Nirav Modi ला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवलं जाणार! वाचा या जेलची खासियत

Nirav Modi ला  मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवलं जाणार! वाचा या जेलची खासियत

प्रत्यार्पण टाळण्यासाठी सुरू असलेल्या ब्रिटनमधील न्यायालयीन लढाईत फरार हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याचा गुरुवारी पराभव झाल्याने त्याचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. नीरव मोदीला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road jail) ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या या तुरुंगात अनेक मोठमोठ्या आरोपींना याआधी ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई 26 फेब्रुवारी : जवळपास 13,600 कोटीच्या पीएनबी घोटाळा प्रकरणी नीरव मोदीनं भारतातील तुरुंगाची अवस्था सांगात स्वतःला भारताकडे न सोपवण्याची मागणी केली होती. सोबतच असाही दावा केला होता, की देशात तुरुंगांची स्थिती इतकी वाईट आहे, की माझं मानसिक आरोग्यही बिघडू शकतं. यानंतर भारत सरकारनं एका व्हिडीओच्या माध्यमातून ब्रिटीश न्यायालयाला तुरुंगातील बॅरक नंबर 12 दाखवलं, ज्यात आरोपींना ठेवलं जातं.

बॅरक नंबर 12 मध्ये शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश येतो आणि यात माणसाच्या गरजा पूर्ण केल्या जात नाही, यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. देशातील सगळ्यात जुन्या असणाऱ्या या तुरुंगाबद्दल बोलताना नीरव मोदीचे वकील म्हणाले, की या तुरुंगाची इमारत दगडात आणि लोखंडानं बनवली गेली आहे, त्यामुळे ती एखाद्या ओवनपेक्षा कमी नाही. सोबतच जेलमध्ये भरपूर गर्दी असल्यानं कोरोनाचीही भिती व्यक्त करत वकीलानं नीरव मोदीला भारतात न पाठवण्याची मागणी केली. मात्र, सरकारच्या बॅरक नंबर 12 मधील अपडेटेट व्हिडीओमुळे वकीलाच्या सर्व दाव्यांवर पाणी फेरलं गेलं. आता ब्रिटीश न्यायालय तुरुंगाच्या स्थितीबद्दल पूर्णपणे समाधानी असून लवकरच नीरव मोदीला भारतात पाठवलं जाऊ शकतं.

मुंबईचं आर्थर रोड जेल नेहमीच चर्चेत -

सुरुवातीला हे जेल 2 एकरमध्ये होतं. मात्र, नंतर याचा विस्तार 6 एकरात करण्यात आला. या तुरुंगात 20 बॅरक आहेत, यातील काही सेल्स आहेत. तसं जेलमधील कैंद्याची क्षमता 804 इतकी आहे. मात्र, अनेकदा इथे क्षमतेपेक्षा अधिक कैदी असतात. किती तरी वेळा इथे 3 हजार कैदी कैद असतात.

बॅरक नंबर 12 का आहे खास -

बॅरक नंबर 12 उच्च सुरक्षा असणारं सेल आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय इथे एक पानही हालत नाही असं म्हटलं जातं. ही सेल 2008 मध्ये आरोपी अजमल कसाबला ठेवण्यासाठी बनवली गेली होती. सुनवाईसाठी कसाबला स्पेशल कोर्टात घेऊन जावं लागत होतं. यादरम्यान तो पळून जाण्याची किंवा हल्ल्याची शक्यता असल्यानं आतमधूनच एक रस्ता तयार करण्यात आला होता. यावर कोणत्या बॉम्बचाही परिणाम होणार नाही, असा हा रस्ता होता. नंतर इथे जबिउद्दीन अंसारीला ठेवलं गेलं होतं. 2008 मध्ये मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तो सहभागी होता. मात्र, अंसारीनं नंतर स्वतःला या सेलमधून काढून दुसरीकडे ठेवण्याची मागणी केली होती. इथे आपल्याला भिती वाटत असून मानसिक स्थिती बिघडत असल्याचं कारण त्यानं दिलं होतं.

या दहशतवाद्यांशिवाय अनेक हाय प्रोफाईल आरोपी इथे राहिले आहेत. हाय प्रोफाईल आरोपींना पुण्याच्या येरवडा किंवा मग मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं जातं. कारण आहे या तुरुंगांमध्ये असणारी कडक सुरक्षा व्यवस्था. आजपर्यंत या तुरुंगामधून एकही कैदी फरार झाल्याची बातमी समोर आलेली नाही. आर्थर रोड जेलमध्येच दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर, मुस्तफा दोसा, यासीन भटकल, शीना बोरा हत्यांकांडातील मुख्य आरोपी आमि इंद्राणी मुखर्जीचे पती पीटर मुखर्जी तसंच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनाही ठेवण्यात आलं होतं.

Published by: Kiran Pharate
First published: February 26, 2021, 11:14 AM IST

ताज्या बातम्या