मुंबई, 14 डिसेंबर : मागच्याच आठवड्यात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. मात्र, अशा अपघातात निधन झालेले हे पहिले व्हीआयपी (VIP) नाहीत. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. संजय गांधी यांनी देशात कोणतेही मोठे संवैधानिक पद भूषवले नाही. परंतु, भारताच्या राजकीय इतिहासात (Political History of India) त्यांची निश्चितच मोठी भूमिका होती. त्यांचा वाढदिवस (Sanjay Gandhi Birthday) आज 14 डिसेंबरला आहे. एकेकाळी ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जात होते.
गांधी कुटुंबात जन्म
संजय गांधी यांचा जन्म 14 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे झाला. ते इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे दुसरे पुत्र आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे धाकटे भाऊ होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण डेहराडून आणि नंतर स्वित्झर्लंडच्या इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल 'इकोले डी'ह्युमनाइट'मध्ये झाले.
खेळ आणि विमानांमध्ये रस
संजय यांनी कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घेतले नाही. मात्र, रोल्स-रॉईस, इंग्लंड येथे ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांची शिकाऊ पदवी घेतली होती. त्यांना स्पोर्ट्स कार तसेच विमानाच्या कलाबाजीत प्रचंड रस होता आणि त्यांच्याकडे पायलटचा परवानाही होता. या खेळात त्यांनी अनेक पारितोषिकेही पटकावली आहेत.
आणीबाणीच्या आधी
देशाच्या राजकारणात अशांतता निर्माण होण्याला संजय गांधी जबाबदार मानले जातात. 1974 पर्यंत देशाच्या राष्ट्रीय राजकीय पटलावर त्यांची उपस्थिती नगण्य होती. पण जेव्हा इंदिरा गांधी आणि काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागला. 25 जून 1975 रोजी कोर्टाने सरकारविरोधात केलेल्या टीकेने बराच बदल झाला.
आणीबाणी
अशा परिस्थितीत इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. देशाला अंतर्गत धोके असल्याचे कारण देत ही आणीबाणी लागू करण्यात आली होती. प्रेसवर सेन्सॉरशिप, जनतेच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आली, अनेक राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली, अनेक पावले उचलली गेली आणि विरोध करणाऱ्या राजकारणी, विचारवंत, कलाकारांसह हजारो लोकांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले किंवा नजरकैदेत ठेवण्यात आले.
हुकूमशाही निर्णय
हा तो काळ होता जेव्हा संजय गांधी त्यांच्या विचित्र निर्णय आणि आदेशांसाठी प्रसिद्ध झाले होते. ते इंदिरा गांधींचे सल्लागार नक्कीच होते, पण आईपासून लपवत त्यांनी अनेक पावलेही उचलली होती. या दरम्यान हुंडा प्रथा संपुष्टात आणण्याबरोबरच शिक्षण, कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, जातिवाद अशा अनेक कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली.
एकाकी हस्तक्षेप
इंदिरा सरकारमध्ये संजय गांधी मंत्रिमंडळासारखे होते, असे म्हटले जाते. प्रत्येक खात्यात आणि मंत्रालयात त्यांचा थेट हस्तक्षेप होता. या कारणामुळे इंद्रकुमार गुजराल यांनीही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा राजीनामा दिला होता. याशिवाय प्रशासन आणि पोलिस खात्यातील उच्चपदस्थांनाही संजय गांधी यांच्याकडून थेट सूचना मिळत होत्या.
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय गांधींनी पुन्हा काँग्रेसच्या पुनरागमनाची योजना आखली. त्यांच्यामुळेच महागाई हा मुद्दा बनवून काँग्रेस 1980 मध्ये पुन्हा सत्तेत येऊ शकली, असे म्हटले जाते. ज्यामध्ये संजय गांधी अमेठीचे खासदार म्हणून निवडून आले होते. पण संजय हे एक निरंकुश नेता म्हणून नेहमी लक्षात राहतात. ते अनेकवेळा आईच्या विरोधात जातानाही दिसले होते. त्यांनी स्वतःच लग्नही त्यांच्या विरोधात जाऊन केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Helicopter, Indira gandhi