मराठी बातम्या /बातम्या /explainer /

विमानात पायलट आणि को-पायलटला मिळतं वेगवेगळं जेवण, कारण वाचून वाटेल आश्चर्य

विमानात पायलट आणि को-पायलटला मिळतं वेगवेगळं जेवण, कारण वाचून वाटेल आश्चर्य

कुठल्याही विमानात पायलट आणि को-पायलट यांना वेगवेगळं अन दिलं जातं. या धोरणामागं एक मोठं कारण आहे.

कुठल्याही विमानात पायलट आणि को-पायलट यांना वेगवेगळं अन दिलं जातं. या धोरणामागं एक मोठं कारण आहे.

कुठल्याही विमानात पायलट आणि को-पायलट यांना वेगवेगळं अन दिलं जातं. या धोरणामागं एक मोठं कारण आहे.

  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 5 डिसेंबर: विमानात पायलट आणि को-पायलट (Separate dinner for pilot and co-pilot) यांना वेगवेगळं जेवण दिलं जातं, हे तुम्हाला माहिती आहे? त्यामागे एक फार मोठं ऐतिहासिक (Historic reason) कारण आहे. रेल्वेमध्ये ज्याप्रमाणं दोन मोटरमन असतात आणि दोघांनाही बसण्यासाठी वेगवेगळ्या सीट्स असतात, त्याचप्रमाणं विमानातही पायलट आणि को-पायलट यांच्यासाठी (Separate seats) वेगवेगळी आसनव्यवस्था करण्यात आलेली असते. जेव्हा जेव्हा पायलटना जेवण दिलं जातं, तेव्हा कधीही दोघांना एकच जेवण दिलं नाही. वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेलं जेवण त्या दोघांना देण्यात येतं. त्यामागे एक मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं. विमानात झाली होती विषबाधा ही घटना आहे 1984 सालची. लंडनहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात जे अन्न प्रवाशांना देण्यात आलं, ते बाधित होतं. हे अन्न् खाल्यामुळे विमानातील सर्वांची तब्येत काही वेळातच बिघडली आणि सर्वांनाच उलट्या आणि जुलाबाचे त्रास व्हायला सुरुवात झाली होती. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर चिंतेचं आणि भीतीचं वातावरण तयार झालं होतं. वैमानिकांनादेखील तेच अन्न देण्यात आलं होतं आणि त्यामुळे दोन्ही वैमानिकांची अवस्थाही वाईट झाली होती. न्यूयॉर्क टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एका प्रवाशाचा विषबाधा होऊन मृत्यूदेखील झाला होता. विषबाधेच्या अनेक घटना द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार ब्रिटीश एअरलाईन्समध्ये 2009 साली फूड पॉयझनिंग झाल्याच्या 32 घटना घडल्या होत्या. तर 2007 साली 39 घटना घडल्या होत्या. या घटनांची सातत्यानं पुनरावृत्ती झाल्याचे अनुभव येत असल्यामुळे वैमानिकांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळं जेवण देण्याची पद्धत पडली. हे वाचा- सैराटपेक्षाही भयंकर कृत्य; भावाने कोयत्याने वार करीत बहिणीचं मुंडक केलं धडावेगळं वैमानिकांना वेगवेगळं अन्न अन्नातून विषबाधा झालीच, तर एकाच वेळी दोन्ही वैमानिक गारद होऊ नयेत, हा या धोरणामागचा उद्देश आहे. जर वैमानिक एकाच वेळी गारद झाले, तर विमानातील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यातील एकाला अन्नातून काही झालं, तर दुसरा पायलट तरी धडधाकट आणि फिट राहावा, या उद्देशानं पायलट आणि को-पायलट यांना वेगवेगळं अन्न देण्यात येतं. विमान चालवत असताना कुठलाही दगाफटका होऊ नये, याचीदेखील दक्षता घेण्याचं कारण यामागे असल्याचं सांगितलं जातं. विमानात अनेकदा विषबाधा होण्याच्या घटना घडत असतात. त्या टाळण्यासाठी हा उपाय करण्यात येतो.
First published:

Tags: Airplane, Food

पुढील बातम्या