जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / 90 हजार पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकायला लावणारे सॅम माणेकशॉ कोण होते? वाचा न ऐकलेले किस्से

90 हजार पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकायला लावणारे सॅम माणेकशॉ कोण होते? वाचा न ऐकलेले किस्से

90 हजार पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकायला लावणारे सॅम माणेकशॉ कोण होते? वाचा न ऐकलेले किस्से

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam manekshaw) यांचा जन्म 3 एप्रिल 1914 रोजी अमृतसर येथे झाला. सॅम यांचे वडील डॉ. होर्मुसजी माणेकशॉ होते. आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन, माणेकशॉ यांनी जुलै 1932 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि दोन वर्षांनी 4/12 फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये सामील झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे : भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam manekshaw) यांचा आजच्याच दिवशी 3 मे 1914 रोजी जन्म झाला होता. त्यांचे पूर्ण नाव सॅम होरमुज्जी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ होते. परंतु, क्वचितच त्यांना या नावाने संबोधले जात असे. त्यांचे मित्र, त्यांची पत्नी, त्यांची नातवंडे, त्यांचे अधिकारी किंवा अधीनस्थ त्यांना एकतर सॅम किंवा “सॅम बहादूर” म्हणत. सॅम यांना 1942 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, बर्मीच्या आघाडीवर, एका जपानी सैनिकाने त्याच्या मशीनगनमधून त्यांचे आतडे, यकृत आणि मूत्रपिंडात सात गोळ्या झाडल्या होत्या. जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचे आणि शौर्याचे किस्से वाचा जे अतिशय मनोरंजक तसेच प्रेरणादायी आहेत. ही घटना 3 डिसेंबर 1971 ची आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला केला. भारतीय लष्करानेही पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमधील हे युद्ध अनेक दिवस चालले. अनेक सैनिक जखमी झाले, अनेक शहीद झाले. पण भारतीय सैन्याने निर्धाराने युद्ध सुरूच ठेवले. अखेर 13 दिवसांनंतर पाकिस्तानी लष्कराच्या 90 हजारांहून अधिक सैनिकांनी शस्त्रे टाकली. इतक्या मोठ्या संख्येने सैनिकांनी आत्मसमर्पण करण्याची ही इतिहासात पहिलीच वेळ होती. लष्कराच्या या पराक्रमाचे श्रेय जनरल सॅम माणेकशॉ यांना जाते, असे म्हटले जाते. वडिलांच्या विरोधात सैन्यात भरती सॅम यांचा जन्म 3 एप्रिल 1914 रोजी अमृतसर येथे झाला. सॅम यांचे वडील डॉ. होर्मुसजी माणेकशॉ होते. नैनिताल येथून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हिंदू सभा महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले. आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन, माणेकशॉ यांनी जुलै 1932 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि दोन वर्षांनी 4/12 फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये सामील झाले. त्यांना तरुण वयात युद्धात सामील व्हावे लागले. एका सर्वेक्षणाने कसं बदललं प्रशांत किशोर यांचं आयुष्य? आता नवी इंनिंगचं काय होणार? दुसऱ्या महायुद्धात 7 गोळ्या लागल्या सॅम यांना त्यांच्या लष्करी कारकिर्दीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना तरुण वयात युद्धात सामील व्हावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या महायुद्धात सॅम यांच्या शरीरात 7 गोळ्या लागल्या होत्या. सर्वांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडली होती. मात्र, डॉक्टरांनी वेळीच सर्व गोळ्या काढल्या आणि त्यांचा जीव वाचला. सॅम यांचे उत्तर ऐकून इंदिरा गांधी थक्क झाल्या इंदिरा गांधी आणि सॅम माणेकशॉ यांचा हा किस्सा इतिहासाच्या पानात नोंदवला गेला आहे. खरे तर 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाकिस्तानवर हल्ला करायचा होता. पण जनरल सॅम यांनी पाकिस्तानशी युद्ध करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांनी इंदिरा गांधींना सांगितले की, यावेळी आमचे सैन्य युद्धासाठी तयार नाही. सैन्याला प्रशिक्षणासाठी थोडा वेळ हवा आहे. हे ऐकून इंदिरा गांधी थक्क झाल्या. त्यांनी लष्कराच्या प्रशिक्षणासाठी काही वेळ दिला आणि 1971 मध्ये सॅम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर पाकिस्तानी लष्कराशी लढले. फील्ड मार्शल ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय जनरल सॅन माणेकशॉ यांना त्यांच्या लष्करी कारकिर्दीत अनेक सन्मान मिळाले. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांना फील्ड मार्शल ही पदवी मिळाली. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय सेनापती होते. 1972 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका वर्षानंतर 1973 मध्ये ते लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते वेलिंग्टनला गेले. 2008 साली वेलिंग्टनमध्येच त्यांचे निधन झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात