मुंबई : ‘‘शौक बडी चिज है’’, आपण हा सिनेमातील डायलॉग ऐकला असेल, शिवाय आपण एखाद्या अवलीयाला त्याच्या आवडीची गोष्ट मनापासून आणि स्वत:ला झोकून करताना पाहातो, तेव्हा असा डायलॉग नक्कीच मारतो. मजा वाटते किंवा आनंद मिळतो म्हणून असे अनेक लोक आहेत, जे काहीही करण्याची तयारी दाखवतात. तुम्ही अशा अनेक लोकांबद्दल ऐकलं असेल ज्यांनी त्याच्या आनंदासाठी आपल्याकडे असलेले सगळे पैसे यासाठी खर्च केले. तर कुणी आपल्या कुटुंबाला सोडलं. इथपर्यंत सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत सगळं ठिक आहे. पण तुम्ही कशी अशा व्यक्तींबद्दल ऐकलंय जे फक्त आपल्या शौकसाठी किंवा आनंद मिळतो म्हणून दुसऱ्यांचा जीव घेतो. हो हे खरं आहे, तुम्हाला याबद्दल ऐकून आश्चर्य वाटेल. जगात असे की व्यक्ती होते, जे काहीही कारण नसताना, फक्त आनंद म्हणून लोकांना मारायचे. Video : दारूच्या नशेत सापाला Kiss, कोब्रासोबत खेळण्याचा परिणाम थरकाप उडवणारा खरंतर अशा लोकांना सायकोच म्हटलं पाहिजे, कारण त्याच्या मनात आणि डोक्यात काधी काय येईल हे सांगता येणं कठीण आहे. चला मग अशा ५ सायको किलरबद्दल जाणून घेऊ. हे मर्डरर कोणत्या पद्धतीने आणि कसे मारायचे, हे देखील जाणून घेऊ. 1. जॅक द रिपर लंडन, ब्रिटनमध्ये 1888 मध्ये जॅक द रिपर नावाच्या कुख्यात गुन्हेगाराने केलेल्या हत्येने शहरात खळबळ उडाली होती. या गुन्हेगाराचे खरे नाव कधीच उघड झाले नाही. असे म्हटले जाते की तो केवळ वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनाच टार्गेट करायचा. तो या महिलांची मान कापायचा आणि शरीरातील अंतर्गत अवयवही बाहेर काढायचा. हत्या आणि मानवी अवयव काढून टाकण्याच्या पद्धतीमुळे त्याला हे विचित्र नाव देण्यात आले. तो इतका कुप्रसिद्ध होता की त्याच्या नावावर अनेक भयपट व्हिडिओ गेम देखील बनवण्यात आले होते. 2. जॉन व्हॅन गेसी जॉनला सेक्स ऑफेंडर आणि सीरियल किलर मानले जात होते. तो जोकर म्हणून मुलांच्या दवाखान्यात आणि मुलांच्या पार्टीत जात असे. म्हणजेच तो या वेशात मुलांचे मनोरंजन करून त्यांना पळवून नेत असे. आधी तो लहान मुलांना मारायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा, असं म्हटलं जातं. पोलिसांनी त्याला पकडून घराची झडती घेतली असता तेथे २९ सडलेले मृतदेह आढळून आले. त्याने 33 जणांची हत्या केल्याची कबुली दिली. 3. एंड्री चिकातिलो 1978 मध्ये एंड्री चिकातिलोने रशियामध्ये हत्या करण्यास सुरुवात केली. तो महिला आणि लहान मुलांना टार्गेट करत होता. तो आधी महिला आणि मुलांचे अपहरण करायचा आणि नंतर गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या करायचा, असे सांगण्यात येत आहे. तो Butcher Of Rostov म्हणून ओळखला जात असे. जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याने सांगितले की त्याने 56 महिला आणि मुलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली होती. 4. डॉ. होराल्ड शिपमॅन 200 हून अधिक खुनांचा दोषी असलेला होराल्ड शिपमॅन हा व्यवसायाने डॉक्टर होता. तो आपल्या रुग्णांना अशा पद्धतीने मारायचा की कोणाला संशयही येत नाही. डॉक्टर अशा प्रकारे लोकांना मारू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. डॉक्टर विवाहित होता आणि त्यांच्या कुटुंबात पाच लोक होते. असे म्हटले जाते की तो एकटाच राहत होता आणि त्याच्या सहकारी डॉक्टरांना तो आवडत नव्हता.
5. टेड बंडी 1970 च्या दशकात, सिरीयल किलर टेड बंडी अनेक अमेरिकन शहरांमध्ये सुंदर महिलांवर बलात्कार आणि नंतर हत्या करण्यासाठी कुख्यात होता. त्याने एकाच पद्धतीने 36 महिलांची हत्या केली होती. या धोकादायक आणि विक्षिप्त किलरला शिक्षा देण्यासाठी न्यायालयीन खटलाही टीव्हीवर प्रसारित झाला. बलात्कार आणि हत्येला गुन्ह्यांच्या श्रेणीत ठेवत न्यायालयाने त्याला फ्लोरिडामध्ये इलेक्ट्रिक खुर्चीला बांधून फाशीची शिक्षा सुनावली होती.

)







