नवी दिल्ली, 10 जानेवारी : आपल्याला परदेशी जायचं असेल तर त्यासाठी सगळ्यांत आवश्यक गोष्ट म्हणजे पासपोर्ट (Passport). पासपोर्ट (पारपत्र) नसेल तर तुमची सगळी तयारी असूनही काहीही उपयोग नसतो. हा पासपोर्ट म्हणजे आपल्या देशाबाहेर विदेशात आपण भारतीय नागरिक (Indian Citizen) असल्याची ओळख असते. पण आपल्या देशात काही ठराविक रंगाचे पासपोर्ट ठराविक लोकांना दिले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या देशात सर्वसामान्य नागरिकांना निळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. त्याशिवाय मरुन, पांढरा आणि नारंगी म्हणजेच केशरी रंगाचे पासपोर्टही काही ठराविक व्यक्तींना दिले जातात. या ठराविक रंगाच्या पासपोर्टचा अर्थ काय ते जाणून घेऊया. निळ्या रंगाचा पासपोर्ट - भारतातील सर्वसामान्य नागरिकांना निळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. परदेशात भारतीय असल्याची ही ओळख किंवा खूण असते. सर्वसामान्य भारतीय नागरिक ही ओळख पटावी यासाठी याचा रंग निळा ठेवण्यात आला आहे. यावर त्या व्यक्तीचा फोटो, जन्मस्थळ, पत्ता आणि सही असा गोष्टी असतात. पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट - सरकारी पदाधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. सरकारी अधिकारी म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफिशियल्सना हा पासपोर्ट दिला जातो. सरकारी कामांसाठी परदेशात जाणाऱ्या अधिकाऱ्यांना हा पासपोर्ट दिला जातो. त्याच्या रंगावरुनच त्याचं वेगळेपण लक्षात येतं. कस्टम चेकिंगच्या वेळेसही त्यांना त्याच प्रकारचा सन्मान दिला जातो. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करणार समिती नारंगी रंगाचा पासपोर्ट - फक्त 10 वी पर्यंत शिकलेल्या लोकांसाठी नारंगी रंगाचा पासपोर्ट दिला जातो. परदेशात स्थलांतरित मजूर काम करणाऱ्या लोकांना हा पासपोर्ट विशेषकरुन दिला जातो. त्यांना मार्गदर्शनासाठी कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता असते. या पासपोर्टवरही पासपोर्ट धारकाबद्दल माहिती दिलेली असते. परदेशात स्थलांतरित मजूर म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिकांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे वेगळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. मरुन रंगाचा पासपोर्ट - विदेशात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हा पासपोर्ट दिला जातो. विशेष ओळख असावी यासाठीच सर्वसामान्य पासपोर्टपेक्षा याचा रंग वेगळा ठेवण्यात आला आहे. या पासपोर्टधारकांवर परदेशात एखादा खटला चालवणं अत्यंत कठीण असतं. त्यासाठी अत्यंत किचकट प्रक्रियेतून जावं लागतं. सर्वसामान्य नाररिकांप्रमाणे अशा पासपोर्टधारकांना कोणत्याही प्रकारच्या व्हिसाची आवश्यकता नसते. त्यांच्या इमिग्रेशनलाही कमी वेळ लागतो आणि अनेक सुविधाही त्यांना मिळतात. एकूणच काही विशिष्ट हेतूंसाठी हे विशिष्ट रंगाचे पासपोर्ट दिले जातात. यामुळे परदेशात आपली ओळख पटवणे सोपं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.