जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Explainer: Long Covid म्हणजे काय? संसर्गातून बरं झाल्यावर लगेच जास्त व्यायामाला सुरुवात का नको?

Explainer: Long Covid म्हणजे काय? संसर्गातून बरं झाल्यावर लगेच जास्त व्यायामाला सुरुवात का नको?

Explainer: Long Covid म्हणजे काय? संसर्गातून बरं झाल्यावर लगेच जास्त व्यायामाला सुरुवात का नको?

What is Long COVID? : Covid-19 मधून बरं झाल्यानंतर, 50 ते 70 टक्के रुग्णांना कमी-जास्त तीव्रतेची लक्षणं अगदी सहा महिन्यांपर्यंत जाणवत आहेत. अशा वेळी एकदम जास्त प्रमाणात व्यायामाला सुरुवात केली तर हार्ट अटॅकचा धोका असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 15 सप्टेंबर: जगभरात अद्यापही अनेक ठिकाणी कोविडशी (Coronavirus) लढा देणे सुरूच असताना या संदर्भात आणखी एक शब्द सध्या सातत्याने ऐकू येत आहे, ती म्हणजे, दीर्घकालीन कोविड किंवा Long Covid. सध्या हा कोविडचा प्रकार, डॉक्टर आणि रुग्ण दोघांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे. नवी दिल्लीतील, सेंट स्टिव्हन रुग्णालयात अस्थिरोग चिकित्सा विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ मॅथ्यू वर्गीस यांनी ट्विटरवर कोविडनंतर येणाऱ्या शारीरिक समस्यांविषयी माहिती देताना पहिल्यांदा ( long covid) हा शब्दप्रयोग केला. रुग्ण कोविडमधून बरा झाल्यानंतर, त्याला हा संसर्ग झाल्याच्या चार ते पाच आठवड्यानंतरही अशी लक्षणे दिसू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. Long Covid म्हणजे नेमकं काय? फुफ्फुस आणि क्षयरोग तज्ज्ञ, डॉ निखिल नारायण बांते, यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, कोविड-19 मधून बरं झाल्यानंतर, सुमारे 50 ते 70 टक्के रुग्णांना सौम्य किंवा कधी अगदी तीव्र स्वरूपाची लक्षणं जाणवू शकतात. ज्या रुग्णांना कोविडचा मध्यम अथवा तीव्र स्वरूपाचा संसर्ग झाला होता, त्यांच्या शरीरात ही लक्षणं आढळल्याचं निरीक्षण आहे. ज्यांना बराच काळ कोविड विषाणूचा संसर्ग झाला होता, असे किंवा जे या विषाणूचे अधिक काळ वाहक होते, अशा रुग्णांकडून सातत्याने अशा तक्रारी येत आहेत, की त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना अद्याप निरोगी वाटत नाही. अशा रुग्णांना थकवा येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, अंगदुखी, डोकेदुखी, हृदयाचे असमतोल ठोके, छातीत दुखणे, डायरिया, रक्ताच्या गुठळ्या होणे, वास आणि चव घेण्याची शक्ती कमी होणे अशी काही लक्षणं असल्याची तक्रार अनेक रुग्णांनी केली आहे, असं डॉ मॅथ्यू वर्गीस यांनी सांगितलं.

    News18

    अशा रुग्णांना केवळ शारीरिकच नाही, तर दीर्घकालीन कोविड असलेल्यांना मानसिक परिणामही जाणवत आहे. डॉ मॅथ्यू वर्गीस यांनी सांगितल की, कोरोना होऊन बरं झाल्यानंतर अनेकांना अस्वस्थपणा वाटतो. निराश वाटणं, विस्मृती अशी लक्षणं दिसत आहेत, मात्र विस्मृती म्हणजे, अल्झायमर्स सारखा आजार नव्हे, तर लाँग कोविड असलेल्यांच्या शरीरातील अॅस्ट्रोसाइट्स (मज्जासंस्थेशी संबंधित नसलेल्या पेशी) पेशींच्या नुकसानाचा परिणाम आहे. फक्त एकच डोस घ्यावा लागणार; सिंगल डोस कोरोना लशीला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल डॉ वर्गीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अशा प्रकारचा दीर्घकालीन कोविड केवळ ज्येष्ठ नागरिकांना होत असे. मात्र आता सर्व वयोगटातील रुग्णांमध्ये तीच लक्षणे आढळत आहेत. कावासाकी डिसीज किंवा रक्तामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आहे. मात्र, मुलांना त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी सांगता येत नसल्याने, त्यांच्यावर काही मानसिक परिणाम होत आहे का हे शोधणे जरा अवघड असते . ही सगळी लक्षणे कोविडमुळेच आहेत, की इतर कशामुळे, हे निश्चित तपासण्यासाठी, डॉक्टर्स रुग्णांमध्ये कोविड संसर्ग होण्यापूर्वी ही लक्षणं, सौम्य स्वरूपात का होईना, पण होती का ते तपासतात, ज्यावरुन त्यांना याचा अंदाज बांधता येतो, असं डॉ वर्गीस यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्यविषयक सूचना डॉ वर्गीस यांनी याविषयी जागृती करत, गंभीर स्वरूपाच्या कोविडमधून बरे झाल्यानंतर अशी लक्षणे असणाऱ्या सर्वांनी ताबडतोब त्यावर उपचार सुरु करावेत, असा सल्ला दिला आहे. मात्र हे उपचार रुग्ण बरा झाल्यानंतर, तीन महिन्यांनी करावेत असेही त्यांनी सांगितले. कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णाने, लगेचच व्यायाम सुरू केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या काही केसेस आढळल्याचे त्यांनी सांगितले.

    News18

    Long Covid नंतर, सांध्यामध्ये सूज किंवा वेदना हे ही एक महत्त्वाचं लक्षण अनेक रुग्णांना जाणवत आहे. कोविड झाल्यावर आपल्या शरीरात तयार होणारी प्रतिजैविके आपल्या इतर चांगल्या पेशींवरही हल्ला करतात, त्यामुळे हे होते, असं वर्गीस यांनी सांगितलं. मात्र, अनेक जण सांधेदुखीपेक्षाही, अंगदुखी होत असल्याची तक्रार करतात. कोविडवर उपचार करतांना स्टेरॉईडचा अधिक वापर झाल्यास, त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. अव्हास्क्यूलर न्यूरॉसिस, या आजारामुळे, शरीरातून हाडांना होणारा रक्तपुरवठा तात्पुरता किंवा कायमस्वरुपी बंद होऊ शकतो. उपचारादरम्यान स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे देखील, हा आजार होत असल्याचे लक्षात आले आहे. चीनमध्ये ‘डेल्टा’चा धुमाकूळ, फुजियानमध्ये मॉल, जिम आणि रस्तेही बंद आपण आपली हाडं मजबूत कशी ठेवू शकतो याविषयी डॉ वर्गीस यांनी माहिती दिली. व्यक्तीच्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत, त्याच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, यावर त्याच्या हाडांची ताकद अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले. त्यासाठीच तरुणांनी शारीरिक व्यायाम, खेळ अशा गोष्टी कराव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी, रोज किमान अर्धा तास चालणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते पुढे म्हणाले.

    News18

    आहाराविषयी बोलतांना ते म्हणाले, की आपल्याला आहारात, प्रथिने, कॅल्शियम आणि ड जीवन सत्व युक्त आहार घ्यायला हवा, तसेच, दूध, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यातून देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. मात्र, ड जीवनसत्व खातांना एक काळजी घ्यायला हवी. हे मेद-विरघळवणारे जीवनसत्व असून ते आपल्या शरीरात साचून राहू शकते. ज्याचे इतर काही दुष्परिणाम होऊ शकतात. सूर्यप्रकाशही ड जीवनसत्व मिळवण्याचा उत्तम स्त्रोत आहे. मात्र, आज प्रदूषणामुळे हा सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत योग्यप्रकारे पोचू शकत नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात