मराठी बातम्या /बातम्या /explainer /अशाप्रकारे चुकून लागला चहाचा शोध! भारतात पोहचण्याचं हे आहे कारण

अशाप्रकारे चुकून लागला चहाचा शोध! भारतात पोहचण्याचं हे आहे कारण

भारतात सामान्यतः ईशान्येकडील भागात आणि निलगिरीच्या टेकड्यांमध्ये चहाचे पीक घेतले जाते. आज भारत जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक आहे. आंतरराष्ट्रीय चहा दिवसानिमित्त (International Tea Day 2022) काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ.

भारतात सामान्यतः ईशान्येकडील भागात आणि निलगिरीच्या टेकड्यांमध्ये चहाचे पीक घेतले जाते. आज भारत जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक आहे. आंतरराष्ट्रीय चहा दिवसानिमित्त (International Tea Day 2022) काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ.

भारतात सामान्यतः ईशान्येकडील भागात आणि निलगिरीच्या टेकड्यांमध्ये चहाचे पीक घेतले जाते. आज भारत जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक आहे. आंतरराष्ट्रीय चहा दिवसानिमित्त (International Tea Day 2022) काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ.

मुंबई, 21 मे : आंतरराष्ट्रीय चहा दिवस (International Tea Day 2022) दरवर्षी 21 मे रोजी साजरा केला जातो. चहाच्या मळ्यातील कामगारांच्या सुरक्षित कामाची परिस्थिती, वाजवी व्यापार आणि चहाचे उत्पादन सुधारण्यासाठी शाश्वत वातावरण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो. आज चहा भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. सकाळी सर्वात आधी चहा पिण्याची प्रथा केवळ भारतातच नाही तर अनेक देशांत शेकडो वर्षे जुनी आहे. चहाचा शोध (history of Tea) भारतात लागला असे बहुतेकांना वाटते पण तसे नाही. त्याची सुरुवात चीनपासून झाली. त्याची सुरुवात कशी झाली आणि भारतात कशी पोहोचली ते जाणून घेऊ.

पहिली चहाची गोष्ट

एका पौराणिक कथेनुसार, सुमारे 2700 ईसापूर्व, चिनी शासक शेन नुंग बागेत बसून गरम पाणी पीत होते. त्यानंतर एका झाडाचे एक पान पाण्यात पडले, त्यामुळे त्याचा रंग बदलला आणि वासही आला. राजाने जेव्हा त्याचा आस्वाद घेतला तेव्हा त्याला त्याची चव खूप आवडली आणि त्यामुळे चहाचा शोध लागला. त्याच वेळी, दुसऱ्या कथेनुसार, 6व्या शतकात, बोधिधर्म, एक भारतीय बौद्ध भिक्षू, चीनच्या हुनान प्रांतात न झोपता ध्यान करत असे. ते जागृत राहण्यासाठी विशिष्ट वनस्पतीची पाने चघळत असत आणि ही वनस्पती नंतर चहाची वनस्पती म्हणून ओळखली गेली.

चहाचे प्रकार..

पांढरा चहा हा सर्व चहापैकी सर्वात शुद्ध आणि कमी प्रक्रिया केलेला चहा आहे. ग्रीन टी हा आशियातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. ओलांग चहा हा चीनी रेस्टॉरंटमध्ये दिला जाणारा चायनीज चहा आहे. काळ्या चहाला गरम पाण्यात पाने टाकून किंवा दूध आणि साखर घालून प्यायली जातात. हर्बल चहामध्ये चहाची पाने टाकली जात नाहीत.

उष्णतेच्या लाटेच्या कहरासाठी कोण आहे जबाबदार? संशोधनातून कारण आलं समोर

भारतात चहाचे आगमन..

1824 मध्ये, बर्मा (म्यानमार) आणि आसामच्या सीमावर्ती टेकड्यांवर चहाची रोपे सापडली. ब्रिटीशांनी 1836 मध्ये भारतात आणि 1867 मध्ये श्रीलंकेत चहाचे उत्पादन सुरू केले. पूर्वी लागवडीसाठी बियाणे चीनमधून आले होते. परंतु, नंतर आसाम चहाचे बियाणे वापरात आले. ब्रिटीश बाजारपेठेतील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी चहाचे भारतात उत्पादन सुरू करण्यात आले होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भारतात चहाचा वापर नगण्य होता. पण आज तुम्हाला भारताच्या प्रत्येक चौकात, कानाकोपऱ्यात चहा नक्कीच मिळेल.

चहाचे वर्गीकरण..

लागवडीच्या जागेनुसार चहाचे वर्गीकरण केले जाते. जसे की चायनीज, जपानी, श्रीलंकन, इंडोनेशियन आणि आफ्रिकन चहा. काही नावे प्रदेश-विशिष्ट आहेत जसे की दार्जिलिंग, आसाम, भारतातील निलगिरी, श्रीलंकेतील उवा आणि डिंबुला, चीनच्या अनहुई प्रांतातील केमन प्रदेशातील केमुन चहा आणि जपानचा एन्शु चहा.

संदर्भ - The Story of Tea, Tea : The Drink That Changed The World, Britannica.com

First published:
top videos

    Tags: Tea, Tea drinker