मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

Aurangabad : सैराटपेक्षाही भयंकर कृत्य; भावाने कोयत्याने वार करीत बहिणीचं मुंडक केलं धडावेगळं

Aurangabad : सैराटपेक्षाही भयंकर कृत्य; भावाने कोयत्याने वार करीत बहिणीचं मुंडक केलं धडावेगळं

प्रेम विवाह करून स्वत: संसार आनंदानं करण्याची भावाने बहिणीला भयंकर शिक्षा दिली.

प्रेम विवाह करून स्वत: संसार आनंदानं करण्याची भावाने बहिणीला भयंकर शिक्षा दिली.

प्रेम विवाह करून स्वत: संसार आनंदानं करण्याची भावाने बहिणीला भयंकर शिक्षा दिली.

    औरंगाबाद, 5 डिसेंबर : कुटुंबाचा विरोध पत्करून घरापासून लांब जाऊन प्रेम विवाह करणाऱ्या आणि नव्याने संसार उभ्या करणाऱ्या अनेक तरुणींना आजही कुटुंबाचा त्रास सहन करावा लागतो. यातून सैराट चित्रपटासारख्या भयावह घटना समोर येतात. औरंगाबाद (Aurangabad News) येथून अशीच एक घटना समोर (Crime News) आली आहे. सख्ख्या भावाने केलेलं हे कृत्य पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. बहिण तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून भावानेच बहिणीचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या क्रूर भावाने बहिणीवर कोयत्याने वार करत तिचं शिर धडावेगळे केलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोळेगाव गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. हे ही वाचा-औरंगाबादेत दोन गटांत तुंबळ हाणामारी, परिसरात तणावाचे वातावरण, VIDEO Viral या घटनेत मृत्यूमूखी पडलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव किशोरी मोटे आहे. सहा महिन्यापूर्वीच तरुणीने पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. घरी भेटायला येण्याचे नाटक करून सख्ख्या भावाने बहिणीवर कोयत्याचे सपासप वार केले. बहिणीचं मुंडकं धडावेगळं होईपर्यंत तिच्यावर सपासप वार केले. बहिणीचा खून करून आरोपीने वैजापूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. या प्रकरणात विरगाव पोलीस ठाण्याकडून अधिक तपास सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aurangabad News, Crime news

    पुढील बातम्या