जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरुन तीन राज्यातीन पोलीस आमने-सामने! कोण जिंकेल कायद्याची लढाई?

भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरुन तीन राज्यातीन पोलीस आमने-सामने! कोण जिंकेल कायद्याची लढाई?

भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरुन तीन राज्यातीन पोलीस आमने-सामने! कोण जिंकेल कायद्याची लढाई?

Tajinder Bagga Arrest : भारतीय जनता पक्षाचे नेते तजिंदर पाल सिंग बग्गा (Tajinder Bagga Arrested) यांना पंजाब पोलिसांनी (Punjab Police) आज म्हणजेच शुक्रवारी अटक केली. मात्र, त्यांना मोहालीला घेऊन जात असताना हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) पंजाब पोलिसांच्या ताफ्याला कुरुक्षेत्रात अडवले. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 मे : भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा (Tajinder Bagga Arrested) यांना पंजाब पोलिसांनी (Punjab Police) शुक्रवारी अटक केली. तजिंदरसिंग बग्गा यांच्या अटकेवरून (Tajinder Bagga Arrest) दिल्लीपासून हरियाणापर्यंत राजकीय खळबळ उडाली होती. तजिंदर पाल सिंग बग्गा याच्या अटकेनंतर पंजाब पोलिसांचे पथक मोहालीला जाण्यासाठी हरियाणामार्गे जात होते. त्यावेळी कुरुक्षेत्रात हरियाणा पोलिसांच्या (Haryana Police) पथकाने पंजाब पोलिसांना रोखले आणि बग्गा यांच्या अटकेबाबत बराच वेळ चौकशी केली. यानंतर दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) एक पथक कुरुक्षेत्रातील ठाणेसर पोलीस ठाण्यातही पोहोचले, जिथे बग्गा यांना ठेवण्यात आले होते. आता दिल्ली पोलिसांचे पथक बग्गांसोबत राजधानीला रवाना झाल्याची बातमी आहे. दिल्लीत पंजाब पोलिसांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात बग्गा यांच्या अटकेवरून दिल्लीपासून कुरुक्षेत्रापर्यंत राजकीय महाभारत सुरू आहे. एका राज्यातील पोलीस दुसऱ्या राज्यातील पोलिसांनी असं रोखू शकतात का? काय आहेत नियम? चला जाणून घेऊ. पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. पण, दिल्लीतील पोलीस मात्र उत्तर प्रदेशची आहे. तर हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे. दिल्ली पोलिसांना माहिती न देता पंजाब पोलिसांची आरोपीला अटक मोहालीमध्ये भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी बग्गा यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अटक केली. या अटकेवेळी दिल्ली पोलिसांना माहिती देणं आवश्यक होतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं की साधारण अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे. विशेषकरुन अशावेळी जिथं कायदा व्यवस्था मोडू शकते. अशा स्थितीत दुसऱ्या राज्याची पोलीस जिल्ह्यातील एसपीला माहिती देऊन स्थानिक पोलिसांना सोबत ठेऊ शकते. संशयास्पद प्रकरणात ट्रान्झिट रिमांडची देखील व्यवस्था आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का, परळी न्यायालयाने काढले आणखी एक अजामीनपात्र वॉरंट

स्थानिक पोलिसांवर विश्वास नसेल तर? जर बातमी लिक होईल किंवा अन्य कोणत्या कारणाने स्थानिक पोलिसांना माहिती द्यायची नसेल तर दुसऱ्या राज्यातील पोलिसांकडे एक पर्याय असतो, ट्रान्झिट रिमांड. स्थानिक पोलिसांना माहिती न देता आरोपीला अटक केल्यानंतर कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन आरोपीला आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतात. ट्रान्झिट रिमांड म्हणजे काय? ट्रान्झिट रिमांड म्हणजे स्थानिक न्यायालयाकडून प्रत्यार्पणाची परवानगी घेऊनच दुसर्‍या राज्यातील पोलिस आरोपींना त्यांच्या भागात घेऊन जातात. प्रत्यार्पणाच्या या परवानगीला ट्रान्झिट रिमांड म्हणतात, ज्या अंतर्गत आरोपीला एका राज्यातून दुसऱ्या राज्याच्या पोलिसांकडे सोपवले जाऊ शकते. जेव्हा पोलिस त्यांच्या प्रभावक्षेत्राबाहेर जाऊन आरोपीला अटक करतात. त्यामुळे न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला अटक करण्यात येते. सीआरपीसीच्या कलम 76 अंतर्गत ट्रान्झिट रिमांड जारी केला जातो. ट्रान्झिट रिमांडशिवाय कैद्याला पोलिस दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाहीत. ट्रान्झिट रिमांड घेताना, आरोपीचा गुन्हा काय आहे, हे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सांगावे लागते. त्याच्यावर कुठे गुन्हा दाखल आहे? याशिवाय पोलीस त्याला कोणत्या ठिकाणी घेऊन जात आहेत, हेही न्यायालयाला सांगावे लागते. मनसे नेते संदीप देशपांडेंवर अटकेची टांगती तलवार; कार ड्रायव्हर अटकेत अपहरणाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अशा परिस्थितीत जर पंबाज पोलिसांनी कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केली नसेल तर त्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: delhi , Punjab
  • First Published :
जाहिरात
जाहिरात