जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Shivrajyabhishek : स्वराज्याच्या शत्रुंना याच मातीत गाडणाऱ्या महाराजांच्या राज्याभिषेकाला का होता विरोध?

Shivrajyabhishek : स्वराज्याच्या शत्रुंना याच मातीत गाडणाऱ्या महाराजांच्या राज्याभिषेकाला का होता विरोध?

Shivrajyabhishek : स्वराज्याच्या शत्रुंना याच मातीत गाडणाऱ्या महाराजांच्या राज्याभिषेकाला का होता विरोध?

Shivrajyabhishek 2022 : काशीच्या गागा भट्टांच्या घराण्याकडून खात्री करून घेऊन शिवाजी महाराजांनी मराठवाड्यातील ब्राह्मणांना राज्याभिषेकासाठी राजी केले. अखेर 6 जून 1674 रोजी संपूर्ण रीतिरिवाजांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 जून : भारताच्या इतिहासातील योद्ध्यांची चर्चा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय (Chhatrapati Shivaji Maharaj) अपूर्ण आहे. स्वराज्याच्या शत्रुंना चारीमुंड्या चित करण्यात आणि भारताचा इतिहास गौरवशाली बनवण्यात शिवाजी महाराजांचे योगदान अविस्मरणीय आहे. यामुळेच 6 जून हा दिवस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद मानला जातो. या दिवशी मुघलांचा पराभव करून शिवाजी महाराज परतले आणि सम्राट म्हणून राज्याभिषेक झाला. दरवर्षी 6 जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek 2022) म्हणून साजरा केला जातो. मराठा इतिहासात हा दिवस इतका महत्त्वाचा का मानला जातो हे या लेखात जाणून घेणार आहोत. मुघल राज्यकर्ते हिंदूंवर करत होते अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. शिवाजी महाराजांचा जन्म इतिहासाच्या अशा कालखंडात झाला जेव्हा दक्षिणेतील विजापूर (कर्नाटक) आदिल शाह आणि उत्तरेला आग्रा/दिल्ली येथे मुघल सम्राटांचे राज्य होते. ज्या राजवटीत हिंदूंवर अत्यंत अत्याचार झाले. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, मुघल शासकांनी इराणी (पर्शियन) आणि मध्य आशियाई लोकांना न्यायालये आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्राधान्य देण्यास सुरुवात केली, त्यामुळे स्थानिक भारतीय जहागीरांना बाजूला करण्यात आलं. लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. पण, त्याविरोधात आवाज उठवणारे कोणीच नव्हते. जेव्हा मुघलांविरुद्ध आवाज उठवला गेला याच दरम्यान पुण्याच्या आसपासच्या मावळ भागातील शिवाजी शाहजीराव भोसले यांच्या नेतृत्वाखालील मुलांचा एक गट आदिलशाह आणि मुघलांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी उभा राहिला. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मावळ्यांनी आपली सत्ता बळकट केली आणि लवकरच ते एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आले. त्यांच्याबद्दल एक गोष्ट स्पष्ट होती की त्यांचा लढा इस्लामविरुद्ध नव्हता तर योगायोगाने मुस्लिम असलेल्या निरंकुश राज्यकर्त्यांविरुद्ध होता. 1659 मध्ये, शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर आदिल शाहच्या सैन्याशी लढाई केली ज्यात त्यांचा विजय झाला. हेही वाचा - Hanuman Birth Place: महाराष्ट्र की कर्नाटक? हनुमानांचा जन्म नेमका कुठं झाला? संपूर्ण वाद समजून घ्या पुरंदरचा तह प्रतापगडच्या विजयानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वदूर पोहचली. पण, त्यांना मुघलांशी पुरंदरचा तह करावा लागला. या तहानुसार त्यांनी जिंकलेली अनेक क्षेत्रे मुघलांना परत करावी लागली. यानंतर 1666 मध्ये महाराज औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले. तेव्हा मुघल शासकाने त्याचा मुलगा संभाजीसह त्यांना कैद केले. प्रतिस्पर्ध्याच्या राजवटीतही शिवाजी महाराज हिंमत हारले नाही. अन् युक्तीने आग्रावरुन निसटून रायगडावर पोहचले. तेथे त्यांनी पुन्हा लोकांना एकत्र केले आणि पुरंदरच्या तहात गमावलेला भाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली. राज्याभिषेक सोपा नव्हता राज्ये संघटित करण्यासाठी आणि सामर्थ्यवान बनण्यासाठी त्यांना पूर्ण शासक व्हायचे आहे हे शिवाजी महाराजांना आतापर्यंत कळले होते. परंतु, सामाजिक-जातीय समस्यांमुळे, सनातनी लोक त्यांना राज्यकर्ता म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. तत्कालीन काळात राज्यकर्ते फक्त क्षत्रिय वंशाच्या लोकांना मानले जात होते. छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नसल्याचे कारण देत त्यांना विरोध केला जात होता. यानंतर काशीच्या गागा भट्टांच्या घराण्याकडून खात्री करून घेऊन शिवाजी महाराजांनी मराठवाड्यातील ब्राह्मणांना राज्याभिषेकासाठी राजी केले. अखेर 6 जून 1674 रोजी संपूर्ण रीतिरिवाजांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात