मराठी बातम्या /बातम्या /explainer /

अत्याचारानंतर किती तासांत पीडितेचं मेडिकल होणं आवश्यक? कशी होते तपासणी?

अत्याचारानंतर किती तासांत पीडितेचं मेडिकल होणं आवश्यक? कशी होते तपासणी?

अत्याचारानंतर किती तासांत पीडितेचं मेडिकल होणं आवश्यक?

अत्याचारानंतर किती तासांत पीडितेचं मेडिकल होणं आवश्यक?

बलात्काराच्या तक्रारीवर, नमुना फॉरेन्सिक लॅबमध्ये योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पोहोचणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे परिणाम मिळत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 30 नोव्हेंबर : दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढतच चाललं आहे. नॅशनल क्राईम ब्युरोकडून प्रसिद्ध होणारी आकडेवारी धक्कादायक आहे. यातील कित्येक पीडिता न्यायापासून वंचित राहतात. याला अनेक कारणं आहेत. यापैकी महत्त्वाचं म्हणजे पीडित व्यक्तीची वेळेत वैद्यकीय तपासणी न होणे. यामुळे पोलिसांना योग्य पुरावा मिळत नाही. परिणामी अपुऱ्या पुराव्याअभावी दोषी व्यक्ती निर्दोष सुटतो. बलात्कार प्रकरणांबाबत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे काय आहे? हे माहिती असणे आवश्यक आहे.

सँपल म्हणून पीडितेचे केस, कपडे, नखे, योनी आणि गुदद्वारातून नमुने घेतले जातात. या दरम्यान, या ठिकाणी किंवा वस्तूंमध्ये शुक्राणू सापडतात की नाही हे तपासले जाते. ही चाचणी तेव्हाच योग्य आहे, जेव्हा ती शक्य तितक्या लवकर केली जाते. यामध्ये उशीर झाल्यामुळे लघवी, उत्सर्जन किंवा मासिक पाळीमुळे शुक्राणू निघून जातात आणि अहवालावर परिणाम होतो.

अत्याचार तपासण्याचे अनेक मार्ग

फॉरेन्सिक रिसर्च अँड क्रिमिनोलॉजी इंटरनॅशनल नावाच्या सायन्स जर्नलमध्ये तपासानंतर अंतिम निर्णय कोणत्या पद्धतींद्वारे घेतला जातो याबद्दल सांगितले आहे. बलात्काराची पुष्टी करण्यासाठी पीडितेच्या वक्तव्याव्यतिरिक्त वैद्यकीय पुरावाही खूप महत्त्वाचा आहे. या अंतर्गत पीडितेच्या कपड्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाते आणि त्यात वीर्य किंवा रक्त किंवा घाम असल्याचे पुरावे आहेत का ते पाहिले जाते.

वाचा - श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही, पॉलीग्राफ टेस्टनंतर आफताबची कबुली

वेळ फार महत्त्वाची

बलात्काराच्या प्रकरणात पीडितेची नखंही घटनेपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. यामध्ये वीर्य नमुने किंवा गुन्हेगाराच्या त्वचेचे कण असू शकतात, ज्याद्वारे डीएनए चाचणी केली जाऊ शकते. याशिवाय, लाळ, घाम किंवा शुक्राणू तपासण्यासाठी पीडितेच्या त्वचेवर नमुना घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व सँपल गोळा करण्यासाठी एक विशेष पद्धत आहे. त्यामुळे हे वेळेत गोळा करणे आवश्यक आहे.

अनेकवेळा एका दिवसात नमुने गोळा करणे आवश्यक

बलात्काराच्या पद्धतींसोबतच त्याचे नमुने तपासण्याच्या वेळेवरही परिणाम होतो. जर बलात्कार करणाऱ्याने पीडितेसोबत ओरल अत्याचार केले असेल तर तोंडातून स्वॅब चाचणी केली जाते. हे बलात्कारानंतर 12 ते 24 तासांच्या आत व्हायला हवे, अन्यथा परिणामांवर इफेक्ट होऊ शकतो. त्याचप्रमाणे, योनीमध्ये गुप्तांग घातले असल्यास, नमुना 3 ते 5 दिवसांच्या आत घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे परिणाम योग्य मिळत नाहीत.

अनेकवेळा पीडितेला मासिक पाळी येत असेल किंवा ती मूत्राशयाच्या कोणत्याही आजाराने त्रस्त असेल, तर 24 तासांच्या आत नमुना गोळा करणे आवश्यक असते, अन्यथा गर्भाशयाच्या पोकळीतून शुक्राणू बाहेर पडल्याने खरे परिणाम मिळत नाहीत.

कपडे, नखे आणि केस याशिवाय इतरही अनेक नमुने घेतले आहेत. उदाहरणार्थ, जर पीडितेची मासिक पाळी चालू असेल तर तिचा टॅम्पन किंवा पॅड देखील एक महत्त्वाचा पुरावा आहे. एक मार्ग म्हणजे पब्लिक हेयर कॉबिंग तपासणे. यामध्ये पीडित व्यक्तीला स्वच्छ पृष्ठभागावर कंगवा केला जातो जेणेकरुन फॉरेन आब्जेक्ट असेल तर ओळखता येईल.

First published:

Tags: Gang Rape, Rape