मराठी बातम्या /बातम्या /explainer /

'हे' देश आहेत अमेरिकेचे कट्टर शत्रू! काही लहान असूनही देतायेत आव्हान, काय आहे कारण?

जगात असे काही देश आहेत ज्यांना अमेरिकेचे शत्रू घोषित केले जाते. आजही हे देश अमेरिकेला आव्हान देत आहेत. यामध्ये चीन हा असा देश आहे, जो 70 च्या दशकात अमेरिकेचा मित्र होता. पण, आता सर्वात मोठा शत्रू आहे. चीनच्या सामर्थ्याला अमेरिकेने कोणत्याही परिस्थितीत कमी लेखले नाही. अमेरिकेचे सर्वात बलाढ्य शत्रू देश कोण आहेत ते जाणून घ्या

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

दुसऱ्या महायुद्धात जपानवर अण्वस्त्र हल्ला करून सुरुवात झालेल्या अमेरिकन साम्राज्याला सुरुवातीपासूनच सोव्हिएत युनियनने आव्हान दिले होते. जग दोन ध्रुवांमध्ये विभागले गेले. अमेरिका एका बाजूला आणि सोव्हिएत युनियन दुसऱ्या बाजूला. 45 वर्षांच्या शीतयुद्धानंतर 90 च्या दशकात सोव्हिएत युनियन संपुष्टात येऊन अनेक देशांमध्ये विभागले गेले. सध्याच्या जगात चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असाला तरी रशिया, इराण, क्युबा आणि व्हेनेझुएला हेही त्याचे मोठे शत्रू देश आहेत.

सोव्हिएत युनियनचे केंद्र असलेले रशिया आणि अमेरिका यांच्यातील युद्ध जवळपास 80 वर्षांपासून सुरू आहे. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमधील शीतयुद्ध सुमारे 45 वर्षे चालले. हे शीतयुद्ध 1990 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर संपुष्टात आले. सोव्हिएट्सच्या विघटनाने नव्वदच्या दशकात अमेरिका जगाची घोषित महासत्ता म्हणून उदयास आली. एकीकडे त्याचा जुना शत्रू कोसळला होता तर दुसरीकडे जगातील अनेक देश त्याच्या प्रभावाखाली भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे झुकत होते. पण रशियाने व्लादिमीर पुतिन यांच्या उदयाने अमेरिकेसमोर आपली स्थिती मजबूत करण्यास सुरुवात केली. व्लादिमीर पुतिन जसजसे बलवान झाले तसतसे रशिया पुन्हा एकदा अमेरिकेसमोर त्याच पद्धतीने उभे राहू लागला.

सध्याचा रशिया सोव्हिएत इतका ताकदवान नक्कीच नाही. मात्र, सीरियातील अमेरिकेच्या कारवाईदरम्यान असद सरकारला थेट रशियानेच पाठिंबा दिला होता. रशियाच्या पाठिंब्यामुळे अमेरिकेला सीरियामध्ये अधिक ताकद आणि शक्ती पणाला लावावी लागली. कारण रशियाच्या पाठिंब्यामुळे सीरिया मजबूत होत होता. आताही युक्रेनचा मुद्दा असो किंवा आणखी काही असो, रशिया अमेरिकेला नेहमीच आव्हान देताना पाहायला मिळतो.

अमेरिकेशी संघर्षाच्या बाबतीत चीनचा जगातील सर्व देशांत वरचा क्रमांक लागतो. गेल्या काही दशकांमध्ये चीनची आर्थिक आणि धोरणात्मक प्रगती झपाट्याने झाली आहे. दक्षिण चीन समुद्रातील वर्चस्वावरून अमेरिका आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. गेल्या काही वर्षात चीनने स्वतःला इतके बळकट केले आहे की तो अमेरिकेशी बरोबरी करू लागला आहे. सध्याची स्थिती अशी आहे, की जेव्हा अमेरिका वादाच्या भोवऱ्यात अडकतो तेव्हा चीन नेहमीच त्यांच्या विरोधात भूमिका घेतो.

दोन्ही देशांमधील वैचारिक लढाईलाही मोठा इतिहास आहे. अमेरिका एकीकडे भांडवलशाही व्यवस्थेचे प्रतीक आहे तर चीन मार्क्सवाद/माओवादाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. चीन स्वतःला जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. जगात अमेरिकेचे स्थान आपण घेऊ शकतो हे दाखवण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

इराणशी अमेरिकेच्या संबंधांनाही अनेक दशकांचा इतिहास आहे. 1953 मध्ये इराणमध्ये लोकशाही सरकार हटवण्यात आले तेव्हा पहलवी घराण्याने सत्ता ताब्यात घेतली. इराणमधील लोकशाही सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. हे बंड इराणच्या इतिहासात ऑपरेशन अजाक्स म्हणून लक्षात ठेवले जाते. त्यानंतर तेथील पंतप्रधान असलेले मोहम्मद मोसादेह यांचे सरकार हटवून महंमद रझा पहलवी गादीवर आले. यानंतर इराणची संपूर्ण सत्ता मुहम्मद रजा पहलवीच्या हाती आली. कालांतराने, इराणी लोकांच्या मनात शहाबद्दलची धारणा तयार होऊ लागली की ते अमेरिकन एजंट म्हणून काम करतात. शीतयुद्धातही शहा यांनी अमेरिकेला पूर्ण सहकार्य केले होते.

इराणमधील या काळातील इतिहास मोकळीकतेसाठी लक्षात ठेवला जातो. 70 च्या दशकापर्यंत लोकांचा शहांविरुद्धचा राग वाढला. शाह विरुद्ध लोकांच्या संतापाचे नेते इस्लामिक नेते अयातुल्ला खामेनी होते. खामेनी यांना शाहा यांनी देशातून हाकलून दिले. फ्रान्समध्ये राहून ते शहाविरोधातील चळवळ पुढे नेत होते. अखेरीस 1979 मध्ये, शाहला देश सोडून इजिप्तमध्ये आश्रय घ्यावा लागला. दरम्यान, अयातुल्ला खामेनी यांना पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेहरानमधील अमेरिकी दूतावासातील 52 कर्मचारी आणि नागरिकांना ओलीस ठेवले. यानंतर अमेरिका आणि इराणमधील संबंध बिघडत गेले. मात्र, इराण नेहमीच अमेरिकेसमोर ठामपणे उभा राहिला. अलीकडच्या काळात अमेरिकेने त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत.

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन यांची प्रतिमा हुकूमशहा म्हणून जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये निर्माण झाली आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात जोरदार भाषणबाजी करताना दिसतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले असले तरी तसे होऊ शकले नाही. उत्तर कोरिया अजूनही अमेरिकेला सतत आव्हान देत आहे. त्यांचा अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरुच आहे.

क्युबा आणि व्हेनेझुएला हे दोन्ही देश वैचारिकदृष्ट्या अमेरिकेच्या भांडवलशाही धोरणाच्या विरोधात मानले जातात. क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो आणि व्हेनेझुएलाचे ह्युगो चावेझ या दोघांनीही बराच काळ अमेरिकेविरुद्ध झेंडा रोवला होता. मात्र, कालांतराने या दोन्ही देशांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. दोन्ही देश आर्थिक अस्थिरतेच्या काळातून जात आहेत. असे असतानाही या दोन्ही देशांमध्ये नेहमीच अमेरिकेच्या विरोधात वातावरण असते आणि हे दोन्ही देश नेहमीच अमेरिकेला वाईट म्हणत आले आहेत.

First published:

Tags: America, Iran, United States of America