बाबतीत हा समुदाय प्रबळ आहे. मात्र, असे असूनही या भागातील हिंदूंची स्थिती ठीक नाही. हिंदू मतदार बहुसंख्य असूनही येथे हिंदू समाजाचा लोकप्रतिनिधी नाही. निवडून आलेले प्रतिनिधित्व नसल्यामुळे हिंदूंना अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, धार्मिक सलोख्याबाबत बोलायचे झाल्यास परिसरातील परिस्थिती अधिक चांगली दिसते.
बीबीसीच्या अहवालानुसार 10 लाख 73 हजार लोकसंख्या असलेल्या उमरकोटच्या लोकसंख्येपैकी 52 टक्के लोक हिंदू आहेत. पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर म्हटल्या जाणाऱ्या कराचीपासून उमरकोटचे अंतर सुमारे 325 किमी आहे. लोककथांमध्येही या स्थानाचा अतिशय महत्त्वाचा उल्लेख आढळतो. येथील नावाचा संबंध त्या किल्ल्याशी आहे, जिथे राजपूत ठाकूर वंश आणि समुरो राज्य करत होते. थार हा हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत उमरकोट नंतरचा दुसरा सर्वात मोठा जिल्हा आहे, जिथे हिंदू लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे.
अहवालानुसार, उमरकोटचा आर्थिक कणा शेती म्हणता येईल, जिथे बहुतेक जमीनदार मुस्लिम आहेत, तर 80 टक्के शेतकरी हिंदू दलित समाजाचे आहेत. दुकानदारांबद्दल बोलायचे झाले तर यातील बहुतांश उच्चवर्णीय असून खत, बियाणे आणि सराफा बाजारात त्यांचे वर्चस्व आहे.
भारत आणि पाकिस्तानने आपापल्या अण्वस्त्रांची यादी एकमेकांना का दिली?
राजकीय समीकरण
पाकिस्तान पीपल्स पार्टी गेल्या 28 वर्षांपासून येथे विजय मिळवत आहे. उमरकोट जिल्ह्यात एक राष्ट्रीय असेंब्ली आणि चार प्रांतीय विधानसभेच्या जागा आहेत. अहवालानुसार, येथील बहुतांश राजकीय पक्ष सर्वसाधारण जागांवर अल्पसंख्याक उमेदवारांना संधी देत नाहीत. येथील मतदारांची संख्या 5 लाख 34 हजार असून त्यापैकी सुमारे 54 टक्के पुरुष आहेत.
2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) च्या तिकिटावर लढलेल्या नीलम वालजी म्हणतात, “राजकीय पक्षांनी एक परंपरा प्रस्थापित केली आहे. भिल्ल, कोहली, मेंघवार, मल्ही बर्दरी इत्यादी विविध समाजातील उमेदवारांमध्ये राखीव जागा वाटून देतात आणि असे करून ते संपूर्ण समाजाची मते हिरावून घेतात.
उमरकोटचे रहिवासी असलेले लालचंद मल्ही हे आरक्षित जागेवर पीटीआयचे नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत. ते सांगतात की हिंदू बहुसंख्य असूनही बहुतांश राजकीय पक्ष अल्पसंख्याकांना सर्वसाधारण जागांवर तिकीट देत नाहीत.
नोकरीत अडचणी
शिक्षण, आरोग्य, पोलीस आणि पालिका हेच विभाग आहेत जिथे सरकारी नोकऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत. 209 कर्मचारी असलेल्या पालिकेतील 60 टक्के मुस्लिम आहेत. मल्ही म्हणतात, “सरकारी नोकऱ्यांचा आपल्या समाजातील राजकारणाशी जवळचा संबंध आहे. तुमचं प्रतिनिधीत्व नसेल तर कोटा आणि पक्ष सोडा तुम्हाला गुणवत्तेवरही नोकरी मिळत नाही. या कारणामुळे अल्पसंख्याक समुदायांना अनेकदा चांगल्या नोकऱ्या मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते मेवा राम परमार म्हणाले, की हिंदू समाजाला निवडून आलेला प्रतिनिधी नसून अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहेत. "नोकऱ्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याने अल्पसंख्याक चांगल्या नोकऱ्यापासून वंचित राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.